S M L

शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसलं '112 कोटींचं'भूत

15 जानेवारीकेंद्र सरकारनं 2008 साली केलेल्या कर्जमाफीतून कोल्हापूर जिल्ह्याला 293 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली होती. मात्र यामध्ये तब्बल 112 कोटी रुपयांचे कर्ज हे नाबार्डनं अपात्र ठरवलं होतं. काही शेतकर्‍यांनी कर्ज मर्यादेचं उल्लंघन केलं होतं. पण आता याच 112 कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम वसूल करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता 44 हजार शेतकर्‍यांकडून हे कर्ज आता वसूल केलं जाणार आहे. दरम्यान, अपात्र कर्जाला बँक अधिकारी आणि लेखापरिक्षक जबाबदार असल्याचा ठपका रिझर्व्ह बँकेनं ठेवलाय. त्यामुळं आता जिल्हा मध्यवर्ती बँकेला ही कर्जवसुली करावी लागणार आहे. आता 4 वर्षांनंतर एवढं मोठं कर्ज कसं फेडणार असा 'यक्षप्रश्न' शेतकर्‍यांनी उपस्थित केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2013 02:40 PM IST

शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसलं '112 कोटींचं'भूत

15 जानेवारी

केंद्र सरकारनं 2008 साली केलेल्या कर्जमाफीतून कोल्हापूर जिल्ह्याला 293 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली होती. मात्र यामध्ये तब्बल 112 कोटी रुपयांचे कर्ज हे नाबार्डनं अपात्र ठरवलं होतं. काही शेतकर्‍यांनी कर्ज मर्यादेचं उल्लंघन केलं होतं. पण आता याच 112 कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम वसूल करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता 44 हजार शेतकर्‍यांकडून हे कर्ज आता वसूल केलं जाणार आहे. दरम्यान, अपात्र कर्जाला बँक अधिकारी आणि लेखापरिक्षक जबाबदार असल्याचा ठपका रिझर्व्ह बँकेनं ठेवलाय. त्यामुळं आता जिल्हा मध्यवर्ती बँकेला ही कर्जवसुली करावी लागणार आहे. आता 4 वर्षांनंतर एवढं मोठं कर्ज कसं फेडणार असा 'यक्षप्रश्न' शेतकर्‍यांनी उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2013 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close