S M L

दिलीप सानंदा यांच्या सावकारी विरोधात गुन्हा दाखल

6 मार्च, बुलढाणा प्रविण मनोहर, राहुल पहूरकर बुलढाण्याचे सावकार आणि काँग्रेस आमदार दिलीप सानंदा याच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याबद्दल राज्य सरकारला 25 हजाराचा दंड हायकोर्टानं ठोठावलाय. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निकाल दिलाय. सारंगधर चव्हाण या शेतकर्‍यानं सानंदा याच्या सावकारी विरोधात खामगाव पोलीस स्टेशनला गुनहा दाखल करण्यासाठी अर्ज दिला. पण यावर खटला दाखल करू नये म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पीए चंद्रकांत दळवी यांनी पोलीस स्टेशनला फोन केला. विशाल स्थानिक पोलीस अधिकार्‍यानं स्टेशन डायरीत या फोनची नोंद केली. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून दबाव आणला गेल्याचं ऑफिशियल रेकॉर्ड तयार झालं. याविरोधात चव्हाण यांनी हायकोर्टात तक्रार केली.रेणुका न्यायमूर्ती अंबादास जोशी आणि न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्या खंडपीठानं याप्रकरणी सरकारला दंड ठोठावलाच पण विलासराव देशमुखांनाही कारणं दाखवा नोटीस बजावलीय. आमदार सानंदांनी दबाव टाकून जवळजवळ 50 पेक्षा जास्त जमिनींचे रेकॉर्डही बदलले आहेत. सानंदांच्या घरात सावकारी चालते याचाही सानंदा स्वत: इन्कार करतात. सानंदा कुटुंबावर छप्पन शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. सावकारांना जर सरकारच पाठीशी घालत असेल तर शेतकर्‍यांनी कुणाच्या तोंडाकडं पहायच हाच प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2009 04:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2009 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close