S M L

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'बैठक' ?

05 फेब्रुवारीनितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यामुळे आता राज्यातही भाजपमध्ये फेरबदल होणार का ? यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होतेय. विधान परिषदेचे विरोधी नेते विनोद तावडेंच्या बंगल्यावर ही बैठक सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. गडकरींचं अध्यक्षपद गेल्यावर सुधीर मुनगंटीवार यांच्या पदावर टांगती तलवार आहे, असं म्हटलं जातं आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय नेतृत्व अजूनही मुनगंटीवार यांना कायम ठेवण्याच्या बाजूने आहे. पण मुंडे गट मात्र त्यांना हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे दोन्ही गटांना मंजूर असलेलं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं नावही चर्चेत आहे. या बैठकीत भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावावर चर्चेची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2013 10:56 AM IST

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'बैठक' ?

05 फेब्रुवारी

नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यामुळे आता राज्यातही भाजपमध्ये फेरबदल होणार का ? यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होतेय. विधान परिषदेचे विरोधी नेते विनोद तावडेंच्या बंगल्यावर ही बैठक सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. गडकरींचं अध्यक्षपद गेल्यावर सुधीर मुनगंटीवार यांच्या पदावर टांगती तलवार आहे, असं म्हटलं जातं आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय नेतृत्व अजूनही मुनगंटीवार यांना कायम ठेवण्याच्या बाजूने आहे. पण मुंडे गट मात्र त्यांना हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे दोन्ही गटांना मंजूर असलेलं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं नावही चर्चेत आहे. या बैठकीत भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावावर चर्चेची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2013 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close