S M L

ख्रिसमसची धमाल

युथ ट्युबचा हा भाग खूपच खास होता. कारण या आठवड्यात होता ख्रिसमस. आणि या ख्रिसमसची मजा युथ ट्युबच्या या भागात पहायला मिळाली.ख्रिसमस म्हटलं की सुरुवात होते ती मास प्रेयरपासून. आणि हाच मास प्रेयरचा अनुभव तुम्हाला देण्यासाठी आमची युथ ट्युब रिपोर्टर प्रियांका पोहचली वसईच्या चर्चमध्ये. मास संपला की मग सुरू होते ख्रिसमसची धम्माल, मजा, पार्टी. नवीन कपडे घालून बाहेर पडलेल्या तरुणाईची स्पंदनं या भागात पहाता आली. लहान मुलांसाठी गेम्स होते, तरुणाईची पार्टीची तयारी सुरू होती.ख्रिसमसच्या निमित्ताने हे सगळे इव्हेंट्स आयोजित करतात ती इथली तरुण मुलं आणि इतर कशाहीपेक्षा सगळ्यांना एकत्र आणणं, हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.ख्रिसमसमधली सगळ्यात महत्त्वाची तयारी म्हणजे कपड्यांची आणि ही तयारी खूप दिवसांपासून सुरू असते. म्हणजे ख्रिसमस तर सेलिब्रेट करायलाच हवा, पण आवडत्या मुलींना इम्प्रेस करायलाही यापेक्षा चांगली संधी सापडणार नाहीत. यंदाच्या ख्रिसमसवर सावट होतं ते मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं. म्हणूनच या वर्षी सेलिब्रेशनला थोडासा फाटा देण्यात आला. या वर्षी फटाके फोडले गेले नाही आणि एकूणच सेलिब्रेशनही जरा साधेपणानच करण्यात आलं. म्हणजे म्हणायला कोणीही म्हणोत की आजची तरुणाई सामाजिक बांधिलकी, देशभक्ती वगैरे वगैरे विसरत चाललीय. पण हा भाग बघितलात तर तुम्हालाही कळेल की आजही तरुणाई आपलं भान विसरलेली नाही.ख्रिसमसची ही सगळी धमाल अनुभवायाला सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2008 12:31 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2008 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close