S M L

सावधान, नक्षलवाद्यांची नव्याने मोर्चेबांधणी !

06 मार्चगडचिरोली: नक्षलवादी आपली चळवळ मजबूत करण्यासाठी नव्यानं मोर्चेबांधणी करत आहे. यासाठी नक्षलवाद्यांची एक उच्चस्तरीय बैठक झाल्याचं कळतंय. नक्षलवादी चळवळीत महिलांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेण्याचा निर्णयही या बैठकीत झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच कडव्या हिंदुत्वाची झळ पोहोचलेल्या दलित, आदिवासींसह मागास समाजाला,अल्पसंख्यांकांना सोबत घेण्याचा निर्णय आणि शहरी भागातल्या संघटनेची नव्यानं बांधणी करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. दंडकारण्य स्पेशल झोन समितीचा सचिव कोसा याच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. या बैठकीत चळवळीचा पालिट ब्युरो सदस्य सोनुसुध्दा हजर होता. छत्तीसगड,आंध्र आणि विर्दभातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये चळवळीचे सुमारे दोन हजार सदस्य खितपत पडले असून त्यांना साधी कायदेशीर मदतसुध्दा आपण पुरवू शकत नाही याबद्दल या बैठकीत खंत व्यक्त करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2013 01:32 PM IST

सावधान, नक्षलवाद्यांची नव्याने मोर्चेबांधणी !

06 मार्च

गडचिरोली: नक्षलवादी आपली चळवळ मजबूत करण्यासाठी नव्यानं मोर्चेबांधणी करत आहे. यासाठी नक्षलवाद्यांची एक उच्चस्तरीय बैठक झाल्याचं कळतंय. नक्षलवादी चळवळीत महिलांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेण्याचा निर्णयही या बैठकीत झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच कडव्या हिंदुत्वाची झळ पोहोचलेल्या दलित, आदिवासींसह मागास समाजाला,अल्पसंख्यांकांना सोबत घेण्याचा निर्णय आणि शहरी भागातल्या संघटनेची नव्यानं बांधणी करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. दंडकारण्य स्पेशल झोन समितीचा सचिव कोसा याच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. या बैठकीत चळवळीचा पालिट ब्युरो सदस्य सोनुसुध्दा हजर होता. छत्तीसगड,आंध्र आणि विर्दभातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये चळवळीचे सुमारे दोन हजार सदस्य खितपत पडले असून त्यांना साधी कायदेशीर मदतसुध्दा आपण पुरवू शकत नाही याबद्दल या बैठकीत खंत व्यक्त करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2013 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close