S M L

पेट्रोल 1 रूपया 40 पैशांनी महागले

01 मार्चकेंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांनी देशाचे अर्थसंकल्प सादर करून 48 तास उलटले नाही तोच सर्वसामान्यांवर दरवाढीचा पेट्रोल 'बॉम्ब' फोडला आहे. पेट्रोलच्या दरात 1 रूपया 40 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. यादरवाढीनुसार राज्या-राज्यात दरात तफावत असू शकते. ही दरवाढ राज्याप्रमाणे 2 रुपयांपर्यंत असू शकते. दोन दिवसांपूर्वीचं पेट्रोल दरवाढीचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी सरकारला कळवला होता. आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड इंधनात झालेली वाढ आणि रुपयाचा भाव घसरल्यामुळे पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली असं पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलंय. याअगोदर 16 फेब्रुवारीलाही पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे 1 रूपया 50 पैशांनी वाढ केली होती. तसंच गुरूवारी अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर लोकसभेत आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल मांडण्यात आला होता. जागतिक बाजारपेठेतल्या परिस्थितीनुसार डिझेल आणि एलपीजीच्या किंमती वाढवण्यात यावी अशी शिफारस या अहवालात करण्यात आली होती. अखेर आज पेट्रोल दरवाढ करून बजेटची पहिली झलक पाह्याला मिळाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2013 12:34 PM IST

पेट्रोल 1 रूपया 40 पैशांनी महागले

01 मार्च

केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांनी देशाचे अर्थसंकल्प सादर करून 48 तास उलटले नाही तोच सर्वसामान्यांवर दरवाढीचा पेट्रोल 'बॉम्ब' फोडला आहे. पेट्रोलच्या दरात 1 रूपया 40 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. यादरवाढीनुसार राज्या-राज्यात दरात तफावत असू शकते. ही दरवाढ राज्याप्रमाणे 2 रुपयांपर्यंत असू शकते. दोन दिवसांपूर्वीचं पेट्रोल दरवाढीचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी सरकारला कळवला होता. आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड इंधनात झालेली वाढ आणि रुपयाचा भाव घसरल्यामुळे पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली असं पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलंय. याअगोदर 16 फेब्रुवारीलाही पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे 1 रूपया 50 पैशांनी वाढ केली होती. तसंच गुरूवारी अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर लोकसभेत आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल मांडण्यात आला होता. जागतिक बाजारपेठेतल्या परिस्थितीनुसार डिझेल आणि एलपीजीच्या किंमती वाढवण्यात यावी अशी शिफारस या अहवालात करण्यात आली होती. अखेर आज पेट्रोल दरवाढ करून बजेटची पहिली झलक पाह्याला मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2013 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close