S M L

राज ठाकरेंचा इशारा हवेतच विरला ?

24 जानेवारीमुंबईतल्या फेरीवाल्यांनी जर पोलिसांच्या निषेधार्थ मोर्चा काढला तर मनसे आपल्या स्टाईलने त्याला उत्तर देईल असा थेट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. मात्र आज फेरीवाल्यांच्या मोर्चानंतरही मनसेनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचं आव्हान हवेतच विरलं की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. मनसेत सुद्धा याबाबत अस्वस्थता असून आंदोलनासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून कोणतेही आदेश आले नाहीत असं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. मनसेचे जवळपास सर्व आमदार सध्या राज्यात दौर्‍यावर आहेत. या आमदारांकडे कार्यकर्त्यांनी विचारणा केली तेव्हाही त्यांना काहीही करू नका असं सांगण्यात आल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. याआगोदर राज ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतर लगेचच कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असत पण यावेळी मात्र राज ठाकरेंच्या आव्हानानंतरही मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेच का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.संबंधित बातम्या...तर परप्रांतीय फेरीवाल्यांना 'खळ्ळ फटॅक'-राज(व्हिडिओ)फेरीवाल्यांना संरक्षण देऊ -आठवले( व्हिडिओ)

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2013 01:35 PM IST

राज ठाकरेंचा इशारा हवेतच विरला ?

24 जानेवारी

मुंबईतल्या फेरीवाल्यांनी जर पोलिसांच्या निषेधार्थ मोर्चा काढला तर मनसे आपल्या स्टाईलने त्याला उत्तर देईल असा थेट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. मात्र आज फेरीवाल्यांच्या मोर्चानंतरही मनसेनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचं आव्हान हवेतच विरलं की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. मनसेत सुद्धा याबाबत अस्वस्थता असून आंदोलनासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून कोणतेही आदेश आले नाहीत असं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. मनसेचे जवळपास सर्व आमदार सध्या राज्यात दौर्‍यावर आहेत. या आमदारांकडे कार्यकर्त्यांनी विचारणा केली तेव्हाही त्यांना काहीही करू नका असं सांगण्यात आल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. याआगोदर राज ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतर लगेचच कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असत पण यावेळी मात्र राज ठाकरेंच्या आव्हानानंतरही मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेच का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

संबंधित बातम्या

...तर परप्रांतीय फेरीवाल्यांना 'खळ्ळ फटॅक'-राज(व्हिडिओ)

फेरीवाल्यांना संरक्षण देऊ -आठवले( व्हिडिओ)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2013 01:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close