S M L

हैदराबाद बॉम्बस्फोट मुजाहिद्दीनचं कृत्य ?

22 फेब्रुवारीहैदराबादमध्ये झालेल्या साखळी स्फोटांना 24 तास उलटून गेले आहे. या स्फोटांचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बॉम्बस्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीन असल्य्lााचा संशय आता बळावत चालला आहे. मात्र या स्फोटांमागे कुठलं मॉड्युल आहे, याचा शोध सुरु आहे. इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या यासीन भटकळ याचे मनू उर्फ तरबेज आणि वकार हे महत्त्वाचे साथीदार देशातील अनेक बॉम्बस्फोटात सहभागी आहेत. हैदराबाद स्फोटांमध्येही संशयाची सुई त्यांच्याकडेच जाते.हैदराबादच्या दिलसुख नगरमध्ये 2 स्फोट होऊन चोवीस तास उलटण्याच्या आतच पोलिसांच्या हाती काही महत्त्वाच्या लीड्स मिळाल्या आहेत. या बॉम्ब स्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटना असल्याचं दाट संशय तपास संस्थांना आहे. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार.. मुजाहिद्दीनचं कृत्य ?- इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयितांनी दिल्ली पोलिसांकडे कबुली दिली की त्यांनी दिलसुखनगर भागाची पाहणी केली होती- स्फोटाच्या ठिकाणी अमोनियम नायट्रेट, युरिया आणि पेट्रोल सापडलंय- हैदराबाद पोलिसांना 3 विशिष्ट व्यक्तींवर संशय- त्यातला एक संशयित उत्तर प्रदेश, दुसरा बिहार, तर तिसरा झारखंडचा- हे तिघे हैदराबादमधल्या एक लॉजमध्ये राहत होते- 18 जानेवारीला लॉजवर धाड टाकण्यात आली होती, पण ते निसटलेपुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटत आणि हैदराबाद इथे झालेल्या बॉम्ब स्फोटात अनेक साधर्म्य आहेत. ऑगस्ट 2012 मध्ये पुण्यात फुटलेले चारही बाँब सायकलवरच्या टिफीन बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. ही इंडियन मुजाहिद्दीनची पद्धत आहे. महाराष्ट्र एटीएसने यापूर्वी इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांना मोस्ट वॉण्टेड म्हणून घोषित केलंय.मुजाहिद्दीनचे मोस्ट वाँटेड1. यासिन भटकळ (हा इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या आहे)2. तरबेज (हा पुणे आणि मुंबई स्फोटांतला संशयित आहे)3. तहसीन वसीम शेख उर्फ मनू (हा जुलै 2011 मुंबई स्फोटातला संशयित आहे)4. वकार उर्फ अहमद हे चौघेही सध्या कुठे आहेत, याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांकडे नाही. यासीनच्या इशार्‍यांवरून तरबेज आणि वकारने हैदराबाद स्फोट घडवले आहेत का, याबद्दल तपास सुरू आहे. अफझलला 8 दिवसांपूर्वी फाशी देण्यात आली. केवळ 8 दिवसांत एवढं प्लॅनिंग करता येत नाही, म्हणून या दोन घटनांचा संबंध नसावा, असा दावा पोलिसांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2013 05:09 PM IST

हैदराबाद बॉम्बस्फोट मुजाहिद्दीनचं कृत्य ?

22 फेब्रुवारी

हैदराबादमध्ये झालेल्या साखळी स्फोटांना 24 तास उलटून गेले आहे. या स्फोटांचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बॉम्बस्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीन असल्य्lााचा संशय आता बळावत चालला आहे. मात्र या स्फोटांमागे कुठलं मॉड्युल आहे, याचा शोध सुरु आहे. इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या यासीन भटकळ याचे मनू उर्फ तरबेज आणि वकार हे महत्त्वाचे साथीदार देशातील अनेक बॉम्बस्फोटात सहभागी आहेत. हैदराबाद स्फोटांमध्येही संशयाची सुई त्यांच्याकडेच जाते.

हैदराबादच्या दिलसुख नगरमध्ये 2 स्फोट होऊन चोवीस तास उलटण्याच्या आतच पोलिसांच्या हाती काही महत्त्वाच्या लीड्स मिळाल्या आहेत. या बॉम्ब स्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटना असल्याचं दाट संशय तपास संस्थांना आहे. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार..

मुजाहिद्दीनचं कृत्य ?

- इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयितांनी दिल्ली पोलिसांकडे कबुली दिली की त्यांनी दिलसुखनगर भागाची पाहणी केली होती- स्फोटाच्या ठिकाणी अमोनियम नायट्रेट, युरिया आणि पेट्रोल सापडलंय- हैदराबाद पोलिसांना 3 विशिष्ट व्यक्तींवर संशय- त्यातला एक संशयित उत्तर प्रदेश, दुसरा बिहार, तर तिसरा झारखंडचा- हे तिघे हैदराबादमधल्या एक लॉजमध्ये राहत होते- 18 जानेवारीला लॉजवर धाड टाकण्यात आली होती, पण ते निसटले

पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटत आणि हैदराबाद इथे झालेल्या बॉम्ब स्फोटात अनेक साधर्म्य आहेत. ऑगस्ट 2012 मध्ये पुण्यात फुटलेले चारही बाँब सायकलवरच्या टिफीन बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. ही इंडियन मुजाहिद्दीनची पद्धत आहे. महाराष्ट्र एटीएसने यापूर्वी इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांना मोस्ट वॉण्टेड म्हणून घोषित केलंय.

मुजाहिद्दीनचे मोस्ट वाँटेड1. यासिन भटकळ (हा इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या आहे)2. तरबेज (हा पुणे आणि मुंबई स्फोटांतला संशयित आहे)3. तहसीन वसीम शेख उर्फ मनू (हा जुलै 2011 मुंबई स्फोटातला संशयित आहे)4. वकार उर्फ अहमद

हे चौघेही सध्या कुठे आहेत, याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांकडे नाही. यासीनच्या इशार्‍यांवरून तरबेज आणि वकारने हैदराबाद स्फोट घडवले आहेत का, याबद्दल तपास सुरू आहे. अफझलला 8 दिवसांपूर्वी फाशी देण्यात आली. केवळ 8 दिवसांत एवढं प्लॅनिंग करता येत नाही, म्हणून या दोन घटनांचा संबंध नसावा, असा दावा पोलिसांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2013 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close