S M L

युवा पिढीचा लेखक - चेतन भगत

तो आयआयटी इंजिनिअर आहे. त्यानंतर त्यानं आयआयएममधून एमबीए केलं. पण आपल्याला तो परिचित आहे ते वेगळ्याच कारणासाठी. तो एक प्रसिद्ध लेखक आहे. त्यानं आजपर्यंत लिहिलेली तिन्ही पुस्तकं प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. अगदी फूटपाथवर बसणार्‍या विक्रेत्यापासून ते मोठमोठ्या पुस्तकांच्या दुकानांपर्यंत सगळीकडे त्याची पुस्तकं हातोहात खपतात. आजच्या पिढीचं वाचन कमी झालंय असं म्हणतात, पण आजच्या पिढीत त्याचं एकही पुस्तक वाचलं नाही, अशी व्यक्ती मिळणं अवघड आहे. एवढंच नाही तर एखाद्या सुपर-स्टारच्या नव्या सिनेमाप्रमाणे आजची तरुणाई त्याच्या नवीन पुस्तकाची वाट पहात असते. एवढं बोलल्यावर तुम्हला कळलंच असेल मी बोलतोय आजच्या पिढीचा प्रचंड लोकप्रिय लेखक चेतन भगतबद्दल. यूथ टयुबच्या या भागात आमची रिपोर्टर प्रियांका पोहचली चेतन भगतकडे. वेगवेगळ्या विषयांवर चेतननं दिलखुलास गप्पा मारल्या.चेतननं लिहिलेली पुस्तकं काही भारी 'ग्यान' देत नाहीत, पण ती आपल्याला अगदी सहज रिझवतात. त्याविषयी बोलताना चेतन म्हणाला की मी लहानपणी जेव्हा पुस्तकं वाचायचा प्रयत्न केला, तेव्हा कळलं की ती खूप बोजड आहेत. ती हातात घेऊन तर सगळे फिरतात, पण त्यातलं कळतं फार कमी लोकांना. त्यामुळेच लोकांना गोष्ट सांगणं, हा माझा मुख्य उद्देश होता. लेखनातला हा साधेपणा वाचकांना आवडत असला तरी समीक्षकांना त्याबद्दल काय वाटतं ? हे सांगताना चेतन म्हणाला, "समीक्षक अवघड विषयांवर मतं देतात. माझी पुस्तकं साधी सरळ असतात. त्यामुळे समीक्षक सहसा माझ्या पुस्तकांच्या वाटेला जात नाहीत"आयआयटी, आयआयएम, नोकरी, लेखन... या सार्‍या प्रवासाबद्दल बोलताना चेतन म्हणाला "हा कोणत्याही सर्वसामान्य भारतीय मुलाचा प्रवास आहे. लहानपणी इंजिनिअरिंगला गग्लॅमर होतं, तेव्हा इंजिनिअरिंग केलं. मग लोकांनी सांगितलं की आता इंजिनिअरिंगला किंमत नाही, एमबीए कर. मग एमबीए केलं. मग नोकरीही केली... पण एका क्षणी लक्षात आलं की हे मला करायचं नाही. पुढे मला नातेवाईक किंवा शेजारी माझ्या मदतीला येणार नाहीत. मला गोष्ट सांगायची होती, मग मी लेखनाकडे वळलो."आज मराठी, हिंदी, गुजरातीमध्येही त्याची पुस्तकं लाखोंच्या संख्येनं खपतायत. आता 'चेतन भगतचं पुस्तक ' म्हणून लोक वाचतात. पण पहिलं पुस्तक बाजारात येणं नेहमीच कठीण असतं. त्याविषयी बोलताना चेतन म्हणाला "त्यावेळेस सगळी साहित्यिक पुस्तकं छापली जायची. माझं हे हलकं-फुलकं पुस्तक कित्येक प्रकाशकांनी नाकारलं. पण शेवटी हा एवढं सांगतोय तर छापून बघू, म्हणून माझं पुस्तक छापलं गेलं. पण जेव्हा लोकांनी ते वाचलं तेव्हा एखाद्या चीप्सप्रमाणे ते लोकांना आवडलं. तबसे मै चीप्स दिये जा रहा हू और कोग खाये जा रहे हैं." लेखक बनायचं म्हणल्यावर आधी सगळ्यांनी त्याला वेड्यातच काढलं. लेखक बनणं सोपं नाही. त्यासाठी तुम्हला एकांतात बसून वेळ द्यावा लागतो, असंही चेतन आवर्जून सांगतो.चेतनच्या सगळ्याच पुस्तकात आपल्या सामान्य माणसाची गोष्ट सापडते. त्याविषयी बोलताना तो म्हणाला "मला सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन लिहायला आवडतं. माझ्या पुस्तकातली सगळी कॅरेक्टर्स सर्वसामान्य माणसं आहेत. पण आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन वेगळा आहे. युवा पिढी जेव्हा माझी पुस्तकं वाचते तेव्हा त्यांनाही वाटतं की आपणही आयुष्याकडे असं पाहू शकतो, आणि त्यामुळेच मला इतकं यश मिळतं" एकामागोमाग एक पुस्तकं येणं, ती लोकांना आवडणं, मग सिनेमा आणि लोकांचं त्याला यूथ आयकॉन मानणं यात कोणतीतरी योजना आहे, असं चेतनला वाटतं. 'हॅलो' ची कथा करणं हे एक चॅलेंज असल्याचं चेतननं सांगितलं. पण युवा पिढीच्या भावनांना हात घालणं एवढं सोपं नाही. त्यासाठी रिसर्च आवश्यक आहे आणि चेतन त्यासाठी बराच वेळ देतो. तो म्हणाला "देशाची युवा पिढी झपाट्यानं बदलतेय. मग कॉलेजमध्ये जाणं, बरिस्तामध्ये जाऊन त्यांच्या गप्पा ऐकणं हे सगळं मी करतो. माझ्या पहिल्या पुस्तकात सेल फोन्स नव्हते, पण नंतर जसे ते लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले, तसे ते माझ्या पुढच्या पुस्तकातंही सापडले. थ्री मिस्टेक्स इन माय लाईफमध्ये क्रिकेटचे बरेच स्कोर्स आहेत. त्यासाठीही खूप रिसर्च करावा लागला." चेतनला जसं लोकांनी ग्लॅमर दिलं तसंच बर्‍याच क्रेझी रिअ‍ॅक्शनही मिळाल्या. तिसरीतल्या मुलीनं एकदा चेतनला विचारलं की मी तुझे गाल ओढू का ? ही सगळ्यात क्रेझी प्रतिक्रिया असल्याचं चेतननं सांगितलं.चेतनबरोबरच्या या सार्‍या गप्पा तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर ऐकू शकता.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2008 03:06 PM IST

तो आयआयटी इंजिनिअर आहे. त्यानंतर त्यानं आयआयएममधून एमबीए केलं. पण आपल्याला तो परिचित आहे ते वेगळ्याच कारणासाठी. तो एक प्रसिद्ध लेखक आहे. त्यानं आजपर्यंत लिहिलेली तिन्ही पुस्तकं प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. अगदी फूटपाथवर बसणार्‍या विक्रेत्यापासून ते मोठमोठ्या पुस्तकांच्या दुकानांपर्यंत सगळीकडे त्याची पुस्तकं हातोहात खपतात. आजच्या पिढीचं वाचन कमी झालंय असं म्हणतात, पण आजच्या पिढीत त्याचं एकही पुस्तक वाचलं नाही, अशी व्यक्ती मिळणं अवघड आहे. एवढंच नाही तर एखाद्या सुपर-स्टारच्या नव्या सिनेमाप्रमाणे आजची तरुणाई त्याच्या नवीन पुस्तकाची वाट पहात असते. एवढं बोलल्यावर तुम्हला कळलंच असेल मी बोलतोय आजच्या पिढीचा प्रचंड लोकप्रिय लेखक चेतन भगतबद्दल. यूथ टयुबच्या या भागात आमची रिपोर्टर प्रियांका पोहचली चेतन भगतकडे. वेगवेगळ्या विषयांवर चेतननं दिलखुलास गप्पा मारल्या.चेतननं लिहिलेली पुस्तकं काही भारी 'ग्यान' देत नाहीत, पण ती आपल्याला अगदी सहज रिझवतात. त्याविषयी बोलताना चेतन म्हणाला की मी लहानपणी जेव्हा पुस्तकं वाचायचा प्रयत्न केला, तेव्हा कळलं की ती खूप बोजड आहेत. ती हातात घेऊन तर सगळे फिरतात, पण त्यातलं कळतं फार कमी लोकांना. त्यामुळेच लोकांना गोष्ट सांगणं, हा माझा मुख्य उद्देश होता. लेखनातला हा साधेपणा वाचकांना आवडत असला तरी समीक्षकांना त्याबद्दल काय वाटतं ? हे सांगताना चेतन म्हणाला, "समीक्षक अवघड विषयांवर मतं देतात. माझी पुस्तकं साधी सरळ असतात. त्यामुळे समीक्षक सहसा माझ्या पुस्तकांच्या वाटेला जात नाहीत"आयआयटी, आयआयएम, नोकरी, लेखन... या सार्‍या प्रवासाबद्दल बोलताना चेतन म्हणाला "हा कोणत्याही सर्वसामान्य भारतीय मुलाचा प्रवास आहे. लहानपणी इंजिनिअरिंगला गग्लॅमर होतं, तेव्हा इंजिनिअरिंग केलं. मग लोकांनी सांगितलं की आता इंजिनिअरिंगला किंमत नाही, एमबीए कर. मग एमबीए केलं. मग नोकरीही केली... पण एका क्षणी लक्षात आलं की हे मला करायचं नाही. पुढे मला नातेवाईक किंवा शेजारी माझ्या मदतीला येणार नाहीत. मला गोष्ट सांगायची होती, मग मी लेखनाकडे वळलो."आज मराठी, हिंदी, गुजरातीमध्येही त्याची पुस्तकं लाखोंच्या संख्येनं खपतायत. आता 'चेतन भगतचं पुस्तक ' म्हणून लोक वाचतात. पण पहिलं पुस्तक बाजारात येणं नेहमीच कठीण असतं. त्याविषयी बोलताना चेतन म्हणाला "त्यावेळेस सगळी साहित्यिक पुस्तकं छापली जायची. माझं हे हलकं-फुलकं पुस्तक कित्येक प्रकाशकांनी नाकारलं. पण शेवटी हा एवढं सांगतोय तर छापून बघू, म्हणून माझं पुस्तक छापलं गेलं. पण जेव्हा लोकांनी ते वाचलं तेव्हा एखाद्या चीप्सप्रमाणे ते लोकांना आवडलं. तबसे मै चीप्स दिये जा रहा हू और कोग खाये जा रहे हैं." लेखक बनायचं म्हणल्यावर आधी सगळ्यांनी त्याला वेड्यातच काढलं. लेखक बनणं सोपं नाही. त्यासाठी तुम्हला एकांतात बसून वेळ द्यावा लागतो, असंही चेतन आवर्जून सांगतो.चेतनच्या सगळ्याच पुस्तकात आपल्या सामान्य माणसाची गोष्ट सापडते. त्याविषयी बोलताना तो म्हणाला "मला सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन लिहायला आवडतं. माझ्या पुस्तकातली सगळी कॅरेक्टर्स सर्वसामान्य माणसं आहेत. पण आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन वेगळा आहे. युवा पिढी जेव्हा माझी पुस्तकं वाचते तेव्हा त्यांनाही वाटतं की आपणही आयुष्याकडे असं पाहू शकतो, आणि त्यामुळेच मला इतकं यश मिळतं" एकामागोमाग एक पुस्तकं येणं, ती लोकांना आवडणं, मग सिनेमा आणि लोकांचं त्याला यूथ आयकॉन मानणं यात कोणतीतरी योजना आहे, असं चेतनला वाटतं. 'हॅलो' ची कथा करणं हे एक चॅलेंज असल्याचं चेतननं सांगितलं.

पण युवा पिढीच्या भावनांना हात घालणं एवढं सोपं नाही. त्यासाठी रिसर्च आवश्यक आहे आणि चेतन त्यासाठी बराच वेळ देतो. तो म्हणाला "देशाची युवा पिढी झपाट्यानं बदलतेय. मग कॉलेजमध्ये जाणं, बरिस्तामध्ये जाऊन त्यांच्या गप्पा ऐकणं हे सगळं मी करतो. माझ्या पहिल्या पुस्तकात सेल फोन्स नव्हते, पण नंतर जसे ते लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले, तसे ते माझ्या पुढच्या पुस्तकातंही सापडले. थ्री मिस्टेक्स इन माय लाईफमध्ये क्रिकेटचे बरेच स्कोर्स आहेत. त्यासाठीही खूप रिसर्च करावा लागला." चेतनला जसं लोकांनी ग्लॅमर दिलं तसंच बर्‍याच क्रेझी रिअ‍ॅक्शनही मिळाल्या. तिसरीतल्या मुलीनं एकदा चेतनला विचारलं की मी तुझे गाल ओढू का ? ही सगळ्यात क्रेझी प्रतिक्रिया असल्याचं चेतननं सांगितलं.चेतनबरोबरच्या या सार्‍या गप्पा तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर ऐकू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close