S M L

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 12 मुली आणि 5 एजंटना अटक

29 जानेवारीपुण्यातील उच्चभ्रू वसाहतीत वेश्या व्यवसाय करणार्‍या 12 मुली आणि 5 एजंटना पोलिसांनी धाड टाकून अटक केली आहे. कोरेगांवपार्क भागातील गोल्ड फिल्ड प्लाझा सोसायटीमधील फ्लॅटमध्ये बर्‍याच दिवसांपासून हा वेश्या व्यवसाय करण्यात येतो अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानं या फ्लॅटवर धाड टाकून ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये एक उजबेकीस्तान, एक बांगलादेशी आणि एका नेपाळी मुलीचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या मुली आणि एजंटवर पिटा ऍक्टअंर्तगत कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मुलींना आणि एजंटला आज पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणातील एजंटला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2013 02:43 PM IST

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 12 मुली आणि 5 एजंटना अटक

29 जानेवारी

पुण्यातील उच्चभ्रू वसाहतीत वेश्या व्यवसाय करणार्‍या 12 मुली आणि 5 एजंटना पोलिसांनी धाड टाकून अटक केली आहे. कोरेगांवपार्क भागातील गोल्ड फिल्ड प्लाझा सोसायटीमधील फ्लॅटमध्ये बर्‍याच दिवसांपासून हा वेश्या व्यवसाय करण्यात येतो अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानं या फ्लॅटवर धाड टाकून ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये एक उजबेकीस्तान, एक बांगलादेशी आणि एका नेपाळी मुलीचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या मुली आणि एजंटवर पिटा ऍक्टअंर्तगत कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मुलींना आणि एजंटला आज पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणातील एजंटला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2013 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close