S M L

मुंबईत स्थापन झाली सिटीझन लॉबी

9 डिसेंबर मुंबईमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेटवे ऑफ इंडियाकडे मुंबईकरांनी उत्स्फूर्त रॅली काढली. नागरिकांमधल्या या संतापाला एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून मुंबईत ' सिटीझन लॉबी ' स्थापन करण्यात आली आहे.अग्नी संस्थेचे जर्सन डकुना, माजी पोलीस महासंचालक -ज्युलिओ रिबेरो, मुंबईचे माजी आयुक्त-डी. एम. सुखटणकर तसंच बी. जी. देशमुख अशा माजी अधिका-यांनी मिळून या सिटिझन लॉबीमध्ये पुढाकार घेतला आहे.माहितीच्या अधिकाराचा अधिकाधिक उपयोग करून चांगल्या विविध शासकीय निर्णयांचा आणि कामांचा फॉलोअप घेणं हा सिटिझन लॉबीचा अजेंडा असेल. जेव्हा रेल्वे बॉम्ब स्फोटात सामान्य माणसं मेली तेव्हाच यांनी लक्ष घातलं असतं तर ताज, ओबेरॉयमधली वगैरे सामान्य माणसं मेली नसती.श्रीमंत माणसं मेल्यावर हे जागे झाले.पण अजूनही वेळ गेलेली नाही असं अग्नी संस्थेच्या कार्यकर्त्या,श्यामा कुलकर्णी सांगतात.नागरिक आणि एनजीओमध्ये समन्वय साधून नागरिकांचा दबावगट म्हणून काम करण्याचा निर्णय सिटिझन लॉबीने घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2008 10:44 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2008 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close