S M L

रिवाईंड 2008 - बिझनेस (कॉर्पोरेट सेक्टर)

वर्षभरात आर्थिक जगताला सगळ्यात मोठ्‌या जागतिक मंदीला सामोरं जावं लागलं. रतन टाटांसाठीही हे वर्ष फारसं चांगलं नव्हतं, असं म्हणता येईल..नॅनो प्रकल्पाच्या सिंगूरमधल्या जागेवरून वाद सुरू झाला आणि नॅनोला सिंगूरमधून काढता पाय घ्यावा लागला....टाटांनी एक लाखांची नॅनो ऑक्टोबरपर्यंत मार्केटमध्ये येईल हे वचन दिलं होतं.. पण मध्ये आला सिंगूरचा वाद.. नॅनो प्रकल्पासाठी टाटांनी पश्चिम बंगालमधल्या पंतनगर इथं 997 एकरची जमीन मिळवली होती. पण ही जमीन सेझच्या अखत्यारित येत असल्यामुळं वाद पेटला.. या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकर्‍यांच्या जमिनी वापरण्यात आल्या होत्या. या प्रकल्पाच्या विरोधात तृणमूल कॉग्रेसच्या अध्यक्षा ममता बँनर्जी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.. ममता बॅनर्जी, अध्यक्षा, तृणमूल कॉग्रेस (एखादा प्रकल्प प.ब. मध्ये यावा याच्या विरोधात मी नाही.पण त्यासाठी शेतकर्‍यांच्या जमीनी वापराव्यात हे मला मान्य नाहीये.. )ममता बँनर्जी यांचं आंदोलन खूप चिघळलं. खेत मजदूर समितीच्या कार्यकर्त्यांनी टाटा कंपनीच्या सातशे मजदूरांना वेठीस धरलं. प्रकल्पाचं काम बंद पाडलं. दरम्यान सिंगूरच्या वादावर तोडगा निघालाय, अशा बातम्या सतत येत होत्या. टाटांनी सहाशे एकरात प्रकल्प पूर्ण करावा आणि बाकीच्या चारशे एकर जमिनी शेतकर्‍यांना परत कराव्यात,असा कॉम्प्रमाईज फार्म्युलाही आंदोलकांनी काढला होता. पश्चिम बंगालमध्ये होणारा हिंसाचार, लाठीमार यामुळं प्रकल्पाचं काम पूर्णपणे बंद पडलं. अखेर रतन टाटांनी सिंगूरमधून प्लान्ट हलवण्याचा निर्णय घेतला. " आमच्या कर्मचा-यांची सुरक्षा आणि इतर गोष्टी पाहता आम्ही नॅनो प्रकल्प सिंगुरमधून हलवण्याचा विचार करत आहोत. हा निर्णय घेताना आम्हाला दु:ख होतंय कारण आम्ही पश्चिम बंगाल सरकाराच्या इन्व्हेस्टिंग फ्रेण्डली पॉलिसी बघून आम्ही तिथे आलो होतो, " असं टाटा ग्रुपचे सीईओ रतन टाटा म्हणाले. दरम्यान ह्या संपूर्ण वादामुळं नॅनो प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी महाराष्ट्रासह,तामीळनाडू,उत्तरांचल या राज्यांनी टाटांना निमंत्रण दिलं.पण यासर्वात बाजी मारली ती गुजरात सरकारनं. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी टाटांना गुजरातमधल्या साणंद इथल्या युनिव्हर्सिटीची 1100 एकरची जागा दिली. टाटा आणि नरेंद्र मोदी यांनी करारावर स्वाक्षर्‍या केल्या. आणि टाटांची लाखमोलाची नॅनो गुजरातला निघाली. नॅनोच्या बाबतीत टाटांना झटका बसला असला तरी या वर्षात टाटांनी दोन इंटरनॅशनल कार ब्रॅण्ड आपल्या खिशात टाकलेत. ते ब्रॅन्ड जग्वार आणि लॅण्डरोव्हर आहेत. म्हणजे टाटा मोटर्सनं फोर्ड कंपनीशी 2008 या वर्षाच्या सुरुवातीलाच दोन पॉईंट तीन दशलक्ष डॉलर्ससाठी जग्वार आणि लॅन्ड रोव्हरचा सौदा केला. या दोन्ही गाड्यांची किंमत भारतीय बाजारात सत्तावीस लाख ते चाळीस लाख रुपये असणार आहे.. या डीलमुळं टाटा कंपनीच्या शेअर्स तीन आठवड्यात 27 टक्क्यांनी वाढ झाली. भारतीयांना अभिमान वाटावी अशी आणखी एक घटना यावर्षात घडली. ती म्हणजे विक्रम पंडितांची सिटी ग्रुपच्या सीईओपदी झालेली नेमणूक. सिटी ग्रुप ही जगातली सगळ्यात मोठी बँकिंग सेक्टरमधली बँक आहे. आणि त्याच्या सीईओ पदी मुळच्या नागपूरचे विक्रम पंडित यांची निवड झाली. आणि सर्व भारतीय नागरिकांची मान गर्वानं उंचावली. जागतिक मंदीच्या काळात विक्रम पंडित यांनी सीटीची ग्रुपची धुरा सांभाळली आहे. .दरम्यान मंदीमुळं सिटी ग्रुपमधून अंदाजे पन्नास हजार लोकांची नोकरी गेली. आणि याचा फटका विक्रम पंडित यांनाही बसणार, अशा बातम्या न्युयॉर्क टाईम्समधून येऊ लागल्या. त्याशिवाय नव्या योजना आखताना पंडित यांच्याऐवजी नवा प्रमुख नेमण्याच्या शक्यतेपर्यंत सिटीग्रुप बँक आली होती. कंपनीचा काही हिस्सा विकण्याचाही पर्याय सिटीग्रुपच्या संचालक मंडळानं विचारात घेतल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यासाठी मॉर्गन स्टॅनली, गोल्डमन सॅक्स किंवा स्टेट स्ट्रीट बँकेशी बोलणी होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र सिटीग्रुपच्या अधिकार्‍यांनी या शक्यता नाकारल्या.पण मंदीच्या काळात सिटी ग्रुपला वाचवण्यात पंडित यांचा वाटा मोलाचा होता. भारतातल्या सगळ्यात मोठ्या रॅनबॅक्सी या फार्मास्युटीकल कंपनीमध्ये दाइची सांक्यो या कंपनीनं चौसष्ठ टक्के हिस्सा खरेदी केला. डायची सांक्यो ही जपानमधली कंपनी आहे. या कराराचं मूल्य 4, 506 . 31 अब्ज डॉलर्स निश्चित करण्यात आलं. पण यावर रॅनबॅक्सीच्या अमेरिकन एफडीएसोबतच्या वादाचं सावट होतं. मात्र सर्व अडचणींवर मात करत हे डील पूर्ण झालं. 2008 मध्ये याहू आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांचीही चर्चा झाली. मायक्रोसॉफ्ट ही इंटरनेट जगतातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. तर याहूची वेबसाईट ही सगळ्याच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. याच याहू कंपनीचं टेकओव्हर करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीनं करार केला होता. मायक्रोसॉफ्ट ने याहू खरेदी करण्याची $44.6 अब्ज डॉलर्सची ऑफर दिली. पण याहूने ही ऑफर धुडकावली. असाच एक मोलाचा सौदा .सत्यम आणि मेटाज यांच्यामध्ये झाला. सत्यम आणि मेटास इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेटाज प्रॉपर्टी या कंपन्यांमधला करारही संपुष्टात आला. हा करार संपुष्टात येण्याचं कारण म्हणजे शेअर्स होल्डर्सचा विरोध. आयटी क्षेत्रातल्या सत्यम कम्प्युटरनं मेटास प्रॉपर्टीमध्ये अंदाजे सव्वा अब्ज डॉलर्स आणि मेटास इन्फ्रामध्ये एक्कावन्न टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी तीस कोटी डॉलर्सची ऑफर दिली होती. पण देशी आणि जागतिक स्तरावरच्या आणि सर्वसामान्य शेअर होल्डर्सनी विरोध केल्यामुळे सत्यम कंपनीला हा करार रद्द करावा लागल्याचं कंपनीच्या चेअरमन यांनी सांगितलं. सत्यमनं मेटास खरेदी करण्याचा निर्णय बदलला खरा पण त्यामुळं इंडस्ट्रीमध्ये नवीन प्रश्न निर्माण झालेत. या कराराची संपूर्ण तपासणी करण्याची गरज असल्याचं सेबीचे चेअरमन सी.बी.भावे यांनी स्पष्ट केलं. सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडेच स्त्रियांचं वर्चस्व आहे. मग त्यात बँक सेक्टर तरी मागे कसं राहणार. खाजगी क्षेत्रातल्या सगळ्यात मोठ्या आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ पदी चंदा कोचर यांची निवड झाली. संपणारं वर्ष ICICI बँकेसाठी नवी बातमी घेऊन आलं. ICICI बँकेच्या सीईओ पदी चंदा कोचर यांची निवड झाली आहे. ICICI बँक ही देशातली सगळ्यात मोठी खाजगी बँक आहे. ICICIचं बँकेत रुपांतर 1994 ला झालं. पण चंदा कोचर ह्या 1984 पासून बँकेतच काम करत आहेत.मुंबईच्या बजाज इन्स्टिट्यूटमधून त्यांनी कॉस्ट आणि वर्क्स अकाऊन्टंटची पदवी घेतली. बँकेच्या घडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी रिटेल फायनान्स विभागातही काम केलं. त्यांच्यामुळं बँकेला नऊशे अब्ज रुपयांचा फायदा झाला. त्यांच्या या पाच वर्षाच्या कालावधीत ICICI बँकेच्या ग्राहकांची संख्या अठरा अब्ज होती. आणि ICICI बँकही टॉप बँकेच्या पोझिशनवर होती. सध्या मंदीच्या काळात बँकेची धूरा चंदा कोचर यांच्या हाती आलीये. त्यामुळं या काळातही स्पर्धेत टिकून ठेवण्याचं ध्येय समोर असल्याचं कोचर यांनी स्पष्ट केलंय. चंदा कोचर यांनी ICICI बँकेची वाटचाल फार जवळून पाहिली आहे. त्यामुळं त्यांची सीईओ पदी झालेली निवड योग्यचं असल्याचं ICICI बँकेचे नॉन एक्झिक्यूटीव्ह चेअरमन के.व्ही. कामत यांनी सांगितलंय.चंदा कोचर यांनी आपल्या सहकार्‍यांचा विश्वास जिंकलाय.तसाच बँकेच्या ग्राहकांचाही...पण मंदीच्या काळात हाच विश्वास टिकवून ठेवण्याचं उद्दीष्ट कोचर यांच्यावर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2008 12:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2008 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close