S M L

अशोक गेहलोत यांची राजकीय कारकीर्द

राजस्थानच्या राजकारणातले मि. क्लिन अशी ओळख असलेले अशोक गेहलोत हे आता दुस-यांदा मुख्यमंत्री होतील हे निकालावरून जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजपचा बालेकिल्ला सर करत अखेर काँग्रेसनं राजस्थानवर झेंडा रोवला. या विजयाचे शिल्पकार आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची एक झलक... काँग्रेसतर्फे जोधपूरच्या सरदारपुरा मतदारसंघातून विजयी झालेल्या अशोक गेहलोत यांनी 1998 ते 2003 या काळात राजस्थानचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. राजस्थानच्या राजकारणातले मि. क्लिन अशी त्यांची प्रतीमा आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले गेहलोत 1980 मध्ये पहिल्यांदा जोधपूरमधून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पर्यटन आणि नागरी उड्डाण खात्याचं केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली. 1985 मध्ये त्यांची राजस्थान प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा निवड झाली. या कालावधीत त्यांनी केलेल्या कामामुळे 1994 आणि 1997 मध्ये पुन्हा त्यांची या पदावर फेरनिवड करण्यात आली. 1989 मध्ये राजस्थानच्या गृहमंत्रीपदी आलेल्या गेहलोत यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला. 1991 मध्ये त्यांनी पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात वस्त्रोद्योग मंत्रालायाची जबाबदारी सांभाळली. अखेर 1998 मध्ये भैरवसिंह शेखावत यांचा पराभव करत गेहलोत यांनी सत्ता हस्तगत करत मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. 2003 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र काँग्रेसकडे सत्ता राखण्यात ते अपयशी ठरले. मात्र आता पुन्हा वसुंधराराजे शिंदे यांचा पराभव करत त्यांनी सत्ता हस्तगत केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2008 12:49 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2008 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close