S M L

SITच्या अधिकारांबाबत मुख्यमंत्री घेणार चितळे समितीची भेट

07 मार्चसिंचन घोटाळाच्या चौकशीसाठी माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एसआयटीची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भेट घेणार आहेत. आणि समितीला नेमके कोणते अधिकार पाहिजेत, याविषयी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी अमरावतीत ही माहिती दिलीय. समितीला नेमून दिलेल्या कार्यकक्षेत घोटाळ्याचा आरोप असलेले अधिकारी किंवा राजकारण्यांच्या चौकशी किंवा उलट तपासणीबाबतचा कुठलाही मुद्दा नाही, असं खुद्द समितीचे अध्यक्ष माधव चितळे यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चितळे समिती सदस्याची भेट घेणार आहेत. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय एसआयटी नेमण्यात आली. पण या चौकशी समितीला सिंचन घोटाळ्यातल्या राजकारणी आणि अधिकार्‍यांची चौकशी करण्याचा अधिकारच देण्यात आलेला नाही. या समितीला नेमून दिलेल्या कार्यकक्षेत घोटाळ्याचा आरोप असलेले अधिकारी किंवा राजकारण्यांच्या चौकशी आणि उलट तपासणीबाबतचा कुठलाही मुद्दा नाही, असं खुद्द समितीचे अध्यक्ष माधव चितळे यांनी स्पष्ट केलंय. चितळे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना पत्र लिहून ही बाब कळवलीय. गेल्या वर्षी 16 डिसेंबरला सिंचनाच्या चौकशीसाठी माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर पंधरा दिवसांनी इतर तीन सदस्यांचीही नेमणूक करण्यात आली होती. पण या समितीला केवळ प्रशासकीय अनियमितता तपासण्याचेच निर्देश देण्यात आले आणि सहा महिन्यांच्या आत अहवाल सादर करायला सांगितलंय. दरम्यान, राजकारणी आणि अधिकार्‍यांची चौकशी होणार नसेल तर कोर्टात जाण्याचा इशारा विरोधकांनी दिलाय. तर सिंचन घोटाळ्याच्या फौजदारी तपासाचे निर्देश एसआयटीला देण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्ते प्रविण वाटेगावकर यांनी मुंबई हायकोर्टाला केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2013 03:37 PM IST

SITच्या अधिकारांबाबत मुख्यमंत्री घेणार चितळे समितीची भेट

07 मार्च

सिंचन घोटाळाच्या चौकशीसाठी माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एसआयटीची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भेट घेणार आहेत. आणि समितीला नेमके कोणते अधिकार पाहिजेत, याविषयी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी अमरावतीत ही माहिती दिलीय. समितीला नेमून दिलेल्या कार्यकक्षेत घोटाळ्याचा आरोप असलेले अधिकारी किंवा राजकारण्यांच्या चौकशी किंवा उलट तपासणीबाबतचा कुठलाही मुद्दा नाही, असं खुद्द समितीचे अध्यक्ष माधव चितळे यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चितळे समिती सदस्याची भेट घेणार आहेत.

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय एसआयटी नेमण्यात आली. पण या चौकशी समितीला सिंचन घोटाळ्यातल्या राजकारणी आणि अधिकार्‍यांची चौकशी करण्याचा अधिकारच देण्यात आलेला नाही. या समितीला नेमून दिलेल्या कार्यकक्षेत घोटाळ्याचा आरोप असलेले अधिकारी किंवा राजकारण्यांच्या चौकशी आणि उलट तपासणीबाबतचा कुठलाही मुद्दा नाही, असं खुद्द समितीचे अध्यक्ष माधव चितळे यांनी स्पष्ट केलंय. चितळे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना पत्र लिहून ही बाब कळवलीय. गेल्या वर्षी 16 डिसेंबरला सिंचनाच्या चौकशीसाठी माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर पंधरा दिवसांनी इतर तीन सदस्यांचीही नेमणूक करण्यात आली होती. पण या समितीला केवळ प्रशासकीय अनियमितता तपासण्याचेच निर्देश देण्यात आले आणि सहा महिन्यांच्या आत अहवाल सादर करायला सांगितलंय. दरम्यान, राजकारणी आणि अधिकार्‍यांची चौकशी होणार नसेल तर कोर्टात जाण्याचा इशारा विरोधकांनी दिलाय. तर सिंचन घोटाळ्याच्या फौजदारी तपासाचे निर्देश एसआयटीला देण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्ते प्रविण वाटेगावकर यांनी मुंबई हायकोर्टाला केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2013 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close