S M L

अखेरचा साक्षीदार (भाग : 1)

हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्या मृत्यूबद्दल राजकारण्यांनी बरचं राजकारण केलं. पण आता हे राजकारणं शमलं आहे. हल्ल्याच्या दिवशी या तिन्ही अधिकार्‍यांसोबत गाडीत असलेले अरुण जाधव या घटनेचे एकमेव साक्षीदार आहेत. अतिरेक्यांनी कसा केला गोळीबार हे सगळं जाणून घेतलं 'आयबीएन-लोकमत 'चे संपादक निखिल वागळे यांनी. अरुण जाधव सांगतात , " 26 / 11 च्या दिवशी माझे साहेब साळसकारांना कामा हॉस्पिटलमध्ये दोन अतिरेकी घुसल्याची बातमी कळली. त्यावेळी मी साळसकर साहेबांच्या पाठोपाठ तिथे जाण्यासाठी निघालो. माझा जोडीदार शेट्येही बरोबर होता. जाताना आम्ही दोघांनी दोन स्टेन घेतल्या होत्या. 70 राऊण्डस् घेतले होते. आझाद मैदानच्या दिशेने कामा हॉस्पिटलच्या मागच्या गल्लीत साळसकर साहेबांनी स्वत:ची गाडी जिथे थांबली होती तिथे मी माझी गाडी लावली होती. गाडीतून मी आणि माझा जोडीदार शेट्ये उतरलो होतो. बराच अंधार पडला होता. त्या ठिकाणी जे जे पोलीस अधिकारी होते तेते लपत छपत, गाडीचा आडोसा घेत कामा हॉस्पिटलच्या वरच्या दिशेनं एम धरूत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. मी ते बघितलं आणि साळसकर साहेबांना जॉइन्ट झालो. साळसकर साहेबांच्या पुढे दोन पावलांवर करकरे साहेब होते. करकरे साहेब आणि साळसकर साहेब एकमेकांना फीडबॅक देत होते. आडोसा घेत आम्ही दोघं कामा हॉस्पिटलच्या मागच्या गेटपाशी पोहोचलो. जे गेट बंद होतं, त्या गेटच्या आतमध्ये पोलिसांची बोलर गाडी उभी होती. तिथे समोर आम्हाला अ‍ॅन्टी करप्शन सेलचे पीएसआय परब होते. परब साहेबांना आणि माझ्याबरोबरच्या शेट्येला साळसकर साहेबांनी अंजुम्न इस्लाम कॉलेजच्या टेरेसवर जाण्याचे आदेश देऊन कामा हॉस्पिटलवर निगराणी करण्यास सांगितली. तसंच काही संशयास्पद आढळल्यास फायरिंग करण्याची परवानगी दिली. इन्स्ट्रक्शन दिल्या तसे ते दोघं पुढे निघून गेले. थोड्यावेळानं आम्ही असलेल्या ठिकाणी कामटेसाहेबांची गाडी आली. गाडीतूनच कामटेसाहेब स्टेन गन घेऊन खाली उतरले. कामटे साहेब आम्हाला जॉइन्ट झाले. आम्ही सगळ्यांनी कामा हॉस्पिटलचं मागचं गेट कव्हर केलं. त्यावेळी कामा हॉस्पिटलच्या आतून एक जखमी कॉन्स्टेबल बाहेर आला. तो गेटच्या आत असलेल्या बुलेरो गाडीच्या दिशेनं वळला. त्यावेळी आम्ही सगळे म्हणजे करकरे साहेब, साळसकर साहेब, कामटे साहेब, मी, एटीएसचे काही अधिकारी त्या जखमी कॉन्स्टेबलकडे धावलो. नेमका तेव्हाच हॅन्ड ग्रेनेड फेकल्याचा आवाज झाला. त्या आवाजाच्या दिशेन कामटे साहेबांनी क्रश फायरिंग केलं. म्हणजे कामा हॉस्पिटलच्या गच्चीच्या दिशेनं. तेव्हाच साळसकर साहेबांनी जखमीला त्या तुटक्या गेटमधून बाहेर काढलं आणि आमच्या अ‍ॅन्टी एक्सेस सेलच्या गाडीत बसवलं. त्यावेळी त्याच्याशी तिथे काय चर्चा केली हे कळलं नाही. पण साळसकर साहेबांनी ती गाडी हॉस्पिटलला पाठवली. साळसकर साहेब कामटे साहेबांना सांगितलं की दाते साहेब कामा हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावर आहेत. ते जखमी झाले आहेत. त्यांच्याबरोबर आणखी दोघंजणं आहेत. तेही जखमी झाले आहेत. ती बातमी ऐकल्यावर आम्ही सगळे खूपच एक्साईट झालो आहोत. आता काय कारायचं याचे आडाखे सुरू झाले. आम्हा सगळ्यांना कामा हॉस्पिटलच्या पुढच्या गेटला जायचं होतं. काय परिस्थिती आहे, हे आम्हाला माहीत नव्हतं. तिन्ही साहेबांची त्यावर चर्चा झाली. ती चर्चा काय झाली हे ठाऊक नव्हतं. पण तेवढ्यात आमच्या समोरून एसीपी सोहबांची गाडी आली. त्या गाडीतून आम्ही पुढच्या मोहिमेला निघालो."अरुण जाधव 26 / 11 ची घटना सांगताना प्रसंग डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहिला. अरुण जाधव यांच्या शब्दांतला 26 / 11 चा प्रसंगाचा सविस्तर वृत्तांत शेजारच्या व्हिडिओवर पाहता येईल. ' अखेरचा साक्षीदार ' चे पुढचे दोन भाग, अखेरचा साक्षीदार (भाग : 2) आणि अखेरचा साक्षीदार (भाग : 3) पुढच्या लिंकवर पाहता येईल. http://ibnlokmat.tv/showvideo.php?id=33071 http://ibnlokmat.tv/showvideo.php?id=33061

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2008 11:42 AM IST

अखेरचा साक्षीदार (भाग : 1)

हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्या मृत्यूबद्दल राजकारण्यांनी बरचं राजकारण केलं. पण आता हे राजकारणं शमलं आहे. हल्ल्याच्या दिवशी या तिन्ही अधिकार्‍यांसोबत गाडीत असलेले अरुण जाधव या घटनेचे एकमेव साक्षीदार आहेत. अतिरेक्यांनी कसा केला गोळीबार हे सगळं जाणून घेतलं 'आयबीएन-लोकमत 'चे संपादक निखिल वागळे यांनी. अरुण जाधव सांगतात , " 26 / 11 च्या दिवशी माझे साहेब साळसकारांना कामा हॉस्पिटलमध्ये दोन अतिरेकी घुसल्याची बातमी कळली. त्यावेळी मी साळसकर साहेबांच्या पाठोपाठ तिथे जाण्यासाठी निघालो. माझा जोडीदार शेट्येही बरोबर होता. जाताना आम्ही दोघांनी दोन स्टेन घेतल्या होत्या. 70 राऊण्डस् घेतले होते. आझाद मैदानच्या दिशेने कामा हॉस्पिटलच्या मागच्या गल्लीत साळसकर साहेबांनी स्वत:ची गाडी जिथे थांबली होती तिथे मी माझी गाडी लावली होती. गाडीतून मी आणि माझा जोडीदार शेट्ये उतरलो होतो. बराच अंधार पडला होता. त्या ठिकाणी जे जे पोलीस अधिकारी होते तेते लपत छपत, गाडीचा आडोसा घेत कामा हॉस्पिटलच्या वरच्या दिशेनं एम धरूत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. मी ते बघितलं आणि साळसकर साहेबांना जॉइन्ट झालो. साळसकर साहेबांच्या पुढे दोन पावलांवर करकरे साहेब होते. करकरे साहेब आणि साळसकर साहेब एकमेकांना फीडबॅक देत होते. आडोसा घेत आम्ही दोघं कामा हॉस्पिटलच्या मागच्या गेटपाशी पोहोचलो. जे गेट बंद होतं, त्या गेटच्या आतमध्ये पोलिसांची बोलर गाडी उभी होती. तिथे समोर आम्हाला अ‍ॅन्टी करप्शन सेलचे पीएसआय परब होते. परब साहेबांना आणि माझ्याबरोबरच्या शेट्येला साळसकर साहेबांनी अंजुम्न इस्लाम कॉलेजच्या टेरेसवर जाण्याचे आदेश देऊन कामा हॉस्पिटलवर निगराणी करण्यास सांगितली. तसंच काही संशयास्पद आढळल्यास फायरिंग करण्याची परवानगी दिली. इन्स्ट्रक्शन दिल्या तसे ते दोघं पुढे निघून गेले. थोड्यावेळानं आम्ही असलेल्या ठिकाणी कामटेसाहेबांची गाडी आली. गाडीतूनच कामटेसाहेब स्टेन गन घेऊन खाली उतरले. कामटे साहेब आम्हाला जॉइन्ट झाले. आम्ही सगळ्यांनी कामा हॉस्पिटलचं मागचं गेट कव्हर केलं. त्यावेळी कामा हॉस्पिटलच्या आतून एक जखमी कॉन्स्टेबल बाहेर आला. तो गेटच्या आत असलेल्या बुलेरो गाडीच्या दिशेनं वळला. त्यावेळी आम्ही सगळे म्हणजे करकरे साहेब, साळसकर साहेब, कामटे साहेब, मी, एटीएसचे काही अधिकारी त्या जखमी कॉन्स्टेबलकडे धावलो. नेमका तेव्हाच हॅन्ड ग्रेनेड फेकल्याचा आवाज झाला. त्या आवाजाच्या दिशेन कामटे साहेबांनी क्रश फायरिंग केलं. म्हणजे कामा हॉस्पिटलच्या गच्चीच्या दिशेनं. तेव्हाच साळसकर साहेबांनी जखमीला त्या तुटक्या गेटमधून बाहेर काढलं आणि आमच्या अ‍ॅन्टी एक्सेस सेलच्या गाडीत बसवलं. त्यावेळी त्याच्याशी तिथे काय चर्चा केली हे कळलं नाही. पण साळसकर साहेबांनी ती गाडी हॉस्पिटलला पाठवली. साळसकर साहेब कामटे साहेबांना सांगितलं की दाते साहेब कामा हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावर आहेत. ते जखमी झाले आहेत. त्यांच्याबरोबर आणखी दोघंजणं आहेत. तेही जखमी झाले आहेत. ती बातमी ऐकल्यावर आम्ही सगळे खूपच एक्साईट झालो आहोत. आता काय कारायचं याचे आडाखे सुरू झाले. आम्हा सगळ्यांना कामा हॉस्पिटलच्या पुढच्या गेटला जायचं होतं. काय परिस्थिती आहे, हे आम्हाला माहीत नव्हतं. तिन्ही साहेबांची त्यावर चर्चा झाली. ती चर्चा काय झाली हे ठाऊक नव्हतं. पण तेवढ्यात आमच्या समोरून एसीपी सोहबांची गाडी आली. त्या गाडीतून आम्ही पुढच्या मोहिमेला निघालो."अरुण जाधव 26 / 11 ची घटना सांगताना प्रसंग डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहिला. अरुण जाधव यांच्या शब्दांतला 26 / 11 चा प्रसंगाचा सविस्तर वृत्तांत शेजारच्या व्हिडिओवर पाहता येईल.

' अखेरचा साक्षीदार ' चे पुढचे दोन भाग, अखेरचा साक्षीदार (भाग : 2) आणि अखेरचा साक्षीदार (भाग : 3) पुढच्या लिंकवर पाहता येईल.

http://ibnlokmat.tv/showvideo.php?id=33071

http://ibnlokmat.tv/showvideo.php?id=33061

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2008 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close