S M L

देवलकर, संन्याल जोडीने बहारीन ओपन स्पर्धा जिंकली

8 डिसेंबर बहरिनअक्षय देवलकर आणि जीष्णू संन्याल या बॅडमिंटन डबल्समधल्या भारताच्या आघाडीच्या जोडीने बहारीन ओपन स्पर्धा जिंकली आहे. चुरशीच्या फायनलमध्ये इराणच्या शाह हुसेन अली आणि महम्मद रेझा या अव्वल सिडेड जोडीचा त्यांनी 16 - 21, 21 - 14 आणि 21 - 10 असा पराभव केला. नऊ देशांतल्या 230 बॅडमिंटनपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण अक्षय आणि जीष्णू यांना सुरुवातीपासूनच स्पर्धेत फॉर्म सापडला.आणि सेमी फायनल पर्यंत त्यांनी एकही गेम गमावला नव्हता. या स्पर्धेत सिंगल्समध्येही भारताच्याच गुरुसाई दत्तने विजेतेपद पटकावलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2008 04:16 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2008 04:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close