S M L

गप्पा 'भैय्या हातपाय पसरी 'च्या कलाकारांशी (भाग 1)

' भैय्या हातपाय पसरी ' या नाटकावरून वाद सुरू आहेत. गेल्या दीड वर्षांत ' भैय्या हातपाय पसरी ' या नाटकाचे 207 प्रयोग झाले आहेत. नाटकाचे निर्माते मच्छिंद्र कांबळी गेल्यावरही नाटक यशस्वीपणे चालू होतं. एकदम अचानकपणे या नाटकावर बंदी घालावी अशी मागणी समोर आलेली आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी ' शो टाइम 'मध्ये ' भैय्या हातपाय पसरी'चे निर्माते प्रसाद कांबळी आणि ' भैय्या...'मध्ये भैय्याची भूमिका साकारणारे कलाकार संतोष मयेकर आले होते. " नाटकावर बंदी आणण्याची मागणी कोणी आणि का आणली हे मलाही नीटसं माहीत नाही...", निर्माते प्रसाद कांबळी सांगत होते, "अचानक 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या पत्रकार भारती दुबे यांचा फोन आला होता. त्यांनी माझ्याकडून ' भैय्या 'चे लेखक आणि दिग्दर्शकांचं नाव आणि नंबर घेतला. मला वाटलं असेल काहीतरी काम. मी आपला त्यांना नंबर दिला. थोड्यावेळाने त्यांनी मला फोन करून विचारलं की, प्रांतवादामुळे ' देशद्रोही ' या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. तुमच्याही नाटकावरा बंदी घालायला हवी. ' मी त्यांना म्हणालो की आमचं नाटक प्रांतवादावर भाष्य करत नसून 'मराठी माणसाने आत्मपरीक्षण करावं,' असा संदेश देत आहे. तुम्ही एकदा नाटक बघून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. " कोणतीही गोष्ट आधी न पाहता त्यावर भाष्य करणं हे चुकीचं आहे. ' भैय्या...' चे प्रयोग सुरू होण्याआधी त्या नाटकाला सेन्सॉर बोर्डाचीही मान्यता मिळालीये. तर मग माझं नाटक आक्षेपार्ह कसं काय ठरू शकतं, असा प्रश्नही प्रसाद कांबळींनी विचारला. ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला व्हिडिओवरऐकता येतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 10:54 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close