S M L

गोदावरी पाणी वाटपाचा वाद चिघळणार

9 डिसेंबर दिल्लीआंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रमधला गोदावरी नदीच्या पाणी प्रश्नाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार अशी चिन्ह दिसत आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन महाराष्ट्राविरूध्द तक्रार केली. गोदावरीचं पाणी बेकायदेशीरपणे वापरण्याची महाराष्ट्राची योजना असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र 11 बंधारे बांधत असून त्याची माहिती आंध्रला दिली नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. आंध्रचे मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की या बंधा-याबाबत महाराष्ट्र आम्हाला कोणतीही माहिती देत नाही. तसंच महाराष्ट्र बेकायदेशीररित्या पाणी वापरत आहे आणि म्हणून आम्ही त्यांची तक्रार केली . तसंच आम्ही आता केंद्राच्या हस्तक्षेपाची मागणी करत आहोत आहे.याबाबत मुख्य मुद्दा असा आहे की आंध्रप्रदेशातील तेलंगणाला मुख्यत: गोदावरीपासून पाणी पुरवठा होत असतो. आता महाराष्ट्र गोदावरीवर 11बंधारे बांधत असल्यामुळे पाणी प्रश्न चिघळणार हे निश्चित . भविष्यात ह्याच प्रश्नाभोवती आंध्र प्रदेशाच राजकारण फिरणार आहे. कारण पाणी प्रश्नावर देलगु देशम आणि चिरंजीवीच्या प्रजाराज्यम पक्षाने जोरदार मोहिम हाती घेतली आहे. म्हणून काँग्रेसनही आपली भूमिका जोरदारपणे मांडण्यासाठी थेट पंतप्रधानांची भेट घेतली. खरं म्हणजे हा प्रश्न आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी पाणीप्रश्न समितीकडे नेला पाहिजे होता. पण असं न करता गोदावरी पाणी प्रश्नाच्या राजकारणात बाजी मारण्यासाठी, रेड्डी यांनी थेट पंतप्रधानाकडे तक्रार केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2008 02:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2008 02:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close