S M L

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सरशी

8 डिसेंबरपाच राज्यातल्या निवडणुकात काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याचा फटका सत्ताधारी काँग्रेसला बसेल असा अंदाज होता, मात्र तो खोटा ठरवत काँग्रसनं पाचपैकी राजस्थान, दिल्ली आणि मिझोराममध्ये काँग्रेसनं विजय मिळवला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं विजय मिळवला असला तरी गेल्या निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांचे सर्व निकाल हाती आली असून 69 पैकी 42 जागांवर काँग्रसनं विजय मिळवला आहे. भाजपच्या पारड्यात 23 जागा पडल्या असून 4 जागांवर अपक्ष आणि इतर निवडून आले आहेत. मायावती फॅक्टरही या निवडणुकीत निष्प्रभ ठरल्याचं स्पष्ट झालंय. शीला दीक्षित यांनी सलग तिसरी निवडणूक जिंकून विजयाची हॅट्रिक केली आहे. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेसच्या चार जागा कमी झाल्या असल्या तरी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा करिष्मा अजूनही टिकून असल्याचं यानिमित्तानं समोर आलं आहे. दिल्लीतल्या लोकांनी विकासाच्या मुद्यावरच काँग्रेसला पुन्हा निवडून दिल्याचा विश्वास शीला दीक्षित यांनी व्यक्त केलाय. भाजपच्या दहशतवादाच्या मुद्याला जनतेनं झिडकारल्याचंच दिसतं, असा दावा दीक्षित यांनी केला. यापुढे दिल्लीचा विकास तर होतच राहील. पण समाजाचा स्तर सुधारण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न राहील, असा विश्वास शीला दीक्षित यांनी दाखवलाय. तर भाजपनं पक्षांतर्गत धुसफूस असल्याचं मान्य केलंय. विजयकुमार मल्होत्रांच्या नेतृत्त्वाखाली लढलेल्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागलाय. पक्ष नेमका कमी कुठं पडला यावर आता भाजप चिंतन करणार आहे.राजस्थानमध्येही काँग्रेसनं धक्कादायक निकालाची नोंद करत बाजी मारली आहे. एकूण 200 जागांपैकी 96 जाग जिंकत काँग्रेस बहुमताच्या जवळ पोहचला आहे. भाजपनं 78 जागा जिंकल्या असून 26 जागांवर इतरांनी बाजी मारली आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या निवडणुकीतला हा पराभव भाजपसाठी फार मोठा धक्का आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख उमेदवार आहेत. अशोक गेहलोत हे दिल्ली काँग्रेसचे प्रभारीही आहेत. शिवाय त्यांच्याकडे राजस्थानच्या प्रचाराचीही धुरा देण्यात आली होती. विशेष म्हणजे या दोन्ही राज्यात काँग्रेस सत्तास्थापनेच्या मार्गावर आहे. राजस्थानात गुर्जरांचं झालेलं आंदोलन, पाण्याचा प्रश्न आणि विकासाच्या मुद्यावर वसुंधरा राजे सरकार गेल्या पाच वर्षात पिछाडीवर पडल्यानंच भाजपला पराभव स्वीकारावा लागला, असं मानलं जात आहे.मध्य प्रदेशमध्ये सत्ता राखण्यात भाजपला यश आलं असलं तरी त्यांच्या मतांच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली आहे. मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण 142 जागा भाजपने जिंकल्या आहेत आणि आणखी एका जागेवर ते आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या पारड्यात 70 जागा गपडल्या असून 17 जागांवर इतरांची सरशी झाली आहे. या निवडणुकीत उमा भारती यांचा अनपेक्षितरित्या पराभव झाला आहे. विजय मिळवण्यापेक्षा भाजपचा पराभव करणं हे आपलं मुख्य लक्ष्य असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. या विजयाचे शिल्पकार ठरले शिवराजसिंग चौव्हाण,पक्षानं शिवराजसिंग यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाला,चौहान पात्र ठरले.यावेळी शिवराजसिंग यांनी विकासाच्या मुद्द्यावर बाजी मारली. या निवडणुकीत भाजपनं वेगळी खेळी खेळली.त्यांनी जनसामान्यातल्या नेत्याच्या हाती नेतृत्वाची धूरा सोपवली.त्याबरोबरचं त्या नेत्याला अधिकारही दिले.म्हणूनचं शिवराजसिंग चौहान यांनी 61 आमदारांना तिकीट नाकारलं. तसंच विकासाच्या मुद्याबरोबरचं साध्वी प्रज्ञासिंग यांच्या अटकेचा मुद्याही व्यवस्थित वापरला. छत्तीसगडमध्ये गड राखण्यात भाजपला अखेर यश आलं आहे. एकूण 90 जागांपैकी 49 जागांवर भाजपची सरशी झाली असून पाच जागांवर त्यांच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेसची 30 जागांवर सरशी झाली असून पाच जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे. दोन जागा इतरांच्या पारड्यात पडल्या आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीला काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होती. त्या वेळेस छत्तीसगडमध्ये भाजप सत्ता गमावतो की काय ? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र काही वेळातच भाजपनं आघाडी घेतली आणि सत्ता राखण्यात यश मिळवलं. मुख्यमंत्री रमन सिंग यांचं नेतृत्व यानिमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या सलग दुसर्‍या निवडणुकीत विजय मिळवल्यामुळे रमन सिंग यांचं भाजपमधलं स्थान मजबूत झाल्याचं बोलण्यात येत आहे.मिझोराममध्ये काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. 40 पैकी 32 जागांवर मिझो नॅशनल फ्रंटचा त्यांनी पराभव केला. मिझो नॅशनल फ्रंटच्या पारड्यात केवळ जार जागा पडल्या असून 4 जागांवर इतरांची सरशी झाली आहे. काँग्रेस आता मिझोराममध्ये स्वबळावर सरकार स्थापनेच्या मार्गावर आहे. या निवडणुकीत सध्याचे मुख्यमंत्री झोराम थांगा यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे. येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इशान्य भारतातील काँग्रेसचं हे यश लक्षणीय मानलं जात आहे.काँग्रेसच्या या विजयात काँग्रेसचे युवा नेते आणि सरचिटणीस राहुल गांधी यांचा मोठा हात असल्याचं मानलं जातंय. राजस्थान, छत्तीसगड या राज्यात त्यांनी झंझावती प्रचार केला होता. त्याला चांगलंच फळ मिळाल्याचं मानलं जात आहे. एकूणच जनतेनं या निवडणुकीत स्थानिक प्रश्नांनाच महत्त्व दिल्याचं या निवडणुकीतून समोर आलं. परिणामी शिवराज सिंग चव्हाण, शीला दीक्षित रमनसिंग या काम करणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या हातात जनतेनं पुन्हा सत्ता सोपवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2008 06:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2008 06:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close