S M L

आठवणी बी.आर. चोप्रांच्या

बी.आर. चोप्रा म्हटले की डोळ्यांसमोर उभी राहते ती 'महाभारत' ही मेगा मालिका. या चोप्रांनी बॉलिवुडमध्ये स्वत:चं एक नवं पर्व सुरू केलं. त्यांच्या जाण्याने बॉलिवुडमध्ये पोकळी निर्माण झालेली आहे. बी. आर. चोप्रांना 'द लिजंडरी'का मानलं जातं, त्यांचं बॉलिवुडमधलं योगदान काय आहे, हे ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी सांगितलं. ''बी.आर. चोप्रांची जडणघडण स्वातंत्रढ्याच्या काळातली आहे. या काळातले काही तरुण स्वातंत्र्य लाढ्यात उतरले, काही जीवनाच्या विविध स्तरांत राहून साहित्य, लेखन करत होते. त्यांतून ते आपले विचार मांडत होते. या काळातल्या तरूणांवर पाश्चिमात्य विचारसरणीचा म्हणजे साम्यवादाचा प्रभाव होता. काय तरी नवं सांगू पाहण्याचा या मुलांचा प्रयत्न होता. तर अशा काळाचा त्यांच्यावर प्रभाव होता. बी. आर. चोप्रांचं शिक्षण लाहोर विद्यापीठातून झालेलं होतं. फैज अहमद फैज, खुशवंत सिंग, बलराज सहानी, चेतन आनंद, शाहीद लुधियानवी हे त्यांचे कॉलेजमधले मित्र आहेत. अशा मित्रांबरोबर ते वाढत होते. आणि हा जो काळ आहे तो साहित्यात साम्यवादी विचार येण्याचा काळ आहे. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वाद आपल्या मराठीही होता. देशभर होता. तर ही सगळी मंडळी जीवनासाठी कला म्हणणारी होती. म्हणजे कलेत जीवनाचं प्रतिबिंब यायला हवं. आणि आपण ते सगळं दाखवून परिवर्तनासाठी या सगळ्याचा उपयोग करायला हवा, अशा विचारधारेचे बी. आर. चोप्रा होते. त्यांचा साहित्याचा अभ्यास होता. त्यांना सिनेमा बघण्याची आवड होती. त्यावेळी 'पांचोली' ही लाहोरमधली मोठी सिने प्रॉडक्शन कंपनी होती. या 'पांचोली'मध्येही त्यांचं जाणं-येणं होतं. पण चोप्रांनी पत्रकारीतेचं बोट धरलं. त्यांनी सिनेपत्रकारीतेला सुरुवात केली. त्यांच्या सिनेमाच्या प्रवासाला सुरुवात झाली. फाळणीनंतर ते दिल्लीत होते. दिल्लीतून ते मुंबईत आले. 10 वर्षं ते सिने हेरॉल्ड नावाच्या मासिकाचे संपादक होते. त्यांनी प्रदीर्घ काळ सिनेमाची पत्रकारिता केली आहे. त्यांचा उपयोग त्यांना पुढे भरपूर झाला आहे. नवनवे प्रयोग करण्याची त्यांची इच्छा असायची आणि ते करायचेही. अशी खूप बारीक बारीक माहिती अशोक राणेंनी दिली. बी.आर.चोप्रांनी आपल्याला सुरुवातीपासून त्यांच्या कलाकृतीतून सौंदर्य दिलं, विचार दिला, आब राखून चांगला सिनेमा कसा करायचा हीही शिकवण त्यांनी दिली आहे. ते कसं तेही राणेंनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2008 01:28 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2008 01:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close