S M L

मनसेनं टोल नाक्यांचं आंदोलन का गुंडाळलं ?-जावडेकर

11 मार्चविरोधी पक्षनेते एकनाथ खडसे सकाळी घोटाळे उघड करतात आणि संध्याकाळी सेटलमेंट करतात असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर भाजपला हा आरोप चांगलाच झोंबला. आमच्यावर सेटलमेंटचा आरोप करण्याऐवजी राज ठाकरेंनी टोलविरोधातलं आंदोलन का थांबवलंत्याचं उत्तर द्यावं असं प्रतिआव्हान भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी दिलं आहे.ते अहमदनगरमध्ये बोलत होते. मनसेनं टोल नाक्याच्या प्रश्नावर राज्यभरात आंदोलन पुकारले होते. अनेक टोलनाक्यांची तोडफोड केली होती. तर टोल देऊ नका असं आवाहन खुद्द राज ठाकरे यांनी केलं होतं. तसेच राज यांच्या आदेशावरून अनेक टोलनाक्यावर मनसेसैनिकांनी टोल नाक्यावर पहारा देऊन येणार्‍या जाणार्‍या गाड्यांची संख्या नोंदवली होती पण यानंतर अचानक आंदोलन नाहीसे झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2013 09:30 AM IST

मनसेनं टोल नाक्यांचं आंदोलन का गुंडाळलं ?-जावडेकर

11 मार्च

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे सकाळी घोटाळे उघड करतात आणि संध्याकाळी सेटलमेंट करतात असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर भाजपला हा आरोप चांगलाच झोंबला. आमच्यावर सेटलमेंटचा आरोप करण्याऐवजी राज ठाकरेंनी टोलविरोधातलं आंदोलन का थांबवलंत्याचं उत्तर द्यावं असं प्रतिआव्हान भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी दिलं आहे.ते अहमदनगरमध्ये बोलत होते. मनसेनं टोल नाक्याच्या प्रश्नावर राज्यभरात आंदोलन पुकारले होते. अनेक टोलनाक्यांची तोडफोड केली होती. तर टोल देऊ नका असं आवाहन खुद्द राज ठाकरे यांनी केलं होतं. तसेच राज यांच्या आदेशावरून अनेक टोलनाक्यावर मनसेसैनिकांनी टोल नाक्यावर पहारा देऊन येणार्‍या जाणार्‍या गाड्यांची संख्या नोंदवली होती पण यानंतर अचानक आंदोलन नाहीसे झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2013 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close