S M L

रेल्वे बजेट : महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता

26 फेब्रुवारीआज रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी 2013-14 चे रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये 67 नवीन एक्स्प्रेस आणि 27 नवीन पॅसेंजर रेल्वे गाड्यांची घोषणा बन्सल यांनी केली. मात्र या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त तीनच नवीन गाड्या आल्या आहेत. पंढरपूर-विजापूर व्हाया मंगळवेढा, वाशिम-अदिलाबाद आणि परभणी- मनमाड या नवीन गाड्या मिळाल्या आहेत. तर देशाची उपराजधानी नागपूरमध्ये मिनरल वॉटर बॉटलिंग प्लांट आणि विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या रेल्वे बजेटवर महाराष्ट्रातले खासदार चांगलेच संतापले आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे रेल्वे बजेट नसून रायबरेली बजेट आहे. या बजेटमध्ये फक्त रायबरेलीकडे लक्ष देण्यात आलं आहे. त्यामुळे हे रायबरेली बजेट आहे का असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे हे बजेट अन्याय करणारे बजेट आहे अशी टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.महाराष्ट्राला काय मिळालं ?- नागपूरमध्ये मिनरल वॉटर बॉटलिंग प्लांट- नागपूरमध्ये विशेष प्रशिक्षण केंद्र- पंढरपूर-विजापूर व्हाया मंगळवेढा नवी गाडी- वाशिम-अदिलाबाद नवी गाडी- परभणी-मनमाड नवी गाडी- नागपूर-नागभीड मार्गांचं गेजमध्ये रुपांतरमेल एक्स्प्रेस- अजनी(नागपूर) - लोकमान्य टिळक टर्मिनस व्हाया हिंगोली- वांद्रे टर्मिनस - रामपूर (लखनौ)- वांद्रे टर्मिनस - जैसलमेर- वांद्रे टर्मिनस - हिसार- वांद्रे टर्मिनस - हरिद्वार- हजरत निजामुद्दीन - मुंबई सेंट्रल एसी (आठवड्यातून एकदा)- हुबळी - मुंबई व्हाया मिरज, पुणे (आठवड्यातून एकदा)- काकीनाडा - मुंबई एक्स्प्रेस (आठवड्यातून दोनदा)- कालका - साईनगर (शिर्डी) (आठवड्यातून दोनदा)- लोकमान्य टिळक टर्मिनस - कोचीवेली (आठवड्यातून एकदा)- मुंबई - सोलापूर व्हाया पुणे (आठवड्यातून सहावेळा)- निजामाबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस (आठवड्यातून एकदा)- पुरी - शिर्डी व्हाया नागपूर (आठवड्यातून एकदा)- उना(पंजाब) - नांदेड (आठवड्यातून एकदा)नव्या पॅसेंजर गाड्या- मडगाव-रत्नागिरी (दररोज)- न्यू अमरावती ते नारखेड (दररोज)- पूर्णा-परळी वैजनाथ (दररोज)गाड्यांचा विस्तार- लोकमान्य टिळक टर्मिनस - भुवनेश्वर एक्स. आता पूरीपर्यंत- लोकमान्य टिळक टर्मिनस - दरभंगा आता रखसौलपर्यंत- सीएसटी - लातूर आता नांदेडपर्यंत- भुसावळ - अमरावती एक्स. आता नांदेडपर्यंत- सोलापूर - यशवंतपूर एक्स. आता म्हैसूरपर्यंत

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2013 02:28 PM IST

रेल्वे बजेट : महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता

26 फेब्रुवारी

आज रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी 2013-14 चे रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये 67 नवीन एक्स्प्रेस आणि 27 नवीन पॅसेंजर रेल्वे गाड्यांची घोषणा बन्सल यांनी केली. मात्र या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त तीनच नवीन गाड्या आल्या आहेत. पंढरपूर-विजापूर व्हाया मंगळवेढा, वाशिम-अदिलाबाद आणि परभणी- मनमाड या नवीन गाड्या मिळाल्या आहेत. तर देशाची उपराजधानी नागपूरमध्ये मिनरल वॉटर बॉटलिंग प्लांट आणि विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या रेल्वे बजेटवर महाराष्ट्रातले खासदार चांगलेच संतापले आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे रेल्वे बजेट नसून रायबरेली बजेट आहे. या बजेटमध्ये फक्त रायबरेलीकडे लक्ष देण्यात आलं आहे. त्यामुळे हे रायबरेली बजेट आहे का असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे हे बजेट अन्याय करणारे बजेट आहे अशी टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.महाराष्ट्राला काय मिळालं ?

- नागपूरमध्ये मिनरल वॉटर बॉटलिंग प्लांट- नागपूरमध्ये विशेष प्रशिक्षण केंद्र- पंढरपूर-विजापूर व्हाया मंगळवेढा नवी गाडी- वाशिम-अदिलाबाद नवी गाडी- परभणी-मनमाड नवी गाडी- नागपूर-नागभीड मार्गांचं गेजमध्ये रुपांतर

मेल एक्स्प्रेस- अजनी(नागपूर) - लोकमान्य टिळक टर्मिनस व्हाया हिंगोली- वांद्रे टर्मिनस - रामपूर (लखनौ)- वांद्रे टर्मिनस - जैसलमेर- वांद्रे टर्मिनस - हिसार- वांद्रे टर्मिनस - हरिद्वार- हजरत निजामुद्दीन - मुंबई सेंट्रल एसी (आठवड्यातून एकदा)- हुबळी - मुंबई व्हाया मिरज, पुणे (आठवड्यातून एकदा)- काकीनाडा - मुंबई एक्स्प्रेस (आठवड्यातून दोनदा)- कालका - साईनगर (शिर्डी) (आठवड्यातून दोनदा)- लोकमान्य टिळक टर्मिनस - कोचीवेली (आठवड्यातून एकदा)- मुंबई - सोलापूर व्हाया पुणे (आठवड्यातून सहावेळा)- निजामाबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस (आठवड्यातून एकदा)- पुरी - शिर्डी व्हाया नागपूर (आठवड्यातून एकदा)- उना(पंजाब) - नांदेड (आठवड्यातून एकदा)

नव्या पॅसेंजर गाड्या- मडगाव-रत्नागिरी (दररोज)- न्यू अमरावती ते नारखेड (दररोज)- पूर्णा-परळी वैजनाथ (दररोज)

गाड्यांचा विस्तार- लोकमान्य टिळक टर्मिनस - भुवनेश्वर एक्स. आता पूरीपर्यंत- लोकमान्य टिळक टर्मिनस - दरभंगा आता रखसौलपर्यंत- सीएसटी - लातूर आता नांदेडपर्यंत- भुसावळ - अमरावती एक्स. आता नांदेडपर्यंत- सोलापूर - यशवंतपूर एक्स. आता म्हैसूरपर्यंत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2013 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close