S M L

अनामी रॉय पदावरून दूर : पी. पी. श्रीवास्तवांकडे तात्पुरता कार्यभार

19 फेब्रुवारी, मुंबई सुधाकर कांबळे राज्याचे पोलीस महासंचालक अनामी रॉय यांना पदावरून दूर केलं आहे. त्यांना गृहमंत्रालयानं चार आठवड्याच्या सुट्टीवर पाठवलंय. त्यांच्या नेमणुकीवरून वाद झाला होता. आता पुढचा महासंचालक नेमण्यासाठी सरकारची हालचाल सुरू झाली आहे. मात्र,पुढचा महासंचालक नेमताना घोळ निर्माण झाला आहे. सध्या राजाच्या पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कार्यभार पी. पी. श्रीवास्तव यांच्याकडे सोपवला आहे. याप्रकरणावरून रॉय यांना पदाची लालसा किती आहे, हे दिसून आलं आहे. ए.एन रॉय यांच्याबाबत मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाला, सर्वोच्च न्यायालयात आव्हानं देणार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं होतं. ए.एन.रॉय यांची येत्या पंधरा दिवसात हाकालपट्टी करावी आणि त्यांच्या जागी नवा महासंचालक नेमावा,असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले होते. मात्र,यानंतर ही महासंचालकाच्या नियुक्तीबाबत राज्य सरकार कडून कोणतीच हालचाल होत नसल्याचं दिसून येत आहे. तात्काळ हाकालपट्टी करण्या ऐवजी पोलीस महासंचालकाच्या नियुक्तीच्या वेळी रॉय यांचा ही विचार होत असल्याची चर्चा आहे. रॉय यांच्या हाकालपट्टी बाबत मुंबई हायकोर्टाने 5 फेब्रुवारी रोजी आदेश दिले होते. यावेळी देण्यात आलेली मुदत आज संपत आहे.पण यानंतर ही रॉय यांनी पद सोडलेलं नाही.तसंच राज्या सरकारने त्यांना पद सोडण्यास सांगितलं नाही. हा सर्व प्रकार म्हणजे हायकोर्टाचा अवमान असल्याचं म्हटलं जातंय.मुंबई हायकोर्टाने राज्य सरकार विरोधात ताशेरे ओढत 5 फेब्रुवारी रोजी महत्त्वपूर्ण आदेश दिला. रॉय यांना पदावरून दूर करण्याचे तसंच नवा पोलीस महासंचालक नेमण्याचा आदेश होता. रॉय यांच्या नियुक्तीमुळे राज्य सरकारची पुरती नाचक्की झाली होती. यामुळे रॉय यांच्या सदैव पाठिशी असणार्‍या आता काय निर्णय घेत याकडे लक्ष लागलं होतं. पण राज्य सरकारने हायकोर्टाच्या आदेशाचा चांगलाच धसका घेतल्याचं दिसून येतंय. काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकित रॉय यांच्या बाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्णया विरोधात सुप्रिम कोर्टात न जाण्याचा निर्णय घेतलाय.यामुळे कोणत्याही क्षणी पोलीस महासंचालक पदावरून दूर होतील.रॉय यांच्या नियुक्ती बाबत राज्य सरकारला पहिली चपराक कॅट मध्ये बसली होती. कॅट ने राज्य सरकारने कोणतीही समिती स्थापन न करता, इतर वरिष्ठ अधिकार्‍यांचा विचार न करता रॉय यांची नियुक्ती केली असल्याचं म्हटलं होतं. राज्य सरकारने रॉय यांना हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नवे पोलीस महासंचालक कोण याबाबत हालचाल सुरु झाली आहे.नियमानुसार पहिल्या चार वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांचा त्यासाठी विचार होत आहे.ते चार अधिकारी आहेत. 1970 च्या बॅचचे एस.एस.विर्क , 1972 च्या बॅचचे सुप्रकाश चक्रवर्ती, 1972 च्या बॅचचे जीवन वीरकर आणि 1972 च्या ए.एन.रॉय. विर्क हे सध्या पोलीस गृहनिर्माण विभागाचे महासंचालक आहेत.तर सुप्रकाश चक्रवर्ती हे ऍन्टीकरप्शन विभागाचे महासंचालक आहेत.तर जीवन वीरकर हे होमगार्ड विभागाचे महासंचालक आहेत.तर रॉय हे सध्या सुट्टीवर आहेत.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात येत असलेल्या अधिकार्‍यास कमीतकमी दोन वर्षाचा कालावधी मिळावा. पण विर्क जुलै 2009 मध्ये रिटायर्ड होत आहेत. चक्रवर्ती जून 2009 मध्ये रिटायर्ड होत आहेत. वीरकर जुलै 2009 मध्ये रिटायर्ड होत आहे. रॉय मे 2010 मध्ये रिटायर्ड होणार आहेत.पण रॉय यांच्या नियुक्ती वरून जो वाद झाला त्या वरून रॉय यांची नियुक्ती अशक्य आहे. यामुळे या पदावर विर्क यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.आणि येणारा काळ हा निवडणुकांचा आहे. त्यामुळे नियुक्ती झाल्यानंतर विर्क यांना सरकारला मुदत वाढ द्यावी लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2009 04:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2009 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close