S M L

खाण कामगारांच्या स्थितीबाबत चौकशीचे आदेश

04 मार्चअखेर नागपूर आणि भंडार्‍यातल्या मॉईल खाणीतल्या कामगारांच्या दुरवस्थेची प्रशासनाने दखल घेतली आहे. कामगारांच्या स्थितीबाबत चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अध्यक्षांनी दिले आहेत. नागपूर आणि भंडार्‍यात 10 हजार कामगारांचे जीव धोक्यात आलेत. मँगनीझ ओअर्स इंडिया लिमिटेड (मॉईल)च्या 9 खाणींमधला हा प्रकार आहेत. कंत्राटी कामगारांसाठीच्या सुरक्षिततेचे सर्व नियम इथे धाब्यावर बसववण्यात आले आहे. इथे कामगारांना हँडग्लोव्ज नाहीत, गम बुट नाहीत आणि हेल्मेटसुद्धा देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे इथं खाण कामगारांच्या सुरक्षिततेच्या कायद्यांचं उघड उल्लंघन होतंय. कामगारांना अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत. काही कामगारांना गँगरीन झालेत. पण त्याकडे कंपनीनं साफ दुर्लक्ष केलंय. याविषयी आम्ही मॉईलच्या महाव्यवस्थापकांशी बोलायचा प्रयत्न केला. पण त्यांनी बोलायला नकार दिला. पण एकीकडे कामगारांचे शोषण सुरू असताना मॉईल मात्र सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करतंय. कामगारांच्या या दुरवस्थेचा पाठपुरावा आम्ही केला. त्याची दखल घेऊन स्थितीबाबत चौकशी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2013 02:39 PM IST

खाण कामगारांच्या स्थितीबाबत चौकशीचे आदेश

04 मार्च

अखेर नागपूर आणि भंडार्‍यातल्या मॉईल खाणीतल्या कामगारांच्या दुरवस्थेची प्रशासनाने दखल घेतली आहे. कामगारांच्या स्थितीबाबत चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अध्यक्षांनी दिले आहेत. नागपूर आणि भंडार्‍यात 10 हजार कामगारांचे जीव धोक्यात आलेत. मँगनीझ ओअर्स इंडिया लिमिटेड (मॉईल)च्या 9 खाणींमधला हा प्रकार आहेत. कंत्राटी कामगारांसाठीच्या सुरक्षिततेचे सर्व नियम इथे धाब्यावर बसववण्यात आले आहे. इथे कामगारांना हँडग्लोव्ज नाहीत, गम बुट नाहीत आणि हेल्मेटसुद्धा देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे इथं खाण कामगारांच्या सुरक्षिततेच्या कायद्यांचं उघड उल्लंघन होतंय. कामगारांना अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत. काही कामगारांना गँगरीन झालेत. पण त्याकडे कंपनीनं साफ दुर्लक्ष केलंय. याविषयी आम्ही मॉईलच्या महाव्यवस्थापकांशी बोलायचा प्रयत्न केला. पण त्यांनी बोलायला नकार दिला. पण एकीकडे कामगारांचे शोषण सुरू असताना मॉईल मात्र सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करतंय. कामगारांच्या या दुरवस्थेचा पाठपुरावा आम्ही केला. त्याची दखल घेऊन स्थितीबाबत चौकशी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2013 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close