S M L

हाफीज सईदची धमकी,'सीमारेषेवर बॉम्बहल्ले होतील'

12 जानेवारीभारताच्या सीमारेषेवर बॉम्बहल्ले होऊ शकतील आणि त्याचबरोबर सीमारेषेवरील तणाव हा वाढू शकतो अशी फुटकळ धमकी लष्कर ए तोयबा चा प्रमुख हाफीज सईदनं दिली आहे. रॉईटर्स या वृत्तसंस्थेला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत हाफीज सईदने ही बडबड केली.भारताने पाकिस्तानमध्ये अस्थिरता वाढवण्याचा प्रयत्न केलाआहे. जर हे थांबले नाही तर काश्मिर खोर्‍यात तणाव वाढू शकतो अशी गरळही त्यांने ओकलीय. हाफीज सईद हा 26/11 वरील मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आहे. सीमारेषेवर पाक सैनिकांनी केलेल्या हल्ल्याच्या अगोदर सईदनं सीमारेषेवर जाऊन ही परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न केला असा अंदाज भारत सरकारनं व्यक्त केला होता. पण हा दावा हाफीज सईदनं खोडून काढलाय. इतकचं नाही तर बलुचिस्तानमध्ये झालेल्या दुहेरी स्फोटांमागे भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा संशयही हाफीज सईदनं व्यक्त केलाय. एकीकडे हाफीज आपल्यावरील केलेले आरोप फेटाळून लावतोय तर दुसरीकडे सीमारेषेवर बॉम्बहल्ले होतील अशी 'नापाक' विधानं केलीय. तर दुसरीकडे भारतीय हवाई दलाचे प्रमुख एन एके ब्राऊन यांनी पाकिस्तानाला 'हद्दीत' राहण्याचा इशारा दिलाय. पाकिस्तानने अशीच घुसखोरी कायम ठेवली तर हवाई दल वेगळा विचार करू शकतो असा सज्जड दम एन एके ब्राऊन यांनी दिलाय. दोन्ही देशात 2003 साली झालेल्या युद्धविराम करारानुसार उल्लंघन करता येत नाही. पण पाककडून होत असलेलं उल्लंघन आम्हाला बिलकुल मान्य नाही. आम्ही परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहोत. जर पाक कडून हा उत्पात सुरूच राहिला तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा स्पष्ट इशारा ब्राऊन यांनी दिला. कोणता 'विचार' करावा लागेल असा प्रश्न विचारला असता ब्राऊन म्हणाले, विचार हा विचार असतो. असंच उल्लंघन सुरू राहील तर आम्हाला नव्याने या प्रकरणाची समीक्षा करावी लागेल असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. सध्या नियंत्रण रेषेवरील परिस्थिती अधिक संवेदनशिल बनत चालेली आहे. पाकिस्तानने त्यांच्या सर्व सैनिकांच्या सुट्‌ट्या रद्द केल्या असून टोळ्या जमवायला सुरूवात केलीय. तसंच पाकिस्तानी लष्करातील ब्रिगेडियर स्तरावरील अधिकार्‍यांची बैठकसुद्धा बोलावण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणासुद्धा सतर्क झाल्या आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिव शंकर मेनन हे पंतप्रधानांना सतत बदलत्या परिस्थितीची माहिती देत आहेत. सीमेवरील पाकिस्तानची वाढती हालचाल पाहून भारतानेही सीमेवरील सैन्यात वाढ केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2013 04:12 PM IST

हाफीज सईदची धमकी,'सीमारेषेवर बॉम्बहल्ले होतील'

12 जानेवारी

भारताच्या सीमारेषेवर बॉम्बहल्ले होऊ शकतील आणि त्याचबरोबर सीमारेषेवरील तणाव हा वाढू शकतो अशी फुटकळ धमकी लष्कर ए तोयबा चा प्रमुख हाफीज सईदनं दिली आहे. रॉईटर्स या वृत्तसंस्थेला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत हाफीज सईदने ही बडबड केली.भारताने पाकिस्तानमध्ये अस्थिरता वाढवण्याचा प्रयत्न केलाआहे. जर हे थांबले नाही तर काश्मिर खोर्‍यात तणाव वाढू शकतो अशी गरळही त्यांने ओकलीय.

हाफीज सईद हा 26/11 वरील मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आहे. सीमारेषेवर पाक सैनिकांनी केलेल्या हल्ल्याच्या अगोदर सईदनं सीमारेषेवर जाऊन ही परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न केला असा अंदाज भारत सरकारनं व्यक्त केला होता. पण हा दावा हाफीज सईदनं खोडून काढलाय. इतकचं नाही तर बलुचिस्तानमध्ये झालेल्या दुहेरी स्फोटांमागे भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा संशयही हाफीज सईदनं व्यक्त केलाय. एकीकडे हाफीज आपल्यावरील केलेले आरोप फेटाळून लावतोय तर दुसरीकडे सीमारेषेवर बॉम्बहल्ले होतील अशी 'नापाक' विधानं केलीय.

तर दुसरीकडे भारतीय हवाई दलाचे प्रमुख एन एके ब्राऊन यांनी पाकिस्तानाला 'हद्दीत' राहण्याचा इशारा दिलाय. पाकिस्तानने अशीच घुसखोरी कायम ठेवली तर हवाई दल वेगळा विचार करू शकतो असा सज्जड दम एन एके ब्राऊन यांनी दिलाय. दोन्ही देशात 2003 साली झालेल्या युद्धविराम करारानुसार उल्लंघन करता येत नाही. पण पाककडून होत असलेलं उल्लंघन आम्हाला बिलकुल मान्य नाही. आम्ही परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहोत. जर पाक कडून हा उत्पात सुरूच राहिला तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा स्पष्ट इशारा ब्राऊन यांनी दिला. कोणता 'विचार' करावा लागेल असा प्रश्न विचारला असता ब्राऊन म्हणाले, विचार हा विचार असतो. असंच उल्लंघन सुरू राहील तर आम्हाला नव्याने या प्रकरणाची समीक्षा करावी लागेल असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

सध्या नियंत्रण रेषेवरील परिस्थिती अधिक संवेदनशिल बनत चालेली आहे. पाकिस्तानने त्यांच्या सर्व सैनिकांच्या सुट्‌ट्या रद्द केल्या असून टोळ्या जमवायला सुरूवात केलीय. तसंच पाकिस्तानी लष्करातील ब्रिगेडियर स्तरावरील अधिकार्‍यांची बैठकसुद्धा बोलावण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणासुद्धा सतर्क झाल्या आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिव शंकर मेनन हे पंतप्रधानांना सतत बदलत्या परिस्थितीची माहिती देत आहेत. सीमेवरील पाकिस्तानची वाढती हालचाल पाहून भारतानेही सीमेवरील सैन्यात वाढ केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2013 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close