S M L

दिल से... शाहरुखसह ( भाग - 2 )

26/11 च्या घटनेनंतर मुंबईचं स्वरुपच पूर्णत: बदललेलं आहे. या बदलत्या स्वरुपावर बोलण्यासाठी बादशहा ऑफ बॉलिवुड शाहरुख खान ' सीएनएन - आयबीएन 'च्या स्टुडिओत आला होता. त्याची मुलाखत सीएनएन - आयबीएनचे एडिटर इन चिफ राजदीप सरदेसाई यांनी घेतली होती. या मुलाखतीतून शाहरुखने आजच्या सर्व जाती-धर्मांच्या तरुणांना दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. राजदीप सरदेसाई : शाहरुख 26/11 ला मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला. त्या घटनेचा तुझ्यावर काय परिणाम झाला आहे ?शाहरुख खान : राजदीप मी मुंबईत येण्याआधी काही वर्षं दिल्लीत होतो. दिल्लीत असताना मी तिथल्या दंगली पाहिल्या आहेत. त्यानंतर मी मुंबईत आलो. मुंबईत आल्यावर मी 92-93 च्या दंगली पाहिल्या, बॉम्बस्फोट पाहिलेयत. त्यानंतर 26/11 चा मुंबईवर झालेला हा दहशतवादी हल्ला. या सगळ्या फेझमधून गेल्यावर, हे सगळं पाहिल्यावर प्रत्येक हिंदुस्थानीप्रमाणे,भारतीयाप्रमाणे मला माझ्या जिवाची भीती वाटायला लागली आहे. मला माझ्या मुलांची, कुटुंबाची, माझ्या फॅन्सची भीती वाटली लागली आहे. मला वेळ मिळेल तसा आणि तेवढा जास्तीत जास्त वेळ मी माझ्या कुटुंबासोबत घालवतो. कारण उद्या काय होईल याची शाश्वती नाहीये. आपण सगळे एका भीषण प्रसंगाला तोंड देत आहोत. या सगळ्या संकटाचा आपण एकत्र येऊन, प्रेमाने. आपलेपणाने सामना करायला पाहिजे. या घडीला एकी महत्त्वाची आहे. राजदीप सरदेसाई : शाहरूख तुझं म्हणणं ऐकून मला राजेश खन्नाचं ' जिंदगी एक सफर हैं सफर सुहाना यहॉ कल क्या हों किसने जाना... ' हे गाणं आठवलं. तू एका अर्थी फिलॉसॉफर बनला आहेस. कारण तुला तुझ्या आप्तेष्टांबरोबर जास्त वेळ घालवायचा आहे. उद्या तू पंचतारांकित हॉटेलमध्ये बसला आहेस आणि तेवढ्या वेळात तिथे दहशतवादी आले... शाहरुख खान : पंचतारांकित हॉटेलमध्येच कशाला उद्या रस्त्यांतून चालताना, ट्रेनमधून प्रवास करतानाही काही होऊ शकतं. जसं माझ्या देश बांधवांना, देश भगिनींनी रस्त्यातून चालताना, ट्रेनमधून प्रवास करताना झालं अगदी तसं. या निरागस लोकांना हकनाक त्यांचा प्राण गमवावा लागला आहे. या सगळ्या घटनांनी मी दु:खी होतोय. मला या सगळ्या घटनांचा राग येत आहे. कारण मी एक शिकला सवरलेला भारतीय मुसलमान आहे. जेवढे म्हणून लोक या घटनेचा निषेध करत आहेत ते योग्यच आहे. राजदीप सरदेसाई : तू स्वत:ला भारतीय मुसलमान समजत आहेस. या दहशतवादी हल्ल्यांचा तू निषेध करत आहेस. दहशतवादी सामान्य लोकांची दिशाभूल करत आहेत. " 'लष्कर-ए तोयबा'मध्ये गेल्यावर जन्नत मिळते.. ' जैश - ए - महम्मद 'सारख्या संघटनेत जा... म्हणजे अल्लाशी जवळीक साधता येईल, असं कुराण सांगतं.. "अशी निरासस लोकांच्या डोळ्यांवर धर्माची पट्टी बांधून त्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यांतून नवे दहशतवादी बनत आहेत. मग तुला या सगळ्याचा राग येत नाही का?शाहरुख खान : साधारणपणे 2 ते 3 वर्षांपूर्वी जर कुणी म्हणालं असतं की, दहशतवाद हा इस्लामिक नेचरमध्येच आहे तर मी ते झिडकारलं असतं. पण आता मला काळायला लागलंय की दशहतवाद या घटकाचा अंगिकार जो इस्लाम करत आहे तो आमचा इस्लाम नाही आहे. आमच्या धर्मग्रंथात 'कुराण'मध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही. आणि तसं मी तुम्हाला उदाहरणासह पटवून देऊ शकतो. आमच्या कुरणात सूर-ए-मोयदाआहे. त्यात स्पष्टपणे लिहिलंय की - तुम्ही एका माणसाचं दु:ख दूर केलंत तर तुम्ही संपूर्ण मानवजातीचं दु:ख दूर केल्यासारखं आहे. तुम्ही जर एका माणसाला दु:ख दिलंत, तर ते संपूर्ण मानवजातीचं दु:ख पोहोचवल्याासारखं आहे. इथे कुराणात माणूस याचा अर्थ हिंदू किंवा मुसलमान किंवा कोणत्याही जमातीचा माणूस नाहीये. तर या भूतलावरचा माणूस आहे. आमच्या कुराणात कुठेही असं हिंसेचा वा दहशतवादाचा समर्थन करणारं असं काहीही म्हटलं गेलं नाहीये की लिहिलं गेलंय, " युद्धात स्त्री, लहान मुल, प्राणी, पक्षी आणि पिकं यांची हानी करायची नाही. त्यांचं नुकसान करायचं नाही. उलट जी व्यक्ती तसं करेल त्याला जन्नत तर कधीच मिळणार नाही. खुदा त्याला सर्वात जास्त दु:ख देईल" अशी समज आमच्या धर्मग्रंथातून दिली गेली आहे. हा जो इस्लाम आहे ती आमच्या अल्लाची जबानी आहे. ज्या दुस-या इस्लामाचा आमचे काही बांधव अंगिकार करत आहेत, तो मुल्लाने या लोकांना शिकवलेला आहे. आणि हे बोलताना, तुम्हाला सांगताना मला विलक्षण दु:ख होत आहे. कारण या लोकांच्या अशा शिकवण्याचा किती वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे मी भारतातल्या सगळ्याच जातीधर्माच्या लोकांना अशी विनंती करतोय की - गीता, कुराण, बायबलचा योग्य तो अर्थ आजच्या तरुण पिढी पर्यंत पोहोचवा. कारण कोणताही धर्म हिंसेच्या विरुद्ध आहे. कोणला दु:ख पोहोचवून कधी तुम्हाला स्वर्ग मिळत नाही. खुदा, देव, गॉडकडे पोहोचत नाही. राजदीप सरदेसाई : आज लोकं धर्माचे सौदागर बनत आहेत. मध्यंतरी एक एसएमएस यायचा की ' ऑल मुस्लीम्स आर नॉट टेररिस्ट बट ऑल टेररिस्ट आर मुस्लीम्स ' म्हणजे दहशतवादी हे विशिष्ट धर्माशी जोडलेले आहेत, असा समज लोकांमध्ये पसरायला लागला आहे. या सगळ्या सावळ्या गोंधळात एक सर्वसामान्य मुस्लीम भरडला जात आहे. तुला काय वाटतंय ?शाहरुख खान : अगदी बरोबर आहे राजदीप तुमचं. मी आधी तुम्हाला सांगतिलं की यापूर्वी असं जेव्हा काही मुस्लीम समाजाविषयी बोललं जायचं, तेेव्हा मी त्याच्याशी सहमत नसायचो. हा अमेरिकन प्रपोगंडा आहे असंही मला वाटायचं. आता परिस्थिती पूर्णत: वेगळी आहे. जो इस्लाम दहशतवादाच्या विस्ताराला खतपाणी घालतोय, दुजोरा देतोय तो खरा इस्लाम नाहीये. तो चुकीचा इस्लाम आहे. इथे मला थोडं जिहादाविषयी सांगावसं वाटत आहे. जेव्हा आमचे प्रॉफीत सांगतील की जिहाद बोलवायचा आहे, तरच होईल. यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे जिहाद बोलवायच्या लायकीचा कुणी नाहीच आहे. कारण प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांच्यापेक्षा कुणी मोठा नाही आहे, असं प्रत्येक मुस्लीम मानतो. हे मी खात्रीने सांगत आहे. जिहाद जेव्हा पुकारला जातो तेव्हा त्याच्या दोन-तीन पाय-या आहेत. सर्वात आधी चर्चा होते. त्याच्यानंतर समझौता होतो. जर तुम्ही आणि मी एकमेकांना आपले आपले विचार मुद्दे पटवू नाही शकलो तर आपण दुस-या मार्गांने जाऊया. भांडण कधी होतं जेव्हा तुम्ही माझ्या कार्यक्षेत्रात प्रवेश करता तेव्हा. पण मी जर तुमच्या कार्यक्षेत्रात कधीच प्रवेश केला नाही तर भांडण होणार नाही. लोकांनी जिहादचा अर्धवट अर्थ आपल्या आचारणात आणला आहे. त्यांनी पार्ट मिनिंग घेऊन लोकांना मिसलीड केलं आहे. आणि जे लोकं आम्हाला धर्मग्रंथ शिकवतात, किंवा ज्यांच्याकडून आपण शिकतो त्यांनी या धर्मग्रंथांचे खरेखरे अर्थ लोकांना सांगावे. राजदीप सरदेसाई : शाहरुख तू अभिनेता आहेस. तू भारताप्रमाणे पाकिस्तानातही तेवढाच प्रसिद्ध आहेस. 26/11 च्या मुंबईवरच्या हल्ल्याने भारत-पाक संबंधांना पुन्हा एकदा तडा गेला आहे. पाकमध्ये दहशतवादी जन्माला येत आहेस, असं लोकांना वाटायला लागलं आहे. तर आत्ता भारत आणि पाकनं एकत्र येऊन दहशतवादाचा सामना करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं तुला वाटत नाहीये का ?शाहरुख खान : बिल्कुल. हीच तर दोन्ही देशांनी संयुक्त होण्याची वेळ आली आहे. दोन्ही देशांच्या शासन कर्त्यांनी एक गोष्ट मानायला हवी की आता खूप झाली फुट पाडून. ही फुटीचं राजकारण न खेळता या लोकांनी एकत्र यायला हवं. पाकवर बॉम्बहल्ले करून काहीच साध्य होणार नाहीये. त्याचा विपर्यास फक्त युद्धात होणार आहे. दहशतवादाला खतपाणी घालणा-या संघटना या आपल्याकडून चालत आहेत, हे पाकने प्रांजळपणाने कबुल करायला हवं. त्याचबरोबर भारतातही दहशतवादाला खतपाणी घालणा-या अशा काही संघटना आहेत आणि ते आपणही मान्य करायला हवं. या संघटना एकमेकांच्या देशाला लागलेली कीड आहे. या संघटना एकमेकांचे देश पोखरत आहेत. तुम्ही आमची मदत घ्या. आम्ही तुमची मदत घेतो, असं सामोपचारानं सांगितलं गेलं पाहिजे. या दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी बाहेरचे देश काय मदत करत आहेत. ती मदत घेतली पाहिजे.आणि दहशतवादाला खतपाणी घालणा-या संघटनांना संपवलं पाहिजे देशाला नाही. बॉम्ब टाकून खल्लास करा ही सर्वात पहिली प्रत्येकाची रागात व्यक्त झालेली प्रतिक्रिया असते. पण ती चुकीची आहे. दोन्ही देश जर एकत्र आले तर नक्की काहीतरी साध्य होईल. कारण वेळ आहे. तसं केल्याने देशातली माणसंच नाही तर हिंदुस्तान आणि पाकिस्तान हे देश एकत्र येतील.राजदीप सरदेसाई : शाहरुख तुझ्या बोलण्यात खूप ताकद आहे. मुल्लांच्या बोलण्यावर तर तुझा विश्वास नाहीये. तुम्ही त्यांच्याशी त्यांच्या धर्मांध भावनेवर बोलायला तयार आहात का?शाहरुख खान : मी फक्त आपल्याच देशातल्या कर्मठ मुल्लांशी नाही, तर पाकिस्तानातल्या कर्मठ मुल्लांशी बोलायला तयार आहे.मी कोणत्याही धर्माच्या कर्मठ व्यक्तीशी या सगळ्यावर बोलायला तयार आहे. कारण ते तुमच्या आणि माझ्यासारख्या या देशात असणा-या शिकलेल्या व्यक्तीशी, आनंदाने जीवन जगणा-या आणि दुस-यांना आनंदानं जीवन जगू देणा-या कोणाशीही वाद घालू शकत नाहीत. साधी गोष्ट आहे... जर तुम्हाला तुमचा धर्म माहिती असेल, तुम्ही दुस-यांना सुखी ठेवत असाल आणि स्वत: सुखी रहात असाल तर तुमच्याशी कोणतीही कर्मठ व्यक्ती ही वादविवाद घालूच शकणार नाही. जातीयवादाच्या बळावर फोफावणा-या कोणत्याही राजकीयपक्षाला वाढू द्यायचंच नाही. रिलिजन इज दी ओपिनिअन ऑफ द मासेस ही गोष्ट खूप जुनी झाली आहे. जातीयवादावर पोसलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाला देशात थारा द्यायचा नाही. राजदीप सरदेसाई : शाहरुख तू ज्याप्रकारे बोलत आहेस त्यावरून मला असं वाटायला लागलं आहे की तू आता मासेसमध्ये यायला पाहिजेस.. कारण तू रोल मॉडेल आहेस... नवीन पिढी आहे.. जी ओबामा जनरेशन म्हणून ओळखली जात आहे... निदान त्या ओबामा जनरेशनसाठी तरी. कधी ना कधी तरी बॉलिवुडपासून दूर जाऊन काहीतरी करण्याचा विचार आहे का तुझा ?शाहरुख खान : राजदीप या देशासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे. मी एक साधासुधा फिल्म अ‍ॅक्टर आहे. माझ्यात लोकांशी संवाद साधण्याची कला आहे. माझे विचारही काही थोर नाही आहेत. आज ज्या निरनिराळ्या प्रकारच्या रॅली येतात त्यात मला जायला आवडतं. पण लोकांचा असा समज होतो की हा आपल्या सिनेमाच्या कॅम्पेनिंगसाठी आला आहे. प्रत्यक्षात तसं नाहीये. मला कोणी अशा क्रार्यक्रमांना बोलावलं. मोर्चात यायला सांगितलं तर मी यायला तयार आहे. मी माझ्या सिनेमांमधूनही ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2008 04:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2008 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close