S M L

कोल्हापूरमध्ये कर्जमाफीची होणार फेरतपासणी

06 मार्चनवी दिल्ली : 2009 सालच्या पंतप्रधान कर्जमाफी घोटाळ्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामधे तब्बल 43 हजार 631 शेतकर्‍यांना 112 कोटी 88 लाख रूपयांची रक्कम जादा दिली गेल्याचं नाबार्डच्या तपासणीदरम्यान उघड झालंय. ही जादा वाटली गेलेली रक्कम नाबार्डनं कोल्हापूर जिल्हा बँकेकडून वसूल केलीय. पण ज्या विविध कार्यकारी सोसायट्यांनी ही रक्कम नियमबाह्य पध्दतीने शेतकर्‍यांना दिलीय त्या सोसायट्यांना आता राजकीय दबावाखाली दिलेली रक्कम शेतकर्‍यांकडून परत मिळवताना कसरत करावी लागणार आहे. कागल शिरोळ कुरूंदवाड भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मार्फत ज्या शेतकर्‍यांना हे कोट्यवधी रूपये दिले गेलेत ते हसन मुश्रीफ यांच्या राजकीय प्रभाव क्षेत्रात येत असल्यानं संशाची सुई मुश्रीकांकडे आहे. पण मुश्रीफांनी सर्व आरोप फेटाळलेत. विशेष म्हणजे कोल्हापूरतला सर्व कर्जमाफी घोटाळा काय आहे हे ज्या नाबार्डच्या अहवालात स्पष्ट केलं गेलंय तो अहवाल नाबार्डनं केंद्र सरकारकडे दिलाय. आता केंद्र सरकारच्या आदेशाची नाबार्ड वाट पहातंय. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातल्या कर्जमाफीची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. नवी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नाबार्डनं हा आदेश दिलाय. कोल्हापूर : कर्जमाफी घोटाळा- कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकूण 1 लाख 91 हजार 66 शेतकर्‍यांसाठी 280.99 कोटी इतकी रक्कम कर्जमाफीसाठी देण्यात आली.- यापैकी 1 लाख 47 हजार 435 शेतकर्‍यांना नियमानुसार कर्जमाफीसाठी 127.97 कोटी देण्यात आले. - गैरव्यवहार आहे तो उरलेल्या 43 हजार 631 शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जमाफीत.- या 43 हजार 631 शेतकर्‍यांना 41.92 कोटी रक्कम कर्जमाफीसाठी द्यायची होती.- पण त्यांना पात्र रकमेपेक्षा 111.10 कोटी रुपये जास्त देण्यात आले.- याशिवाय कर्जसवलतीचे 1.78 कोटी रुपयेसुद्धा असेच जास्त देण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2013 10:32 AM IST

कोल्हापूरमध्ये कर्जमाफीची होणार फेरतपासणी

06 मार्च

नवी दिल्ली : 2009 सालच्या पंतप्रधान कर्जमाफी घोटाळ्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामधे तब्बल 43 हजार 631 शेतकर्‍यांना 112 कोटी 88 लाख रूपयांची रक्कम जादा दिली गेल्याचं नाबार्डच्या तपासणीदरम्यान उघड झालंय. ही जादा वाटली गेलेली रक्कम नाबार्डनं कोल्हापूर जिल्हा बँकेकडून वसूल केलीय. पण ज्या विविध कार्यकारी सोसायट्यांनी ही रक्कम नियमबाह्य पध्दतीने शेतकर्‍यांना दिलीय त्या सोसायट्यांना आता राजकीय दबावाखाली दिलेली रक्कम शेतकर्‍यांकडून परत मिळवताना कसरत करावी लागणार आहे. कागल शिरोळ कुरूंदवाड भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मार्फत ज्या शेतकर्‍यांना हे कोट्यवधी रूपये दिले गेलेत ते हसन मुश्रीफ यांच्या राजकीय प्रभाव क्षेत्रात येत असल्यानं संशाची सुई मुश्रीकांकडे आहे. पण मुश्रीफांनी सर्व आरोप फेटाळलेत. विशेष म्हणजे कोल्हापूरतला सर्व कर्जमाफी घोटाळा काय आहे हे ज्या नाबार्डच्या अहवालात स्पष्ट केलं गेलंय तो अहवाल नाबार्डनं केंद्र सरकारकडे दिलाय. आता केंद्र सरकारच्या आदेशाची नाबार्ड वाट पहातंय. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातल्या कर्जमाफीची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. नवी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नाबार्डनं हा आदेश दिलाय.

कोल्हापूर : कर्जमाफी घोटाळा

- कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकूण 1 लाख 91 हजार 66 शेतकर्‍यांसाठी 280.99 कोटी इतकी रक्कम कर्जमाफीसाठी देण्यात आली.- यापैकी 1 लाख 47 हजार 435 शेतकर्‍यांना नियमानुसार कर्जमाफीसाठी 127.97 कोटी देण्यात आले. - गैरव्यवहार आहे तो उरलेल्या 43 हजार 631 शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जमाफीत.- या 43 हजार 631 शेतकर्‍यांना 41.92 कोटी रक्कम कर्जमाफीसाठी द्यायची होती.- पण त्यांना पात्र रकमेपेक्षा 111.10 कोटी रुपये जास्त देण्यात आले.- याशिवाय कर्जसवलतीचे 1.78 कोटी रुपयेसुद्धा असेच जास्त देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2013 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close