S M L

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो शावेझ यांचं निधन

06 मार्चव्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो शावेझ यांचे मंगळवारी कर्करोगानं निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. गेले 14 वर्षे ते राष्ट्राध्यक्षपदी होते. दोन वर्षापूर्वी कर्करोगाने ग्रासल्यानं त्यांच्यावर मायदेशात आणि क्युबामध्ये अनेक शस्त्रक्रिया झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. सोमवारी संध्याकाळी व्हेनेझुएलाच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. व्हेनेझुएलाच्या राज्यघटनेप्रमाणे आता एक महिन्याच्या आत नवीन अध्यक्ष निवडवा लागेल. शावेझ यांनी आपला वारस म्हणून निवड केलेले निकोलस मादुरो त्यासाठी पुढं येतील अशी अपेक्षा आहे. शावेझ यांच्या अमेरिकाविरोधामुळे त्यांच्याविषयी जागतिक पातळीवर टोकाची मतं होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2013 10:55 AM IST

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो शावेझ यांचं निधन

06 मार्च

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो शावेझ यांचे मंगळवारी कर्करोगानं निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. गेले 14 वर्षे ते राष्ट्राध्यक्षपदी होते. दोन वर्षापूर्वी कर्करोगाने ग्रासल्यानं त्यांच्यावर मायदेशात आणि क्युबामध्ये अनेक शस्त्रक्रिया झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. सोमवारी संध्याकाळी व्हेनेझुएलाच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. व्हेनेझुएलाच्या राज्यघटनेप्रमाणे आता एक महिन्याच्या आत नवीन अध्यक्ष निवडवा लागेल. शावेझ यांनी आपला वारस म्हणून निवड केलेले निकोलस मादुरो त्यासाठी पुढं येतील अशी अपेक्षा आहे. शावेझ यांच्या अमेरिकाविरोधामुळे त्यांच्याविषयी जागतिक पातळीवर टोकाची मतं होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2013 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close