S M L

मंदीचं नियोजन कसं करावं

मंदीचं नियोजन कसं करावंजगभरात आता मंदीच सावट पसरलं आहे. आर्थिक मंदीच्या ह्या कचाट्यात नियोजन कसं करावं याविषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री.विजय पराडकर.अनेक कंपन्यात कॉस्ट कटिंग चालू आहे. त्यामुळे अनेकांचे जॉब जात आहेत. अनेकांना नोकरीतील भविष्याविषयी चिंता सतावत आहे. अशा परिस्थितीत आर्थिक नियोजन करायचं ते कसं असा प्रश्न आज सर्वांनाच भेडसावतोय. याप्रश्नांबाबत पराडकर सांगतात, अशा परिस्थितीत तुमचं मानसिक संतुलन व्यवस्थित राखणं महत्त्वाचं ठरतं. आपल्या पगारापेक्षा आपला महिन्याचा खर्च जास्त होत नाही ना याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा. याचा अर्थ असा नव्हे की क्वालिटी ऑॅफ लाइफ बदला. परंतु अशा मंदीच्या काळात विनाकारण लोन घेऊ नका.पैशाची गुंतवण कुठे करावी. कुठे करू नये याविषयी पराडकर सांगतात, भविष्याचा विचार करता घर खरेदी करणं किंवा आजच्या मंदीत चांगले शेअर खरेदी करणं यात केलेली गुंतवणूक योग्य ठरेल. पण गाडी खरेदी करणं हा खर्च योग्य नाही.सणांना होणारे खर्च, सिनेमा पाहणे, हॉटेलिंग यासारखे खर्च कमी केले पाहिजे.सद्या अमेरिकेत आलेल्या मंदीचे पडसाद आपल्यापर्यंत पोहचायला वेळ लागेल. पण त्याचे परिणाम आपल्या देशात साधारणत: एक ते दोन वर्ष होत राहतील. या मंदीचा मुकाबला कसा करावा यावर अनेक देश, मोठया कंपन्या उपाय योजना करीत आहेत. पण प्रत्येकाने वैयक्तिकरित्या आपापल्याला जे शक्य असेल ते सर्व आपण केलं पाहिजे.पराडकर सांगतात, टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल बिझनेसला, एअरलाईन्स कंपन्यांना, रिअल इस्टेट व्यवसाय यासारख्या क्षेत्रावर मंदीचा परिणाम जास्त जाणवेल. बांधकाम व्यवसायमधील मंदीचा परिणाम सिमेंट, कमोडिटी बिझनेसवर होणार . लोकांकडून खरेदी कमी होऊ लागली की मॉल मधील गर्दी कमी होईल त्याचा परिणाम इटरटेनमेंट क्षेत्रावर हळूहळू होईल.ग्रामिण भागांना शहरापेक्षा मंदीची झळ कमी बसते. त्यामुळे त्यांनी आपल्या खर्चावर नियंत्रण राखलं तर किंवा व्यवसायाशी संबधी इतर शिक्षण घेऊन आपला व्यवसाय वाढवावा.कंपन्यातील कॉस्ट कटिंगमध्ये दुसरी नोकरी शोधणं किती योग्य याविषयी पराडकर सांगतात, पूर्वीच्या कंपनीपेक्षा नवीन कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असली पाहिजे. दुस-या ठिकाणी काम करताना तो तुमच्या आवडीचा जॉब असला पाहिजे. मंदीच्या काळात सर्वच ठिकाणी कॉस्ट कटिंग होते असं नाही म्हणून सहज शक्य असेल तर आणि संधी असेल तर जॉब जरूर बदलावा.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2008 09:06 PM IST

मंदीचं नियोजन कसं करावं

मंदीचं नियोजन कसं करावं

जगभरात आता मंदीच सावट पसरलं आहे. आर्थिक मंदीच्या ह्या कचाट्यात नियोजन कसं करावं याविषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री.विजय पराडकर.अनेक कंपन्यात कॉस्ट कटिंग चालू आहे. त्यामुळे अनेकांचे जॉब जात आहेत. अनेकांना नोकरीतील भविष्याविषयी चिंता सतावत आहे. अशा परिस्थितीत आर्थिक नियोजन करायचं ते कसं असा प्रश्न आज सर्वांनाच भेडसावतोय. याप्रश्नांबाबत पराडकर सांगतात, अशा परिस्थितीत तुमचं मानसिक संतुलन व्यवस्थित राखणं महत्त्वाचं ठरतं. आपल्या पगारापेक्षा आपला महिन्याचा खर्च जास्त होत नाही ना याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा. याचा अर्थ असा नव्हे की क्वालिटी ऑॅफ लाइफ बदला. परंतु अशा मंदीच्या काळात विनाकारण लोन घेऊ नका.पैशाची गुंतवण कुठे करावी. कुठे करू नये याविषयी पराडकर सांगतात, भविष्याचा विचार करता घर खरेदी करणं किंवा आजच्या मंदीत चांगले शेअर खरेदी करणं यात केलेली गुंतवणूक योग्य ठरेल. पण गाडी खरेदी करणं हा खर्च योग्य नाही.सणांना होणारे खर्च, सिनेमा पाहणे, हॉटेलिंग यासारखे खर्च कमी केले पाहिजे.सद्या अमेरिकेत आलेल्या मंदीचे पडसाद आपल्यापर्यंत पोहचायला वेळ लागेल. पण त्याचे परिणाम आपल्या देशात साधारणत: एक ते दोन वर्ष होत राहतील. या मंदीचा मुकाबला कसा करावा यावर अनेक देश, मोठया कंपन्या उपाय योजना करीत आहेत. पण प्रत्येकाने वैयक्तिकरित्या आपापल्याला जे शक्य असेल ते सर्व आपण केलं पाहिजे.पराडकर सांगतात, टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल बिझनेसला, एअरलाईन्स कंपन्यांना, रिअल इस्टेट व्यवसाय यासारख्या क्षेत्रावर मंदीचा परिणाम जास्त जाणवेल. बांधकाम व्यवसायमधील मंदीचा परिणाम सिमेंट, कमोडिटी बिझनेसवर होणार . लोकांकडून खरेदी कमी होऊ लागली की मॉल मधील गर्दी कमी होईल त्याचा परिणाम इटरटेनमेंट क्षेत्रावर हळूहळू होईल.ग्रामिण भागांना शहरापेक्षा मंदीची झळ कमी बसते. त्यामुळे त्यांनी आपल्या खर्चावर नियंत्रण राखलं तर किंवा व्यवसायाशी संबधी इतर शिक्षण घेऊन आपला व्यवसाय वाढवावा.कंपन्यातील कॉस्ट कटिंगमध्ये दुसरी नोकरी शोधणं किती योग्य याविषयी पराडकर सांगतात, पूर्वीच्या कंपनीपेक्षा नवीन कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असली पाहिजे. दुस-या ठिकाणी काम करताना तो तुमच्या आवडीचा जॉब असला पाहिजे. मंदीच्या काळात सर्वच ठिकाणी कॉस्ट कटिंग होते असं नाही म्हणून सहज शक्य असेल तर आणि संधी असेल तर जॉब जरूर बदलावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2008 09:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close