S M L

स्कुलबसमध्ये चिमुरडीचा विनयभंग

19 जानेवारीजुहू तील एका शाळेच्या बस मधील क्लिनरने चालत्या बसमध्ये तीन वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विलेपार्लेत राहणारी ही चिमुरडी जुहू पोलीस ठाण्यासमोरील प्लेग्रुपमध्ये जात होती. तीन दिवसांपुर्वी बसमधून घरी परतताना या मुलीसोबत ही घटना घडली. विशेष म्हणजे यावेळी बसमध्ये महिला मदतनीसही बसमध्ये उपस्थित होती अशी माहिती पोलिसांनी दिलीय. ही चिमुरडी बसमध्ये एकटीच असल्याचं पाहून क्लिनर रमेश राजपूतनं या मुलीशी चाळे केले. तिन दिवसानंतर गुरूवारी या मुलीला त्रास होत असल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्यानंतर या मुलीने बसमधील घडलेला प्रसंग सांगितला. हे ऐकून धक्का बसलेल्या पालकांनी जुहु पोलीस स्टेशनमध्ये रमेश राजपुतवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला तातडीने त्याला अटक केली आहे. अंधेरी कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने राजपूतला 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2013 11:51 AM IST

स्कुलबसमध्ये चिमुरडीचा विनयभंग

19 जानेवारी

जुहू तील एका शाळेच्या बस मधील क्लिनरने चालत्या बसमध्ये तीन वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विलेपार्लेत राहणारी ही चिमुरडी जुहू पोलीस ठाण्यासमोरील प्लेग्रुपमध्ये जात होती. तीन दिवसांपुर्वी बसमधून घरी परतताना या मुलीसोबत ही घटना घडली. विशेष म्हणजे यावेळी बसमध्ये महिला मदतनीसही बसमध्ये उपस्थित होती अशी माहिती पोलिसांनी दिलीय. ही चिमुरडी बसमध्ये एकटीच असल्याचं पाहून क्लिनर रमेश राजपूतनं या मुलीशी चाळे केले. तिन दिवसानंतर गुरूवारी या मुलीला त्रास होत असल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्यानंतर या मुलीने बसमधील घडलेला प्रसंग सांगितला. हे ऐकून धक्का बसलेल्या पालकांनी जुहु पोलीस स्टेशनमध्ये रमेश राजपुतवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला तातडीने त्याला अटक केली आहे. अंधेरी कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने राजपूतला 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2013 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close