S M L

बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्काराची टांगती तलवार

11 मार्च12 वीच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी घातलेल्या बहिष्काराला आज 18 दिवस पूर्ण झाले. आज याबाबत ज्युनिअर शिक्षक फेडरेशनची बैठक झाली आणि त्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 19 मार्चला भायखळा ते आझाद मैदान महामोर्चा काढला जाणार आहे. तर नाशिक विभागात शिक्षण उपसंचालकांनी बहिष्कार आंदोलनात सहभागी असलेल्या शिक्षकांचं मार्च महिन्याचं वेतन न देण्याचा आदेश काढलाय. याचा तीव्र निषेधही करण्यात आला. कारण शिक्षक पेपरतपासणी वगळता सर्व कामे करत आहेत अशा वेळी वेतन रोखणं हे सरकारचं बेजबाबदारपणाचं वर्तन आहे असं फेडरेशनचं म्हणणं आहे. निवृत्त शिक्षकांकडून पेपर तपासून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. पण त्याचा फारसा फायदा होणार नसल्याचं सांगण्यात येतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2013 03:20 PM IST

बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्काराची टांगती तलवार

11 मार्च

12 वीच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी घातलेल्या बहिष्काराला आज 18 दिवस पूर्ण झाले. आज याबाबत ज्युनिअर शिक्षक फेडरेशनची बैठक झाली आणि त्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 19 मार्चला भायखळा ते आझाद मैदान महामोर्चा काढला जाणार आहे. तर नाशिक विभागात शिक्षण उपसंचालकांनी बहिष्कार आंदोलनात सहभागी असलेल्या शिक्षकांचं मार्च महिन्याचं वेतन न देण्याचा आदेश काढलाय. याचा तीव्र निषेधही करण्यात आला. कारण शिक्षक पेपरतपासणी वगळता सर्व कामे करत आहेत अशा वेळी वेतन रोखणं हे सरकारचं बेजबाबदारपणाचं वर्तन आहे असं फेडरेशनचं म्हणणं आहे. निवृत्त शिक्षकांकडून पेपर तपासून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. पण त्याचा फारसा फायदा होणार नसल्याचं सांगण्यात येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2013 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close