S M L

गप्पा अश्विनी कुलकर्णी आणि सतीश माळवदेंशी (भाग : 2)

सलाम महाराष्ट्रमध्ये अश्विनी कुलकर्णी आणि फोटोजर्नलिस्ट सतीश माळवदे आले होते. यंदाचं वर्ष फोटोजर्नलिस्टनं गाजवलं. या फोटोजर्नलिस्टमुळेच गेल्यावर्षी 31 डिसेंबरला जुहूच्या जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेल परिसरात झालेलं परदेशी तरुणीच्या विनयभंगाचं प्रकरण, 26 / 11 च्या दहशतवादी हल्ल्यातले आरोपींची खात्री पटली. गेल्या वर्षभरातल्या घटनांचा आढावा घ्यायचं ठरलं तर फोटोजर्नलिस्टना तेवढंच महत्त्व आहे. सलाम महाराष्ट्रमध्ये मुंबई मिररचे फोटोजर्नलिस्ट सतीश माळवदे आले होते. त्यांनी सलाम महाराष्ट्रमध्ये त्यांचे निरनिराळे अनुभव सांगितले. सतीश माळवदे सांगतात, " 2008 चा आढावा घ्यायचा झाला तर यंदाचं वर्ष हे दहशतवादी हल्ल्यांनी गाजलं. मुंबईत खूप मोठ्या वादळी घडामोडी झाल्या. सगळ्यात चटका लावणारी घटना होती 26 / 11 ची. या घटनेमुळे मुंबई हादरली. पण मुंबईचं टीम स्पीरिटमात्र जबदस्त होतं. "सलाम महाराष्ट्रच्या दुस-या पाहुण्या होत्या अश्विनी कुलकर्णी.त्या प्रगती अभियान या संस्थेच्या संस्थापक आहेत.गेली अनेक वर्ष त्या ग्रामीण विकासावर काम करत आहेत माहितीचा अधिकार, रोजगार हमी योजना या विषयावर त्या सातत्यानं संशोधन आणि काम करताहेत. त्यांनी ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये रोजगार हमी योजनेबाबत माहिती सांगितली. अश्विनी कुलकर्णी सांगतात, " गेल्या वर्षभरात रोजगार हमी योजनेत बदल झाले आहेत. गेल्या 30 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये जी रोजगार हमी योजना आहे ती योजना गेल्या 2 वर्षांपासून भारतातही आहे. पण 1 एप्रिल 2008पासून बदललेली रोजगार हमी योजना महाराष्ट्रानं लागू केली आहे. इतर राज्यांसाठी 100 दिवसांसाठी रोजगार हमी योजना आहे. पण महाराष्ट्रात कुटुंबातल्या प्रत्येकासाठी 100 दिवसांची रोजगार हमी योजना आहे. या नव्या रोजगार हमी योजनेत ग्रामपंचायतीला महत्त्व दिलेलं आहे. रोजगार हमी योजनेतल्या प्रत्येक घडामोडींचं ग्रामपंचायतींच्या चावडीवर जाहीररित्या वाचन होणार आहे. त्यामुळे योजनेतले प्रत्येक बदल हे सगळ्यांना कळणार आहेत."अश्विनी कुलकर्णी आणि फोटोजर्नलिस्ट सतीश माळवदे यांच्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 07:01 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 07:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close