S M L

अफझल गुरूला फाशी !

09 फेब्रुवारी 201313 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफझल गुरुला आज अखेर फाशी देण्यात आली. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अफझलला दिल्लीतल्या तिहार जेलच्या बरॅक तीनमध्ये फाशी देण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अफझलचा दयेचा अर्ज 3 फेब्रुवारीला फेटाळला. आणि त्यानंतर 4 फेब्रुवारीला त्यावर सही करुन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुढच्या प्रक्रियेसाठी अफझलची फाईल पुढे पाठवली. अफझलला तिहार जेलमध्ये फाशी दिल्याची अधिकृत घोषणा केंद्रीय गृहसचिव आर के सिंग यांनी दिली. आणि त्यानंतर गृहमंत्र्यांनीही त्याची अधिकृत घोषणा केली. 9 फेब्रुवारी 2013. काश्मीर खोर्‍याची सकाळ सुरू झाली ती कर्फ्यूनंच...सकाळी 8 वाजता बातमी आली. संसद हल्यातला अफझल गुरूला अतिरेकी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. अनेक वर्षांच्या अनिश्तितेनंतर अखेर यूपीए सरकारनं अफझलला फासावर लटकावलं. 43 वर्षांच्या अफझलच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी 3 फेब्रुवारी रोजी फेटाळला आणि अवघ्या काही दिवसांत सरकारनं अंमलबजावणी केली.संसद हल्ल्याप्रकरणी 18 डिसेंबर 2002 अफझल दोषी ठरल्यानंतर तेव्हापासून त्याला तिहार जेलमध्ये डांबण्यात आलं होतं. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्याची माहिती त्याला दोन दिवसांपूर्वी देण्यात आली. काश्मीरमधल्या त्याच्या कुटुंबीयांनाही स्पीड पोस्टने याची माहिती दिल्याचे गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. पण सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र अफझलच्या कुटुंबीयांना माहिती दिली नसल्याचा आरोप केला. शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी अफझलच्या तब्येतीची तपासणी केली. आणि तो फाशीसाठी फीट असल्याचं सर्टिफिकेट दिलं. यावेळी तो शांत होता, असं तिहार जेलच्या प्रशासनानं सांगितलं. फाशीनंतर त्याला तिहार जेलमध्येच दफन करण्यात आलं.अफझलच्या फाशीचे पडसाद देशात उमटू नयेत, याची खबरदारी सरकारनं घेतली. हुरियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी आणि मिरवाईझ उमर फारुख यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्य सरकारांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहे. घटनाक्रम: संसद हल्ला13 डिसेंबर 2001 संसदेवर हल्ला5 सशस्त्र अतिरेक्यांनी केला हल्ला अतिरेक्यांचा अंदाधुंद गोळीबार हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू पाच सुरक्षा कर्मचार्‍यांचा समावेश हल्यामागे जैश-ए-मोहम्मद संघटनेचा हातकाही तासातच अफझल गुरूला अटक अफझल गुरूचा कटात थेट सहभाग 18 डिसेंबर 2002- महमद अफझल गुरु ,एस.आर .गिलानी ,अफसान गुरु आणि शौकत गुरु यांना विशेष पोटा न्यायालयाकडून फाशीची शिक्षा 5 सप्टेंबर 2005 - महमद अफझल गुरुची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम, शौकतला दहा वर्षाची सक्त मजुरीसप्टेंबर 2006 - अफझल गुरुकडून दयेचा अर्ज दाखल 6 मे 2010- अफजल गुरुच्या दयेच्या अर्जाची फाईल सरकारने केंद्राकडे पाठवली3 फेब्रुवारी 2013- राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला09 फेब्रुवारी 2013- अफझल गुरूला तिहारमध्ये फाशी

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2013 06:14 AM IST

अफझल गुरूला फाशी !

09 फेब्रुवारी 2013

13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफझल गुरुला आज अखेर फाशी देण्यात आली. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अफझलला दिल्लीतल्या तिहार जेलच्या बरॅक तीनमध्ये फाशी देण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अफझलचा दयेचा अर्ज 3 फेब्रुवारीला फेटाळला. आणि त्यानंतर 4 फेब्रुवारीला त्यावर सही करुन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुढच्या प्रक्रियेसाठी अफझलची फाईल पुढे पाठवली. अफझलला तिहार जेलमध्ये फाशी दिल्याची अधिकृत घोषणा केंद्रीय गृहसचिव आर के सिंग यांनी दिली. आणि त्यानंतर गृहमंत्र्यांनीही त्याची अधिकृत घोषणा केली.

9 फेब्रुवारी 2013. काश्मीर खोर्‍याची सकाळ सुरू झाली ती कर्फ्यूनंच...सकाळी 8 वाजता बातमी आली. संसद हल्यातला अफझल गुरूला अतिरेकी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. अनेक वर्षांच्या अनिश्तितेनंतर अखेर यूपीए सरकारनं अफझलला फासावर लटकावलं. 43 वर्षांच्या अफझलच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी 3 फेब्रुवारी रोजी फेटाळला आणि अवघ्या काही दिवसांत सरकारनं अंमलबजावणी केली.

संसद हल्ल्याप्रकरणी 18 डिसेंबर 2002 अफझल दोषी ठरल्यानंतर तेव्हापासून त्याला तिहार जेलमध्ये डांबण्यात आलं होतं. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्याची माहिती त्याला दोन दिवसांपूर्वी देण्यात आली. काश्मीरमधल्या त्याच्या कुटुंबीयांनाही स्पीड पोस्टने याची माहिती दिल्याचे गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.

पण सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र अफझलच्या कुटुंबीयांना माहिती दिली नसल्याचा आरोप केला. शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी अफझलच्या तब्येतीची तपासणी केली. आणि तो फाशीसाठी फीट असल्याचं सर्टिफिकेट दिलं. यावेळी तो शांत होता, असं तिहार जेलच्या प्रशासनानं सांगितलं. फाशीनंतर त्याला तिहार जेलमध्येच दफन करण्यात आलं.

अफझलच्या फाशीचे पडसाद देशात उमटू नयेत, याची खबरदारी सरकारनं घेतली. हुरियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी आणि मिरवाईझ उमर फारुख यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्य सरकारांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहे.

घटनाक्रम: संसद हल्ला

13 डिसेंबर 2001 संसदेवर हल्ला5 सशस्त्र अतिरेक्यांनी केला हल्ला अतिरेक्यांचा अंदाधुंद गोळीबार हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू पाच सुरक्षा कर्मचार्‍यांचा समावेश हल्यामागे जैश-ए-मोहम्मद संघटनेचा हातकाही तासातच अफझल गुरूला अटक अफझल गुरूचा कटात थेट सहभाग 18 डिसेंबर 2002- महमद अफझल गुरु ,एस.आर .गिलानी ,अफसान गुरु आणि शौकत गुरु यांना विशेष पोटा न्यायालयाकडून फाशीची शिक्षा 5 सप्टेंबर 2005 - महमद अफझल गुरुची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम, शौकतला दहा वर्षाची सक्त मजुरीसप्टेंबर 2006 - अफझल गुरुकडून दयेचा अर्ज दाखल 6 मे 2010- अफजल गुरुच्या दयेच्या अर्जाची फाईल सरकारने केंद्राकडे पाठवली3 फेब्रुवारी 2013- राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला09 फेब्रुवारी 2013- अफझल गुरूला तिहारमध्ये फाशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2013 06:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close