S M L

औरंगाबादेत ओवेसींच्या सभेसाठी कार्यकर्त्यांची कोर्टात धाव

29 जानेवारीप्रक्षोभक भाषण करून जातीय तेढ निर्माण करणारा अकबरूद्दीन ओवेसी याचा भाऊ एमआयएम पक्षाचे प्रमुख असादुद्दीन ओवेसी हे 31 जानेवारीपासून औरंगाबादच्या दौर्‍यावर असणार आहेत. दोन दिवसाच्या या दौर्‍यामध्ये होणार्‍या सभेला परवानगी नाकारल्यानं एमआयएमच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे. परवानगी नाकारली तर मोठया सभेऐवजी लहान लहान सभागृहामध्ये सभा घेतल्या जाणार आहेत. या सभांमध्ये आजी-माजी नगरसवेक, इतर पक्षातील कार्यकर्ते एमआयएममध्ये प्रवेश करणार आहेत. अकबरुद्दीन ओवेसी आणि त्यांचा भाऊ असादुद्दीन ओवेसी यांचा जुन्या हैदराबादमध्ये मोठा दबदबा आहे. नेहमी वाद निर्माण करण्यात या दोघा भावांचा हातखंडा आहे. ओवेसी बंधूंची जुन्या हैदबादमध्ये सत्ता चालते. इथल्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल दहशत आहे. आणि त्यांना विरोध करण्याची हिंमतही कोणी दाखवत नाही. त्यांचा पक्ष मजलिस-ए इत्तहदुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमचा हैदराबादमध्ये दबदबा आहे. असादुद्दीन ओवेसी हे हैदराबादमधून खासदार आहेत.स्थानिक घाणेरडं राजकरण करण्यात माहीर आहेत. चुकीच्या कारणांसाठीच नेहमी त्यांची चर्चा होते. बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2013 03:35 PM IST

औरंगाबादेत ओवेसींच्या सभेसाठी कार्यकर्त्यांची कोर्टात धाव

29 जानेवारी

प्रक्षोभक भाषण करून जातीय तेढ निर्माण करणारा अकबरूद्दीन ओवेसी याचा भाऊ एमआयएम पक्षाचे प्रमुख असादुद्दीन ओवेसी हे 31 जानेवारीपासून औरंगाबादच्या दौर्‍यावर असणार आहेत. दोन दिवसाच्या या दौर्‍यामध्ये होणार्‍या सभेला परवानगी नाकारल्यानं एमआयएमच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे. परवानगी नाकारली तर मोठया सभेऐवजी लहान लहान सभागृहामध्ये सभा घेतल्या जाणार आहेत. या सभांमध्ये आजी-माजी नगरसवेक, इतर पक्षातील कार्यकर्ते एमआयएममध्ये प्रवेश करणार आहेत. अकबरुद्दीन ओवेसी आणि त्यांचा भाऊ असादुद्दीन ओवेसी यांचा जुन्या हैदराबादमध्ये मोठा दबदबा आहे. नेहमी वाद निर्माण करण्यात या दोघा भावांचा हातखंडा आहे. ओवेसी बंधूंची जुन्या हैदबादमध्ये सत्ता चालते. इथल्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल दहशत आहे. आणि त्यांना विरोध करण्याची हिंमतही कोणी दाखवत नाही. त्यांचा पक्ष मजलिस-ए इत्तहदुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमचा हैदराबादमध्ये दबदबा आहे. असादुद्दीन ओवेसी हे हैदराबादमधून खासदार आहेत.स्थानिक घाणेरडं राजकरण करण्यात माहीर आहेत. चुकीच्या कारणांसाठीच नेहमी त्यांची चर्चा होते. बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2013 03:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close