S M L

प्रदेशाध्यक्षपदावरून गडकरी-मुंडे आमनेसामने

विनोद तळेकर, मुंबई05 फेब्रुवारीभाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही प्रदेशाध्यक्षाची निवड अतिशय महत्वाची असल्याने या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता जास्त आहे. मुंडे पुन्हा राज्यात सक्रीय झाल्याने पुन्हा एकदा मुंडे विरूद्ध गडकरी असा सामना या निवड प्रक्रियेदरम्यानही पाहायला मिळेल.मुंबईत मंगळवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालीय. राज्यातल्या पक्षांतर्गत सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्षाच्या निवडणुकीची औपचारिक चर्चा पार पडली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांची नावं चर्चेत आहेत. पण भाजपचं केंद्रीय नेतृत्व अजूनही मुनगंटीवार यांना कायम ठेवण्याच्या बाजूने आहे. पण मुंडे गटाला मात्र 2014 विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर प्रदेशाध्यक्षपदी आपला माणूस असावा असं वाटतंय. अगदीच हे शक्य झालं नाही तर किमान देवेंद्र फडणवीसांसारख्या दोन्ही गटाला मान्य असलेल्या नेत्याला या पदावर बसवावे यासाठी मुंडे गट प्रयत्नशील आहे.नेहमीच्या प्रथेप्रमाणे या वेळीही प्रदेशाध्यक्षपदाची निवड एकमताने पार पडणार आहे. पण त्याआधी पडद्याआधी बर्‍याच घडामोडी घडणार. त्यामुळे पुढचा किमान महिनाभर भाजपच्या पक्षांतर्गत घडामोडींना वेग येणार हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2013 03:01 PM IST

प्रदेशाध्यक्षपदावरून गडकरी-मुंडे आमनेसामने

विनोद तळेकर, मुंबई

05 फेब्रुवारी

भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही प्रदेशाध्यक्षाची निवड अतिशय महत्वाची असल्याने या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता जास्त आहे. मुंडे पुन्हा राज्यात सक्रीय झाल्याने पुन्हा एकदा मुंडे विरूद्ध गडकरी असा सामना या निवड प्रक्रियेदरम्यानही पाहायला मिळेल.

मुंबईत मंगळवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालीय. राज्यातल्या पक्षांतर्गत सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्षाच्या निवडणुकीची औपचारिक चर्चा पार पडली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांची नावं चर्चेत आहेत. पण भाजपचं केंद्रीय नेतृत्व अजूनही मुनगंटीवार यांना कायम ठेवण्याच्या बाजूने आहे. पण मुंडे गटाला मात्र 2014 विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर प्रदेशाध्यक्षपदी आपला माणूस असावा असं वाटतंय. अगदीच हे शक्य झालं नाही तर किमान देवेंद्र फडणवीसांसारख्या दोन्ही गटाला मान्य असलेल्या नेत्याला या पदावर बसवावे यासाठी मुंडे गट प्रयत्नशील आहे.

नेहमीच्या प्रथेप्रमाणे या वेळीही प्रदेशाध्यक्षपदाची निवड एकमताने पार पडणार आहे. पण त्याआधी पडद्याआधी बर्‍याच घडामोडी घडणार. त्यामुळे पुढचा किमान महिनाभर भाजपच्या पक्षांतर्गत घडामोडींना वेग येणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2013 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close