S M L

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

2 मार्च दिल्ली 15 व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या असून देशात एकूण पाच टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहे. 2 जून 2009 पर्यंत 15वी लोकसभा अस्तित्वात येईल. निवडणूक आयोगाची सकाळी महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्तांनी ही माहिती दिली.महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशात पाच टप्प्यात, बिहारमध्ये चार टप्प्यात, महाराष्ट्र आणि प.बंगालमध्ये तीन टप्प्यात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि ओरिसामध्ये दोन टप्प्यात आणि उर्वरित राज्यात एका टप्प्यात निवडणुका घेतल्या जातील. महाराष्ट्रात 16 एप्रिल, 23एप्रिल आणि 30एप्रिल यादिवशी मतदान होईल. 16 एप्रिलला विदर्भासहित हिंगोली आणि परभणीत, तर उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासहित रत्नागिरी आणि रायगडमध्ये 23 एप्रिलला मतदान घेतलं जाईल. तसंच मुंबई आणि ठाण्यात 30 एप्रिलला मतदान घेण्यात येईल. मतमोजणीला 16 मे रोजी सुरुवात होईल.लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.या निवडणुकीत एकूण 8 लाख, 28 हजार, 804 मतदान केंद्र आहेत.निवडणूक व्यवस्थित पार पडण्यासाठी 40 लाख सरकारी कर्मचारी तर 24 लाख पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. शाळा, महाविद्यालयं आणि स्थानिक सणांच्या सुट्टया लक्षात घेऊनच निवडणुकांच्या तारखा ठरवण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी यांनी दिली. लोकसभेच्या 522 मतदारसंघात मतदारांना ओळखपत्रं देण्यात आली आहेत. लोकसभा निवडणूक होईपर्यंत आता नवीन राजकीय पक्षांचं रजिस्ट्रेशन होणार नाही अशी माहितीही गोपालस्वामी यांनी या पत्रकार परिषदेत दिली. मागील निवडणुकांच्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांची संख्या 1 लाख 41 हजार 402 ने वाढल्याचंही त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2009 07:36 AM IST

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

2 मार्च दिल्ली

15 व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या असून देशात एकूण पाच टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहे. 2 जून 2009 पर्यंत 15वी लोकसभा अस्तित्वात येईल. निवडणूक आयोगाची सकाळी महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्तांनी ही माहिती दिली.महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशात पाच टप्प्यात, बिहारमध्ये चार टप्प्यात, महाराष्ट्र आणि प.बंगालमध्ये तीन टप्प्यात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि ओरिसामध्ये दोन टप्प्यात आणि उर्वरित राज्यात एका टप्प्यात निवडणुका घेतल्या जातील. महाराष्ट्रात 16 एप्रिल, 23एप्रिल आणि 30एप्रिल यादिवशी मतदान होईल. 16 एप्रिलला विदर्भासहित हिंगोली आणि परभणीत, तर उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासहित रत्नागिरी आणि रायगडमध्ये 23 एप्रिलला मतदान घेतलं जाईल. तसंच मुंबई आणि ठाण्यात 30 एप्रिलला मतदान घेण्यात येईल. मतमोजणीला 16 मे रोजी सुरुवात होईल.लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.या निवडणुकीत एकूण 8 लाख, 28 हजार, 804 मतदान केंद्र आहेत.निवडणूक व्यवस्थित पार पडण्यासाठी 40 लाख सरकारी कर्मचारी तर 24 लाख पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. शाळा, महाविद्यालयं आणि स्थानिक सणांच्या सुट्टया लक्षात घेऊनच निवडणुकांच्या तारखा ठरवण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी यांनी दिली. लोकसभेच्या 522 मतदारसंघात मतदारांना ओळखपत्रं देण्यात आली आहेत. लोकसभा निवडणूक होईपर्यंत आता नवीन राजकीय पक्षांचं रजिस्ट्रेशन होणार नाही अशी माहितीही गोपालस्वामी यांनी या पत्रकार परिषदेत दिली. मागील निवडणुकांच्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांची संख्या 1 लाख 41 हजार 402 ने वाढल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2009 07:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close