S M L

विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा 145 मतदारसंघांवर दावा

08 मार्चविधानसभेसाठी राष्ट्रवादीने 145 मतदार संघांवर दावा केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या, अशा 145 जागांवर राष्ट्रवादीनं दावा केला आहे. प्रदेश राष्ट्रवादीचे समन्वयक वसंत वाणी यांनी ही घोषणा केलीय. अजित पवारांनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो का या प्रश्नावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असंही वाणी म्हणाले. तसेच शरद पवारांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी तयार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्यासाठी गरज पडली तर उपोषण करण्याची तयारीही त्यांनी दाखवलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2013 03:56 PM IST

विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा 145 मतदारसंघांवर दावा

08 मार्च

विधानसभेसाठी राष्ट्रवादीने 145 मतदार संघांवर दावा केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या, अशा 145 जागांवर राष्ट्रवादीनं दावा केला आहे. प्रदेश राष्ट्रवादीचे समन्वयक वसंत वाणी यांनी ही घोषणा केलीय. अजित पवारांनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो का या प्रश्नावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असंही वाणी म्हणाले. तसेच शरद पवारांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी तयार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्यासाठी गरज पडली तर उपोषण करण्याची तयारीही त्यांनी दाखवलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2013 03:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close