S M L

खोल खोल खाणी

अमेय तिरोडकर कोकणात मायनिंग हवं की नको ? मायनिंगला गावकर्‍यांचा होत असलेला हा विरोध म्हणजे कोकणातल्या एका नव्या संघर्षांची चुणूक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावात मायनिंगची संभाव्य जागा आहे. प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला गावकर्‍यांनी विरोध केला असून ते कुठल्याही राजकीय नेतृत्वाशिवाय आंदोलन करणार आहेत. जमीन फक्त 32 हेक्टर. भविष्यात मायनिंग चालू झालं तर हीच जमीन कळणे गावात शेकडो कोटींची उलाढाल आणू शकते पण त्याच वेळेला हीच जमीन कळणे गावाचं सुखी आयुष्यच बदलून टाकेल की काय, ही भीती इथल्या गावकर्‍यांना वाटत आहे. कळणे गावाला आपलं वैभव जपायचंय. इथली खळखळणारी नदी. भर दुपारीही सावली देणार्‍या नारळी पोफळीच्या बागा आणि या निसर्गातूनच त्यांना मिळणारं उत्पन्नही. कळणेची आजची लढाई नेमक्या त्या जीवनशैलीसाठीच आहे.मायनिंगसंदर्भात कळणे गावाची 11 ऑक्टोबरला तिसरी जनसुनावणी झाली. यात एकीकडे गावकर्‍यांचे प्रश्न तर त्याला उत्तरं देणारे जबाबदार अधिकारी. सिंधुदुर्गच्या कलेक्टर निधी पांडे या स्वत: या सुनावणीला हजर होत्या. या दरम्यान गावात तणावाचं वातावरण होतं. बाचाबाचीही होत होती. हे एकीकडे सुरू असताना गावाने मायनिंगला एकमुखी नकार देण्याचं ऐलान केलं. मायनिंग सुरू झाल्यास इथल्या शेतीला त्याचा फटका बसणार आहे. कळणे गावात मायनिंग करू बघणार्‍या मेटर्स आणि मिनरल्स कंपनीच्या ईआयए रिपोर्टमध्ये गावात सध्या मायनिंग सुरू असल्याचं म्हटलं आहे. पण आयबीएन लोकमतने जेव्हा इथे प्रत्यक्ष येऊन पाहणी केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की इथे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कंपनीचं मायनिंग सुरू नाही. कळणे गाव सध्या हत्तींच्या कळपामुळेही चर्चेत आहे. हत्तीचा ज्या भागात वावर आहे त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचं खाणकाम करता येत नाही. पण हत्तीचा साधा उल्लेखही कंपनीच्या ईआयए रिपोर्टमध्ये नाही. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लो ग्रेड खनिजाच्या खाणी सापडतायंत. त्यातूनच देशातल्या खाणकाम व्यवसायात असणार्‍या बड्या कंपन्यांची नजर या तळकोकणाकडे वळलीय. पर्यटनातून बरकत येईल, असं ज्या जिल्ह्यांबद्दल म्हटलं जायचं तेच जिल्हे आता खाणींचे जिल्हे म्हणून ओळखले जातात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत बॉक्साईट, मैंगनिज आणि लोहखनिज, या तीन खनिजांचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. एकूण पस्तीस ठिकाणी ही खनिजं सापडली आहेत. साधारण पंचावन्न ते अठ्ठावन्न ग्रेडची ही खनिजं आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन्ही जिल्ह्यांत खाणकाम व्यवसायातल्या मोठ्या कंपन्या उतरल्यात. त्यात आशापुरा माईनकेम, गोगटे मिनरल्स आणि डेम्पो या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.आशापूरा माईनकेमच्या नावावर रत्नागिरी जिल्ह्यातील चार ठिकाणची जमीन आहे. तर गोगटे मिनरल्सच्या नावावर सिंधुदूर्गमधील नऊ ठिकाणी जमीन आहे. डेम्पो या गोव्यातल्या मोठ्या खाणकाम कंपनीकडे सिंधुदुर्गातील तीन ठिकाणची खाणकामासाठीची जमीन आहे. उरलेल्या कंपन्यांमध्ये वितराग होम्स, चेतन शहा, मेटल्स अ‍ॅण्ड मिनरल्स आणि न्यू इंडीया मायनिंग कॉर्पाेरेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश होतो. पश्चिम किनारपट्टीवर होणारं मायनिंग भविष्यात कोकणच्या हिरवाईलाच पाळामुळांसकट उकरुन काढू शकते. खनिजं आणि फळबागांचं प्रमाण कमालीचं व्यस्त होत चाललंय. त्यामुळे आज कोकणात एक नवंच राजकारण उभं राहतंय.जनसुनावणीतला तणाव, प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणावर दिलेली प्रसिद्धी यातून हा मुद्दा येत्या काळात निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो, हे इथल्या राजकारण्यांच्याही लक्षात आलंय. दरम्यान, खाण मालकांनुसार सगळी कागदपत्र सादर केल्यावर आम्हाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पर्यावरण हा मुद्दा नाही, असे मुद्दे गेल्या काही वर्षांपासून मांडले जात आहेत. समृद्ध कोकण, सुंदर कोकण...कोकणचा कॅलिफोर्निया करायच्या घोषणा काही वर्षांपूर्वीपर्यंत ऐकू यायच्या. अजुनही देशातला एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदूर्गलाच मान्यता आहे. पर्यटनाचा व्यवसाय काही वाढला नाही पण इथे मायनिंग आलं. या मायनिंगमधून इथल्या हिरव्या झाडीची माती होऊ नये, यासाठी कोकणात आता आंदोलन चालू झालंय. ' कोकण रक्षण व समृद्धी ' सारख्या संस्था गावागावात जाऊन मायनिंगबद्दल जागृती करत आहेत.पथनाट्यांतून मायनिंगचे दुष्परिणाम सांगण्याचा प्रयत्न होतोय. कोकण बचाओ आंदोलनाचं मूळ आहे ते गोवा बचाओ आंदोलनात. गोव्यातल्या मायनिंगच्या विरोधात 2003 साली जोरदार आंदोलन झालं. नेमकं तेच आंदोलन आता कोकणसाठी रोल मॉडेल बनलंय. गोव्यात खाणीमुळे शेती लयास गेली. पिण्यास पाणी नाही. मायनिंगमुळे इथले शिरगांव उद्धवस्त झालंय. कोकण प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतं, असं म्हटलं गेलं. मग तो एन्रॉन असो किंवा कुडाळचा एमआयडीसी. हेच तर कळणेच्या बाबतीत नसेल ना ? असं वाटत असतानाच आपल्या डोळ्यासमोर येतं ते गोव्यातलं शिरगांव. रेडी तर कोकणचंच. रेडीसारखंच कळणेच्या आजूबाजूच्या गावांचं भवितव्य असेल काय असं मग आपल्याला वाटत राहतं. त्यातून कोकणच्या विकासाचा प्रश्न आपल्याही मनात वाजत राहतो. माथ्यावर आलेल्या सूर्यासारखा हा प्रश्न आता कोकणच्याच अंगावर येतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 11:53 AM IST

खोल खोल खाणी

अमेय तिरोडकर कोकणात मायनिंग हवं की नको ? मायनिंगला गावकर्‍यांचा होत असलेला हा विरोध म्हणजे कोकणातल्या एका नव्या संघर्षांची चुणूक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावात मायनिंगची संभाव्य जागा आहे. प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला गावकर्‍यांनी विरोध केला असून ते कुठल्याही राजकीय नेतृत्वाशिवाय आंदोलन करणार आहेत. जमीन फक्त 32 हेक्टर. भविष्यात मायनिंग चालू झालं तर हीच जमीन कळणे गावात शेकडो कोटींची उलाढाल आणू शकते पण त्याच वेळेला हीच जमीन कळणे गावाचं सुखी आयुष्यच बदलून टाकेल की काय, ही भीती इथल्या गावकर्‍यांना वाटत आहे. कळणे गावाला आपलं वैभव जपायचंय. इथली खळखळणारी नदी. भर दुपारीही सावली देणार्‍या नारळी पोफळीच्या बागा आणि या निसर्गातूनच त्यांना मिळणारं उत्पन्नही. कळणेची आजची लढाई नेमक्या त्या जीवनशैलीसाठीच आहे.

मायनिंगसंदर्भात कळणे गावाची 11 ऑक्टोबरला तिसरी जनसुनावणी झाली. यात एकीकडे गावकर्‍यांचे प्रश्न तर त्याला उत्तरं देणारे जबाबदार अधिकारी. सिंधुदुर्गच्या कलेक्टर निधी पांडे या स्वत: या सुनावणीला हजर होत्या. या दरम्यान गावात तणावाचं वातावरण होतं. बाचाबाचीही होत होती. हे एकीकडे सुरू असताना गावाने मायनिंगला एकमुखी नकार देण्याचं ऐलान केलं. मायनिंग सुरू झाल्यास इथल्या शेतीला त्याचा फटका बसणार आहे. कळणे गावात मायनिंग करू बघणार्‍या मेटर्स आणि मिनरल्स कंपनीच्या ईआयए रिपोर्टमध्ये गावात सध्या मायनिंग सुरू असल्याचं म्हटलं आहे. पण आयबीएन लोकमतने जेव्हा इथे प्रत्यक्ष येऊन पाहणी केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की इथे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कंपनीचं मायनिंग सुरू नाही. कळणे गाव सध्या हत्तींच्या कळपामुळेही चर्चेत आहे. हत्तीचा ज्या भागात वावर आहे त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचं खाणकाम करता येत नाही. पण हत्तीचा साधा उल्लेखही कंपनीच्या ईआयए रिपोर्टमध्ये नाही. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लो ग्रेड खनिजाच्या खाणी सापडतायंत. त्यातूनच देशातल्या खाणकाम व्यवसायात असणार्‍या बड्या कंपन्यांची नजर या तळकोकणाकडे वळलीय. पर्यटनातून बरकत येईल, असं ज्या जिल्ह्यांबद्दल म्हटलं जायचं तेच जिल्हे आता खाणींचे जिल्हे म्हणून ओळखले जातात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत बॉक्साईट, मैंगनिज आणि लोहखनिज, या तीन खनिजांचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. एकूण पस्तीस ठिकाणी ही खनिजं सापडली आहेत. साधारण पंचावन्न ते अठ्ठावन्न ग्रेडची ही खनिजं आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन्ही जिल्ह्यांत खाणकाम व्यवसायातल्या मोठ्या कंपन्या उतरल्यात. त्यात आशापुरा माईनकेम, गोगटे मिनरल्स आणि डेम्पो या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.आशापूरा माईनकेमच्या नावावर रत्नागिरी जिल्ह्यातील चार ठिकाणची जमीन आहे. तर गोगटे मिनरल्सच्या नावावर सिंधुदूर्गमधील नऊ ठिकाणी जमीन आहे. डेम्पो या गोव्यातल्या मोठ्या खाणकाम कंपनीकडे सिंधुदुर्गातील तीन ठिकाणची खाणकामासाठीची जमीन आहे. उरलेल्या कंपन्यांमध्ये वितराग होम्स, चेतन शहा, मेटल्स अ‍ॅण्ड मिनरल्स आणि न्यू इंडीया मायनिंग कॉर्पाेरेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश होतो. पश्चिम किनारपट्टीवर होणारं मायनिंग भविष्यात कोकणच्या हिरवाईलाच पाळामुळांसकट उकरुन काढू शकते. खनिजं आणि फळबागांचं प्रमाण कमालीचं व्यस्त होत चाललंय. त्यामुळे आज कोकणात एक नवंच राजकारण उभं राहतंय.जनसुनावणीतला तणाव, प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणावर दिलेली प्रसिद्धी यातून हा मुद्दा येत्या काळात निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो, हे इथल्या राजकारण्यांच्याही लक्षात आलंय. दरम्यान, खाण मालकांनुसार सगळी कागदपत्र सादर केल्यावर आम्हाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पर्यावरण हा मुद्दा नाही, असे मुद्दे गेल्या काही वर्षांपासून मांडले जात आहेत. समृद्ध कोकण, सुंदर कोकण...कोकणचा कॅलिफोर्निया करायच्या घोषणा काही वर्षांपूर्वीपर्यंत ऐकू यायच्या. अजुनही देशातला एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदूर्गलाच मान्यता आहे. पर्यटनाचा व्यवसाय काही वाढला नाही पण इथे मायनिंग आलं. या मायनिंगमधून इथल्या हिरव्या झाडीची माती होऊ नये, यासाठी कोकणात आता आंदोलन चालू झालंय. ' कोकण रक्षण व समृद्धी ' सारख्या संस्था गावागावात जाऊन मायनिंगबद्दल जागृती करत आहेत.पथनाट्यांतून मायनिंगचे दुष्परिणाम सांगण्याचा प्रयत्न होतोय. कोकण बचाओ आंदोलनाचं मूळ आहे ते गोवा बचाओ आंदोलनात. गोव्यातल्या मायनिंगच्या विरोधात 2003 साली जोरदार आंदोलन झालं. नेमकं तेच आंदोलन आता कोकणसाठी रोल मॉडेल बनलंय. गोव्यात खाणीमुळे शेती लयास गेली. पिण्यास पाणी नाही. मायनिंगमुळे इथले शिरगांव उद्धवस्त झालंय. कोकण प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतं, असं म्हटलं गेलं. मग तो एन्रॉन असो किंवा कुडाळचा एमआयडीसी. हेच तर कळणेच्या बाबतीत नसेल ना ? असं वाटत असतानाच आपल्या डोळ्यासमोर येतं ते गोव्यातलं शिरगांव. रेडी तर कोकणचंच. रेडीसारखंच कळणेच्या आजूबाजूच्या गावांचं भवितव्य असेल काय असं मग आपल्याला वाटत राहतं. त्यातून कोकणच्या विकासाचा प्रश्न आपल्याही मनात वाजत राहतो. माथ्यावर आलेल्या सूर्यासारखा हा प्रश्न आता कोकणच्याच अंगावर येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close