S M L

आयुक्तांविरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी थोपटले दंड

22 जानेवारीपिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीचे समर्थक अपक्ष आमदार विलास लांडे यांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. अवैध बांधकाम विरोधी कारवाईवरून परदेशी यांच्याविरोधात सातत्यानं लांडे-जगताप बंड करत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक बोलवावी, तोपर्यंत महापालिकेच्या महासभेवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकावा असं आवाहन त्यांनी केलंय. याच पार्श्वभूमीवर आज महापालिकेची सर्वसाधारण सभा होतेय. त्यात हे नगरसेवक काय भूमिका घेतात, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान, गेल्या महिन्यात रद्द करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेसाठी आजही अपेक्षित कोरम नसल्याचं सांगत सभा रद्द करण्यात आली, त्यावर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला. तसंच 8 दिवसांत कारवाई न थांबल्यास थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर उपोषण करू असा इशाराच या आमदारांनी दिलाय. विशेष म्हणजे लांडेंची पत्नी मोहिनी लांडे या पिंपरी चिंचवडच्या महापौर आहेत तसंच अजित पवारांचा श्रीकर परदेशी यांना पाठिंबा आहे. यामुळं या बंडोबांचा थंडोबा होणार का हे वादळ पेल्यातलं ठरणार का हे लवकरच कळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2013 11:50 AM IST

आयुक्तांविरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी थोपटले दंड

22 जानेवारी

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीचे समर्थक अपक्ष आमदार विलास लांडे यांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. अवैध बांधकाम विरोधी कारवाईवरून परदेशी यांच्याविरोधात सातत्यानं लांडे-जगताप बंड करत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक बोलवावी, तोपर्यंत महापालिकेच्या महासभेवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकावा असं आवाहन त्यांनी केलंय.

याच पार्श्वभूमीवर आज महापालिकेची सर्वसाधारण सभा होतेय. त्यात हे नगरसेवक काय भूमिका घेतात, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान, गेल्या महिन्यात रद्द करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेसाठी आजही अपेक्षित कोरम नसल्याचं सांगत सभा रद्द करण्यात आली, त्यावर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला. तसंच 8 दिवसांत कारवाई न थांबल्यास थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर उपोषण करू असा इशाराच या आमदारांनी दिलाय. विशेष म्हणजे लांडेंची पत्नी मोहिनी लांडे या पिंपरी चिंचवडच्या महापौर आहेत तसंच अजित पवारांचा श्रीकर परदेशी यांना पाठिंबा आहे. यामुळं या बंडोबांचा थंडोबा होणार का हे वादळ पेल्यातलं ठरणार का हे लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2013 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close