S M L

आमीरने केला दहशतवादाचा निषेध

9 डिसेंबर, मुंबई " कोणतीही वाईट गोष्ट झाल्यावर किंवा घडल्यावर आपण दुस-यांकडे अगदी बोट दाखतो. कसलाही पुढचा मागचा विचार न करता आपण सहजतेने म्हणून जातो की, अरे याला जबाबदार ही अमुक एक व्यक्ती आहे. आपल्या देशात काहीही वाईट घडलं तर आपण त्याचं खापर अगदी सहजतेने राजकारणी लोकांवर फोडतो. पण या राजकारण्यांना आपण निवडून दिलंय याचा विचार कधी आपण केलाय का? यांचं उत्तर कदाचित नाही असेल," असं आामीर खान पत्रकारपरिषेदत दहशतवादाविरुद्धची भूमिका मांडताना म्हणाला. दहशतवादाचा निषेध समाजातला प्रत्येक नागरिक आपापल्यापरिने करत आहे. त्यात सेलिब्रिटीही कुठे मागे नाहीयेत. दहशतवादाचा निषेध करण्यासाठी आमीरने पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी आमीर बोलत होता, " कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्याकडूनच करा. दोष देण्याने कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. आपल्या अंगावरच्या जाबाबदा-या झटकल्याने तर काहीच होणार नाहीये. त्याने समस्येचा गुंता वाढत राहणार आहे. स्वत:हून पुढाकार घेऊन कोणतीही गोष्ट करा. चांगल्या, नवीन कामाची सुरुवात आपल्याकडूनच करा, " आमीरच्या या शब्दाने उपस्थित असणारा प्रत्येक जण चाट पडला. कारण त्याच्यातला सेलिब्रिटी नाहीतर सामान्य माणूस बोलत होता. दहशतवाद ही जगाला लागलेली कीड आहे. त्याने जगाचा नाही तर माणसातल्या माणुसकीचा संहार होत असल्याचं आमीरने पत्रकार परिषदेत सांगितलं. " एका देशाने दुस-या देशावर हल्ला केला म्हणून दुस-या देशाने पहिल्यादेशावर हल्ला करणं कितपत योग्य आहे? असा प्रश्नही आमीरने विचारलं. " देशात शांतता नांदावी यासाठी संपूर्ण देशातल्या शांतताप्रेमींनी पुढे यायला हवं, असंही आमीर पत्रकारपरिषदेत म्हणाला. पत्रकार परिषदेत आमीरने इलेक्ट्रॉनिक मीडियावरही टीका केली. " मीडियाने दहशतवादी हल्ल्याचं कव्हरेज केलं हे ठीक आहे. पण अशा परिस्थितीचं कव्हरेज देताना काय, किती आणि कधी द्यायला पाहिजे याचं भानही मीडियाने राखलं पाहिजे. कारण अशा माहितीचा गैरवापर करणारे लोक कसाही करू शकतात. ते तुम्हाला सांगून करणार नाही. मीडियाने विशेषत: इलेक्ट्रॉनिक थोडं तारतम्य राखून कव्हरेज द्यायला पाहिजे. मुंबई हल्ल्यामधल्या दहशतवाद्यांचे संबंध पाकशी असल्याच्या बातमीने आमीर व्यथित झाला आहे. " दहशतवादी पाकचे आहेत म्हणून जास्त व्यथित झालो नाहीये. तर देशाचं नाव खराब झाल्याचं मला जास्त दु:ख आहे. देशाला आणि समाजाला सुधारायचं असेल सर्वात आधी आपल्यामध्ये सुधारणा करायला हवी, असंही आमीर म्हणाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2008 12:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2008 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close