S M L

कहाणी ' जादू की झप्पी ' की

आजच्या तरुण पिढीबाबत कायमच असं म्हटलं जातं की यांना नात्यांची किंमतच नाही. हे एकटे-एकटे रहातात. समाजापासून दुरावलेत वगैरे वगैरे... पण आता तुम्हाला असं कोण म्हटलं तर त्याला सरळ युथ ट्युबचा हा भाग दाखवा. या भागात तुम्हाला भेटेल समाजात प्रेमाचा आणि आनंदाचा संदेश देण्यासाठी फ्री हग कॅम्पेन चालवणार्‍या आदितीशी. मुन्नाभाईमुळे जादू की झप्पी ही कल्पना तुम्हाला नक्कीच माहीत असेल, पण ही कल्पना पहिल्यांदा प्रत्याक्षात वापरणार्‍या लंडनच्या उआन मानविषयी आपण या भागात माहिती दिली. आपण ओळख करून घेतली मॅमा अफ्रिका या नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रसिद्ध अफ्रिकन गायिका मरियन मकॅबाची. ज्या काळात स्त्रीनं स्टेजवर उभं रहाणंही समाजाला मान्य नव्हतं, त्या काळात तिनं बंड केलं. तिच्या संगrतामुळे तिला अफ्रिकेतून हद्दपार केलं. पण जिद्द न सोडता ती गीतच राहिली. तिची गाणी जगभर हीट झाली. तिचीच आत्मकथा असणारं ' काळं गाणं ' हे पुस्तक आपण प्रक्षकांना सजेस्ट केलं. आजकाल महागई बरीच वाढलीय ना... पण आई-बाबांना हे कळतच नाही. कारण मॅक-डीच्या बर्गरची किंमत वाढली तरी आपला पॉकेटमनी तेवढाच रहातो ! मग या सगळ्यामध्ये मुव्हीज, हँग आउट, डेट्स हे सगळं कसं मॅनेज करणार ? आणि त्यातच हॅरी पॉटर किंवा चेतन भगतचं नवं पुस्तक आलं तर ते कसं घेणार. आता महागई काही आम्ही दूर करू शकत नाही, पण महाग पुस्तकं कशी घ्यायची हा प्रश्न मात्र आम्ही सोडवलाय. या भागात तुम्ही वेगवेगळ्या ई-बुक्सची माहिती मिळवू शकतात.म्हणजे उद्या ग्रुपमध्ये कोणाला तरी ' इंम्प्रेस ' करायचं असेल तर ममा अफ्रिका आणि तिची हट को पण इंट्रेस्टिंग गाणी, फ्री हग कॅम्पेन अशा बर्‍याच गोष्टी तुम्ही बोलू शकता. आता या तुम्हाला कुठे मिळणार ? अहो सोप्प आहे. त्यासाठी तुमही फक्त सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा. युनिक आणि इंटरेस्टिंग अशी माहिती तुम्ही सोबतचा व्हिडिओ बघून मिळवू शकता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2008 07:17 AM IST

आजच्या तरुण पिढीबाबत कायमच असं म्हटलं जातं की यांना नात्यांची किंमतच नाही. हे एकटे-एकटे रहातात. समाजापासून दुरावलेत वगैरे वगैरे... पण आता तुम्हाला असं कोण म्हटलं तर त्याला सरळ युथ ट्युबचा हा भाग दाखवा. या भागात तुम्हाला भेटेल समाजात प्रेमाचा आणि आनंदाचा संदेश देण्यासाठी फ्री हग कॅम्पेन चालवणार्‍या आदितीशी. मुन्नाभाईमुळे जादू की झप्पी ही कल्पना तुम्हाला नक्कीच माहीत असेल, पण ही कल्पना पहिल्यांदा प्रत्याक्षात वापरणार्‍या लंडनच्या उआन मानविषयी आपण या भागात माहिती दिली. आपण ओळख करून घेतली मॅमा अफ्रिका या नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रसिद्ध अफ्रिकन गायिका मरियन मकॅबाची. ज्या काळात स्त्रीनं स्टेजवर उभं रहाणंही समाजाला मान्य नव्हतं, त्या काळात तिनं बंड केलं. तिच्या संगrतामुळे तिला अफ्रिकेतून हद्दपार केलं. पण जिद्द न सोडता ती गीतच राहिली. तिची गाणी जगभर हीट झाली. तिचीच आत्मकथा असणारं ' काळं गाणं ' हे पुस्तक आपण प्रक्षकांना सजेस्ट केलं. आजकाल महागई बरीच वाढलीय ना... पण आई-बाबांना हे कळतच नाही. कारण मॅक-डीच्या बर्गरची किंमत वाढली तरी आपला पॉकेटमनी तेवढाच रहातो ! मग या सगळ्यामध्ये मुव्हीज, हँग आउट, डेट्स हे सगळं कसं मॅनेज करणार ? आणि त्यातच हॅरी पॉटर किंवा चेतन भगतचं नवं पुस्तक आलं तर ते कसं घेणार. आता महागई काही आम्ही दूर करू शकत नाही, पण महाग पुस्तकं कशी घ्यायची हा प्रश्न मात्र आम्ही सोडवलाय. या भागात तुम्ही वेगवेगळ्या ई-बुक्सची माहिती मिळवू शकतात.

म्हणजे उद्या ग्रुपमध्ये कोणाला तरी ' इंम्प्रेस ' करायचं असेल तर ममा अफ्रिका आणि तिची हट को पण इंट्रेस्टिंग गाणी, फ्री हग कॅम्पेन अशा बर्‍याच गोष्टी तुम्ही बोलू शकता. आता या तुम्हाला कुठे मिळणार ? अहो सोप्प आहे. त्यासाठी तुमही फक्त सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा. युनिक आणि इंटरेस्टिंग अशी माहिती तुम्ही सोबतचा व्हिडिओ बघून मिळवू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2008 07:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close