S M L

जनतेचा नेता शिवराजसिंग चौहान

मध्यप्रदेशच्या निकालात भाजपने थेट बाजी मारलेली दिसतं आहे. यावेळी भाजप सरकारविरोधातील लाटेमुळे ही निवडणूक हरेल असं म्हटलं जात होतं. पण या राज्यात भाजपने आपली ताकद पुन्हा सिद्ध केली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनाच भाजपच्या या विजयाचं शिल्पकार मानलं जातं. चौहान यांनी ही निवडणूक आपल्या सरकारच्या कामावर लढवली. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या नेत्याला आज लोकांना काय हवंय याचा अंदाज आला होता, असं आता म्हणता येईल. शिवराजसिंग चौहान पाच वेळा मध्यप्रदेशमधून खासदार होते. सिहौर जिल्ह्यातील जैतमधून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. 2005 मध्ये बुधनी या मतदारसंघातून चौहान 37 हजारांच्या मताधिक्याने शिवराजसिंग चौहान पोटनिवडणूक जिंकले. यावेळच्या निवडणुकीत भाजपचे एकमेव नेते म्हणून तेच पुढे आले होते. प्रशासनावर पूर्ण पकड आणि पक्ष ताब्यात घेतलेला हा नेता भाजपचा स्टार कॅम्पेनर राहिला. मध्यप्रदेशात हीच गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडली कारण, काँग्रेस अंतर्गत कुरबुरींनी त्रस्त होती. या सगळ्याचा फायदा चौहान यांनी उठवला. देशातल्या इतर राज्यांत भाजप अडचणीत सापडलेला असताना चौहान यांनी आपला गड राखला. त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत राजकारणातही त्यांची पत आता वाढली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2008 12:43 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2008 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close