S M L

दहशतवादाविरोधात मुस्लीम संघटनांची रॅली

7 डिसेंबर, मुंबईज्ञानदा दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी देशभरात विविध मुस्लीम संघटनांनी पुढाकार घेतला आहे.आणि दहशतवादाचा निषेध म्हणून सर्वत्र रॅली काढण्यात येतं आहेत. मुंबईतही मुस्लीम फॉर सेक्युलर डेमोक्रसीतर्फे अशाच प्रकारची रॅली काढण्यात आली.ही रॅली सीएसटी रेल्वे स्टेशनपासून काढण्यात आली आहे. आणि ताज, ओबेराय हॉटेलपर्यत जाणार आहे. या दहशतवाद विरोधी रॅलीत विविध मुस्लीम संघटनासोबत अनेक नागरिकांनीही भाग घेतला.या रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांना रॅलीबाबत विचारलं असता ते सांगतात, मुंबईत जे हल्ले झाले त्या हल्ल्याचं रॅलीतल्या सगळया संघटनांनी निषेध केला आहे. या हल्ल्याचं ज्याप्रमाणे हिंदू,शीख, ख्रिश्चन, पारशी यांनी निषेध केला. त्याप्रमाणे मुस्लीम समाजही ह्या हल्ल्याचा निषेध करतो आहे. मुस्लीम उलेमा संघटना या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करीत आहे. रॅलीतमधले नागरिक सांगतात, जेव्हा देशात अशाप्रकारचे दहशतवादी हल्ले होतात त्यावेळी आम्हालाही तितकंच दु:ख होतं. पण आम्ही मुस्लीम समाज आपल्या भावना जाहीरपणे सांगू शकत नाही. अशा रॅलीमधून आम्ही इस्लाम धर्माची शिकवण, शांतीचा संदेश सर्वांना सांगू शकतो. रॅलीमधले नागरिक नासिर हुसेन झकेरिया सांगतात, आम्ही या हल्ल्यांचा निषेध करत आहोत. तसेच इस्लामधर्मात कुराणमध्येअसं कुठेच लिहीलेलं नाही की, शेजा-यावर घर जाळायचं, लोकांवर हल्ले करायचे. दहशतवादी हल्ले हे जगात सगळीकडे होत आहेत. त्यामुळे आम्ही या रॅलीत जमलेले सगळे पुरुष, स्त्रिया आणि तरुणवर्ग या हल्ल्यांचा निषेध करीत आहोत. मुंबई, दिल्ली,चेन्नई तसचं हैद्राबादमध्ये अशा निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दहशतवाद विरुद्धच्या मुंबईतल्या रॅलीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते बॉलिवुड स्टार्सनी. तेही या रॅलीत आपली सामाजिक जबाबदारी समजून आले होते. सिनेमॅटोग्राफर नदिम खान , गायिका पार्वती खान , ज्येष्ठ अभिनेते फारुख शेख, गीतकार जावेद अख्तर, अभिनेता जावेद जाफरी, जावेद आनंद आले होते. दहशतवादाचा निषेध प्रत्येकानेआपापल्या पद्धतीने केला. त्यामध्ये काहींनी निषेधाचे बोर्डसही आणले होते. तर काहींनी गाणीही म्हटली होती. "जे लोक दहशतवादाचा सबंध इस्लामशी जोडत आहेत, ते इस्लाम धर्माला बट्टा लावत आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सामान्य मुंबईकराच्या मनातही मी राग बघितला आहे, जो यापूर्वी मी इतकेवर्षं मुंबईत राहून पाहिला नव्हता. हे दहशतवादी माणुसकीला अजिबात लायक नाहीयेत. दहशतवादीइस्लामच्या नावावर जे हल्ले करत आहेत त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे सगळे मुसलमान जमले आहेत, " अशी प्रतिक्रिया गीतकार जावेद अख्तर यांनी शांतता रॅलीच्या वेळी व्यक्त केली. दहशतवादामुळे लोकांच्या मनात असंख्य गैरसमज निर्माण झाले आहेत. या गैरसमजांच्या पलिकडे जाण्यासाठी अभिनेते फारुख शेख यांनी जनतेला संदेश दिला. वतनके दुश्मन हमारे दुश्मन है. देशाच्या दुश्मन स्वत:ला कितीही मुस्लमान समजत असला तरी आम्ही त्याला मुसलमान समजत नाही. हेच सांगण्यासाठी आज मोठ्याप्रमाणावर मुस्लिम समाज आला आहे. दहशतवादाचा निषेध करण्यासाठी देशभरातल्या मुस्लीम संघटनांनी अशी रॅली ठिकठिकाणी काढली आहे. या रॅलीत सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण क्षेत्रातल्या निरनिराळ्या लोकांचा सहभाग असणार असल्याची माहिती आहेत, असल्याची माहिती जावेद आनंद यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2008 10:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2008 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close