S M L

कर्जमाफीवरून मुश्रीफ-मंडलिक यांच्यात जुंपली

संदीप राजगोळकर, कोल्हापूर07 मार्चकेंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यातली ही महाराष्ट्रातली सुरस कथा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कर्जमाफी मिळालेल्या 44 हजार शेतकर्‍यांकडून सुमारे 112 कोटी रुपयांची रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वीच या कर्जमाफीची फेरतापसणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र दुसरीकडंयाला राजकीय वळणही लागलंय. कर्जमाफी योजनेत घोळ झाल्याची पहिली तक्रार कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांची. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानं कोल्हापूर जिल्हा बँकेकडून सव्वा दोन हजार शेतकर्‍यांना बेकायदेशीरपणे अव्वाच्या सव्वा कर्जमाफी दिली, असा आरोप सदाशिवराव मंडलिक यांनी केलीय. आता तर मंडलिकांनी हसन मुश्रीफ यांच्या बडतर्फीची मागणी करुन खळबळ उडवून दिली आहे. त्याचबरोबर मंडलिकांनी थेट काही बड्‌या धेंड्यांची नावं घेत त्यांनीच कर्जमाफीची बोगस लाभ उचलला असा आरोपही केलाय. दुसरीकडे मात्र कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळत मंडलिकांच्याच राजीनाम्याची मागणी केलीय. या वादात भरडला जातोय तो शेतकरी...कर्जमाफीच्या मूळ योजनेत कमाल मर्यादेची योजनाच नव्हती. त्यामुळे अपात्र ठरवलेल्या 112 कोटी रुपयांची वसुली होण्याची शक्यताय. याबाबत नाबार्ड येत्या 15 दिवसांत निर्णय घेणार असल्याचं कोल्हापूर जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी सांगितलंय.तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आक्रमक झालीय. घोटाळेबहाद्दरांना लगाम घालून फेरतपासणीत योग्य कारवाईची मागणी होतेय. कर्जमाफीच्या या वादाला आता राजकीय वळण लागल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातला मंडलिक विरुद्ध मुश्रीफ वाद आता पुन्हा एकदा उफाळून आलाय. त्यातून खरा प्रश्न बाजूला पडू नये म्हणजे झाले.कर्जमाफीचे फायदे उचलणार्‍या राजकीय व्यक्ती आणि कुटुंबिय :1 - युवराज पाटील संचालक, भूविकास बँक15 लाख रुपये2 - प्रकाश पाटील संचालक, हमीदवाडा साखर कारखाना 18 लाख3 - अशोक नवाळे, माजी अध्यक्ष, कागल तालुका संघ 40 लाख4 - बाबगोंडा पाटील संचालक, हमीदवाडा कारखाना 32 लाख5 - नामदेव चौगुले सचिव, कृष्णराव घाटगे सेवा संस्था, वंदूर40 लाख6 - शिवाजी इंगळे कार्यकर्ता, मंडलिक गट 16 लाख रुपये7 - शीतल शिंदेकेडीसीसी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष पी.जी. शिंदे यांच्या वहिनी32 हजार रुपये

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2013 02:30 PM IST

कर्जमाफीवरून मुश्रीफ-मंडलिक यांच्यात जुंपली

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

07 मार्च

केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यातली ही महाराष्ट्रातली सुरस कथा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कर्जमाफी मिळालेल्या 44 हजार शेतकर्‍यांकडून सुमारे 112 कोटी रुपयांची रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वीच या कर्जमाफीची फेरतापसणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र दुसरीकडंयाला राजकीय वळणही लागलंय.

कर्जमाफी योजनेत घोळ झाल्याची पहिली तक्रार कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांची. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानं कोल्हापूर जिल्हा बँकेकडून सव्वा दोन हजार शेतकर्‍यांना बेकायदेशीरपणे अव्वाच्या सव्वा कर्जमाफी दिली, असा आरोप सदाशिवराव मंडलिक यांनी केलीय. आता तर मंडलिकांनी हसन मुश्रीफ यांच्या बडतर्फीची मागणी करुन खळबळ उडवून दिली आहे. त्याचबरोबर मंडलिकांनी थेट काही बड्‌या धेंड्यांची नावं घेत त्यांनीच कर्जमाफीची बोगस लाभ उचलला असा आरोपही केलाय.

दुसरीकडे मात्र कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळत मंडलिकांच्याच राजीनाम्याची मागणी केलीय. या वादात भरडला जातोय तो शेतकरी...कर्जमाफीच्या मूळ योजनेत कमाल मर्यादेची योजनाच नव्हती. त्यामुळे अपात्र ठरवलेल्या 112 कोटी रुपयांची वसुली होण्याची शक्यताय. याबाबत नाबार्ड येत्या 15 दिवसांत निर्णय घेणार असल्याचं कोल्हापूर जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी सांगितलंय.

तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आक्रमक झालीय. घोटाळेबहाद्दरांना लगाम घालून फेरतपासणीत योग्य कारवाईची मागणी होतेय. कर्जमाफीच्या या वादाला आता राजकीय वळण लागल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातला मंडलिक विरुद्ध मुश्रीफ वाद आता पुन्हा एकदा उफाळून आलाय. त्यातून खरा प्रश्न बाजूला पडू नये म्हणजे झाले.

कर्जमाफीचे फायदे उचलणार्‍या राजकीय व्यक्ती आणि कुटुंबिय :

1 - युवराज पाटील संचालक, भूविकास बँक15 लाख रुपये

2 - प्रकाश पाटील संचालक, हमीदवाडा साखर कारखाना 18 लाख

3 - अशोक नवाळे, माजी अध्यक्ष, कागल तालुका संघ 40 लाख

4 - बाबगोंडा पाटील संचालक, हमीदवाडा कारखाना 32 लाख

5 - नामदेव चौगुले सचिव, कृष्णराव घाटगे सेवा संस्था, वंदूर40 लाख

6 - शिवाजी इंगळे कार्यकर्ता, मंडलिक गट 16 लाख रुपये

7 - शीतल शिंदेकेडीसीसी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष पी.जी. शिंदे यांच्या वहिनी32 हजार रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2013 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close