S M L

'युपीएससी'ला प्रादेशिक भाषेचं वावडं

06 मार्चयुपीएससीच्या (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात यंदाच्या वर्षी बदल करण्यात आला आहे. आयोगाने प्रादेशिक भाषांचा पर्यायच काढून टाकला आहे. आयोगाच्या वेबसाईटवर सादर केलेल्या नव्या अभ्यासक्रमावरुन हे स्पष्ट झालंय. पूर्वीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन वैकल्पिक विषयांची निवड करणे अत्यावश्यक होते. त्यामध्ये इंग्रजी आणि कोणतीही एक प्रादेशिक भाषा यांच्या समावेष होता. भारतीय प्रशासकीय सेवेत उच्च पदावर काम करणार्‍या प्रत्येक अधिकार्‍याला किमान एक तरी भारतीय भाषेची चांगली येत असावी असा त्यामागे हेतू होता. नव्या अभ्यासक्रमात या दोन विकल्पांना फाटा देण्यात आल्याने प्रादेशिक भाषा हा विषयच बाद करण्यात आल्याचं स्पष्टं झालं आहे. तसेच सामान्यज्ञान या विषयामध्ये नितीमूल्ये, एकात्मिता आणि कौशल्य या विषयावर पहिल्यांदाच पेपर असेल. तसेच परीक्षा 18 मेऐवजी 26 मे रोजी घेण्यात येणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी आयोगाच्या या निर्णयाला विरोध केला आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा विकल्प रद्द करू नका या मागणीसाठी शिवसेनेने मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाजवळ एक आंदोलन केलं. शिवसेनेच्या स्थानिय लोकाधिकार समितीमार्फत छेडलेल्या या आंदोलनानंतर लगेच एक निवेदन शिवसेनेच्या खासदारांमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयात देण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यात सध्या मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर अशी तीनच परीक्षा केंद्र आहेत. त्यामुळे परिक्षाथीर्ंची होणारी गैरसोय टाळण्यासाठी अजून तीन ते चार परीक्षा केंद्र सुरू करा अशी मागणीही आंदोलकांच्यावतीने करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2013 09:54 AM IST

'युपीएससी'ला प्रादेशिक भाषेचं वावडं

06 मार्च

युपीएससीच्या (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात यंदाच्या वर्षी बदल करण्यात आला आहे. आयोगाने प्रादेशिक भाषांचा पर्यायच काढून टाकला आहे. आयोगाच्या वेबसाईटवर सादर केलेल्या नव्या अभ्यासक्रमावरुन हे स्पष्ट झालंय. पूर्वीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन वैकल्पिक विषयांची निवड करणे अत्यावश्यक होते. त्यामध्ये इंग्रजी आणि कोणतीही एक प्रादेशिक भाषा यांच्या समावेष होता. भारतीय प्रशासकीय सेवेत उच्च पदावर काम करणार्‍या प्रत्येक अधिकार्‍याला किमान एक तरी भारतीय भाषेची चांगली येत असावी असा त्यामागे हेतू होता. नव्या अभ्यासक्रमात या दोन विकल्पांना फाटा देण्यात आल्याने प्रादेशिक भाषा हा विषयच बाद करण्यात आल्याचं स्पष्टं झालं आहे. तसेच सामान्यज्ञान या विषयामध्ये नितीमूल्ये, एकात्मिता आणि कौशल्य या विषयावर पहिल्यांदाच पेपर असेल. तसेच परीक्षा 18 मेऐवजी 26 मे रोजी घेण्यात येणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी आयोगाच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा विकल्प रद्द करू नका या मागणीसाठी शिवसेनेने मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाजवळ एक आंदोलन केलं. शिवसेनेच्या स्थानिय लोकाधिकार समितीमार्फत छेडलेल्या या आंदोलनानंतर लगेच एक निवेदन शिवसेनेच्या खासदारांमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयात देण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यात सध्या मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर अशी तीनच परीक्षा केंद्र आहेत. त्यामुळे परिक्षाथीर्ंची होणारी गैरसोय टाळण्यासाठी अजून तीन ते चार परीक्षा केंद्र सुरू करा अशी मागणीही आंदोलकांच्यावतीने करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2013 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close