S M L

अखेर सरकार झुकले, केंद्रेकरच बीडचे जिल्हाधिकारी !

22 फेब्रुवारीबीडकरांचे आंदोलन आणि प्रसारमाध्यमांच्या पाठपुराव्यापुढे अखेर सरकारला झुकावे लागले. बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना बीडमध्येच रुजू होण्याचे सरकारने आदेश दिले आहे. बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयाने याबाबत आदेश दिले आहे. आयबीएन-लोकमतनं या बातमीचा सातत्यानं पाठपुरावा केला. केंद्रेकर यांच्या पाठीशी बीडकर खंबीरपणे उभे राहिले होते, त्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. दरम्यान, आजही बीडमध्ये ठिकठिकाणी धरणं आंदोलन करण्यात आली. कालपासून बीड बंद पाळण्यात आला आणि आंदोलनही करण्यात आली. पण त्याचबरोबर केंद्रेकरांचं मूळ गाव असलेल्या परभणीतल्या झरीचे ग्रामस्थही केंद्रेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आज झरी इथं गावकर्‍यांनी बंद पुकारून राज्य सरकारचा निषेध करीत केंद्रेकर यांना पुन्हा सन्मानाने रूजू करून घेण्याची मागणी केली. बीडचे जिल्हाधिकारी सुनील मधुकर केंद्रकर हे मूळ परभणी तालुक्यातील 22 हजार लोकवस्तीच्या झरी या गावचे. त्यामुळेच केंद्रेकर यांच्या पाठिंब्यासाठी आज झरी ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेवत त्यांना पाठींबा दर्शवला. शिवाय तात्काळ केंद्रेकर यांना सन्मानाने रूजू करून घ्यावे अशी सरकारकडे मागणी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2013 04:08 PM IST

अखेर सरकार झुकले, केंद्रेकरच बीडचे जिल्हाधिकारी !

22 फेब्रुवारी

बीडकरांचे आंदोलन आणि प्रसारमाध्यमांच्या पाठपुराव्यापुढे अखेर सरकारला झुकावे लागले. बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना बीडमध्येच रुजू होण्याचे सरकारने आदेश दिले आहे. बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयाने याबाबत आदेश दिले आहे. आयबीएन-लोकमतनं या बातमीचा सातत्यानं पाठपुरावा केला. केंद्रेकर यांच्या पाठीशी बीडकर खंबीरपणे उभे राहिले होते, त्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. दरम्यान, आजही बीडमध्ये ठिकठिकाणी धरणं आंदोलन करण्यात आली. कालपासून बीड बंद पाळण्यात आला आणि आंदोलनही करण्यात आली. पण त्याचबरोबर केंद्रेकरांचं मूळ गाव असलेल्या परभणीतल्या झरीचे ग्रामस्थही केंद्रेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आज झरी इथं गावकर्‍यांनी बंद पुकारून राज्य सरकारचा निषेध करीत केंद्रेकर यांना पुन्हा सन्मानाने रूजू करून घेण्याची मागणी केली. बीडचे जिल्हाधिकारी सुनील मधुकर केंद्रकर हे मूळ परभणी तालुक्यातील 22 हजार लोकवस्तीच्या झरी या गावचे. त्यामुळेच केंद्रेकर यांच्या पाठिंब्यासाठी आज झरी ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेवत त्यांना पाठींबा दर्शवला. शिवाय तात्काळ केंद्रेकर यांना सन्मानाने रूजू करून घ्यावे अशी सरकारकडे मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2013 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close