S M L

रिवाईंड 2008 - बिझनेस (जागतिक मंदीचं वर्ष)

2008 बिझनेस जगासाठी खूपच घडामोडींचं ठरलं. बेलआऊट आणि क्रेडिट क्रंच हे दोन शब्द सगळ्यांच्याच तोंडी आले. तोटा आणि दिवाळखोरी जाहीर करणा-या कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. जग आर्थिक मंदीमध्ये सापडलं आहे, हे स्वीकारणं सगळ्यांसाठीच कठीण गेलं. या सगळ्याची सुरुवात झाली ती अमेरिकेपासून. 158 वर्षांची लेहमन ब्रदर्स ही कंपनी आर्थिक मंदीचा सगळ्यात मोठा बळी ठरली. दिवाळखोरी जाहीर केली तेव्हा लेहमनकडे 600 बिलियन डॉलर्सची कर्जं होती. या दिवाळखोरीमुळे भारतीय कंपन्यांना 2 हजार कोटींचा तोटा झाला. तर आयसीआसीआय बँकेला 50 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान झालं. लेहमनच्या भारतातल्या अडीच हजार कर्मचार्‍यांची नोकरी गेली. वॉशिंग्टन म्युच्युअल ही दिवाळखोरीत जाणारी सगळ्यात मोठी अमेरिकन बँक ठरली. कोसळणार्‍या शेअर्सकडे पाहत मेरिल लिन्चने बँक ऑफ अमेरिकाचा सहारा घेतला तेव्हा अमेरिकन अर्थतज्ज्ञ गारद झाले. मेरिल लिंचची भारतातल्या 600 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. तर त्यांचे भारतात 600 कर्मचारी आहेत. मेरिल लिन्चचे भारतातले कर्मचारीही घाबरले. यासगळ्या पाठोपाठ एआयजीने म्हणजे अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुपनंही दिवाळखोरी जाहीर केली. ही सगळी घसरण रोखण्यासाठी सरकारने मदत द्यावी अशी मागणी होऊ लागली आणि अमेरिकन सिनेटमध्ये बेलआऊट पॅकेज मांडण्यात आलं पण ते नामंजूर झालं. जेव्हा अमेरिकेसोबतच जगभरातले स्टॉक एक्स्चेंजेस कोसळले तेव्हा मात्र दुसर्‍यांदा हे 700 अब्ज डॉलर्सचं पॅकेज मंजूर झालं. पहिल्या टप्प्यात यातले साडेतीनशे बिलियन डॉलर अमेरिकन बँक, एन्शुरन्स कंपन्यांना देण्यात आले त्यानंतर पुन्हा एकदा 800 अब्ज डॉलर्स बेलआऊट पॅकेज देण्यात आलं.2008 मध्ये अमेरिकेतल्या डेट्रॉइटमधला ऑटो सेक्टरमात्र या वर्षात पुरता अडचणीत आला. अमेरिकेतल्या जीएम, फोर्ड सारख्या कंपन्यांची स्थिती वाईट झाली. जर आपल्याला मदत मिळाली नाही तर कंपनी चालवण्यापुरतेही पैसे आपल्याकडे उरणार नसल्याचं या कंपन्यांनी जाहीर केलं. शेवटी अमेरिकन सरकारने 13.4 बिलियन डॉलर्सचं मदत पॅकेज जाहीर केलं..यात जनरल मोटर्सला 9.4 बिलियन तर क्रायस्लरला 4 बिलियन डॉलर्स मिळतील अशी तरतुद करण्यात आली. जपानमध्ये टोयोटा मोटर्सला त्यांच्या 75 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच तोटा झाला. हा तोटा साधाासुधा नव्हता तर पावणे दोन अब्ज डॉलर्सचा होता. मंदीचा हा परिणाम भारतीय ऑटो क्षेत्रावरही पहायला मिळाला. मारुती सुझुकीने भारतातल्या वास्तव्याची 25 वर्षं पूर्ण केली खरी, पण या वर्षात वाहनांची विक्री झपाट्यानं कमी झाली होती. कंपन्यांचा खर्च वाढतोय आणि म्हणूनच टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांनीही आपले पंतनगर, पिंपरीचे प्लांट महिन्याला सहा दिवस बंद ठेवायला सुरुवात केली आहे. कॉस्ट कटिंगचे हे प्रयत्न सगळ्याच कंपन्यांनी सुरू केलेत. महागलेल्या क्रूड तेलाचा सगळ्यात मोठा फटका बसला तो एव्हिएशन क्षेत्राला. एकीकडे एअर टर्बाईन फ्युएल महाग झालंतार दुसरीकडे महागाई वाढल्याने पर्यटकांची संख्या कमी झाली. कंपन्यांच्या कॉस्ट कटिंगमुळे बिझनेस ट्रॅव्हलर्सही कमी झाले. आणि म्हणूनच जेटने 1900 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही नोटिसीशिवाय या कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात आलं. त्यावरून एकच गदारोळ झाला. शेवटी राजकीय दबावापुढे झुकत नरेश गोयल यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. मंदीमुळे नोकर्‍यांवर गदा येणार असं वाटत असतानाच काही भारतीय कंपन्यांनी मात्र आशेचा किरण दाखवलाय 2009 मध्ये भारतात सर्वात जास्त नोक-या उपलब्ध असतील असं ' मॅनपॉवर कंपनीनं ' केलेल्या एका सर्व्हेचं म्हणणं आहे. देशातली सर्वात मोठी सार्वजनिक बँक, 'स्टेट बँक ऑफ इंडिया'नं म्हणजे एसबीआयनं चालू आर्थिक वर्षात त्यांच्याकडे किमान वीस हजार जणांसाठी नोकर्‍या उपलब्ध असल्याची घोषणा केली आहे. एसबीआय त्यांच्या शाखांची संख्याही वाढवणार आहे. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी 'लार्सन अँड टूब्रो'ही येत्या तीन वर्षात दहा हजार नोकर्‍या देणार असल्याचं समजत आहे. अमेरिकन विमा कंपनी 'मेटलाईफ' देखील भारतातल्या शाखांसाठी येत्या पाच महिन्यात अंदाजे 32 हजार कर्मचा-यांची नवी भरती करणार आहे. मेटलाईफ इंडियाही सुमारे शंभर नव्या शाखा सुरू करणार आहे. देशातली एक मोठी सॉफ्टवेअर कंपनी 'इन्फोसिस'नंही त्यांची पुढील वर्षात पंचवीस हजार नियुक्त्या करण्याची योजना कायम असल्याचं सांगितलं जात आहे. वर्ष संपता संपता देशाचं अर्थमंत्रीपद पी. चिदंबरम यांच्याकडून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे आलं आणि खातं आपल्याकडे आल्याच्या दोन आठवड्यांतच त्यांनी अर्थव्यवस्थेसाठी बूस्टर पॅकेज जाहीर केलं. या बूस्टर पॅकेज मध्ये अर्थव्यवस्थेसाठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली 4 टक्क्यांपर्यंतचा सेनव्हॅट माफ करण्यात आला. तर पायाभूत सुविधांवर अधिक 10 हजार कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2008 01:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2008 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close