S M L

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 1)

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 1)रिवाईंड 2008 या स्पेशल स्पोर्टस प्रोगाममध्ये सरत्या 2008 वर्षाचा आढावा घेणार आहोत. 2008 मधील महत्वाच्या क्रीडा घटनांमध्ये असणार आहे जोश, जल्लोष, हार, विजय, दु:ख आणि हो आनंदाचे क्षणही... 2008 वर्षातील क्रीडा घटना रिवाईंड करायला सुरुवात करूया अर्थात क्रिकेटपासून क्रिकेट टॉप टेनभारतासाठी यंदाचं वर्ष धोणीमय ठरलं. धोणी म्हणजे यशाचं जणू दुसरं नाव असं समीकरणचं सरत्या वर्षात झालं. गंभीर, युवराज सोबत सचिनची फटकेबाजीही क्रिकेट शौकीनांनी यावर्षात मनमुराद अनुभवली. दादा आणि जम्बोची रिटायर्डमेंट मात्र मनाला चटका लावून गेली.2008 मध्ये भारतीय क्रिकेट जगतावर ठसा उमठवलेल्या टॉप टेन घटना आम्ही रिवांईड केल्या आहेत.धोणी मेनियाधोणीचा दबदबा -2008 भारतीय क्रिकेट इतिहासातालं सुवर्ण वर्ष. वनडे पाठोपाठ टेस्टमध्ये विजय मिळवत क्रिकेट विश्वात भारतानं महासत्ता बनण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं ते याच वर्षात. आणि भारताच्या या विजयी रथाचा सारथी होता रांचीचा महेंद्रसिंग धोणी. धोणीच्या नेत्तृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इंग्लड या बलाढ्य टीमला पराभवाचे खडे चारले. वन-डे सीरिज तर भारताने खिशात टाकल्या. पण त्याचबरोबर वर्षअखेरपर्यंत 5 पैकी 4 मॅच जिंकून त्यानं टेस्ट कॅप्टन म्हणूनही आपला दबदबा निर्माण केला.'गंभीर' बॅटिंगगंभीरचा टॉप फॉर्म -भारताला नेहमीच सतावणारा ओपनिंग बॅटसमनचा प्रश्नही यावर्षी सुटला. वीरेंद्र सेहवागला साथ मिळाली ती दिल्लीचा डावखुरा बॅटसन गौतम गंभीरची. या वर्षात त्यानं टेस्ट आणि वनडे या दोन्हीमध्ये 1000 रन्सचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे त्यानं टेस्ट आणि वनडेत प्रत्येकी 3 सेंच्युरीही केल्या. त्रिशतकी सेहवागसेहवागची दुसरी ट्रिपल सेंच्युरी-भारतातर्फे सर्वाधिक टेस्ट रन्स करणारा प्लेअर ठरला तो नजफगढचा नवाब वीरेंद्र सेहवाग. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ठोकलेली ट्रीपल सेंच्युरी त्याच्या फॅन्सच्या कायम लक्षात राहील.क्रिकेटचा 'युवराज'युवराजचं दणक्यात पुनरागमन-आपल्या फॉर्मसाठी झगडत असणा-या युवराज सिंगनं दणक्यात पूनरागमन केलं. इंग्लंडविरुद्धच्या वन-डेत सलग दोन मॅचमध्ये सेंच्युरी ठोकत त्यानं टीकाकारांचं तोंड बंद केलं. शिवाय टेस्टमध्येही मधल्या फळीत गांगुलीच्या जागेवर आपला दावा ठोकला.कांगारूंवर मातबॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारताकडे-2008मध्ये ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा ऑसी प्लेअर्सना डोकेदुखी ठरला. भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव करत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर कब्जा तर केलाच पण अपराजित म्हणून ओळखला जाणा-या कांगारूंच्या वर्चस्वालाही धक्का दिला.इंग्लंडला दणकाइंग्लंडला शह -वन डेमध्ये आपण दादा असल्याचं भारतानं इंग्लंडला दाखवून दिलं. इंग्लंडविरुध्दची वनडे सीरिज भारतानं 5-0 ने जिंकत ख-या अर्थानं व्हाईटवॉश दिला. पण भारतीय टीम इथंच थांबली नाही. दोन टेस्टची सीरिज 1-0 अशी खिशात घालत भारतानं आयसीसी क्रमवारीतही थेट दुस-या क्रमांकावर झेप घेतली. आयपीएलचा धमाकाआयपीएलचा पहिला हंगाम यशस्वी-क्रिकेटच्या मैदानात चिअर गर्ल्स.आणि बरोबर फोर आणि सिक्सची आतषबाजी.क्रिकेटचा हा नवा फॉर्म्युला घेऊन आलं इंडियन प्रिमीयर लीग म्हणजेच आयपीएल. पहिल्याच वर्षातला त्यांचा धमाकाही तेवढाच जबरदस्त होता. पहिल्या वहिल्या आयपीएलची बाजीगर ठरली तीे शेन वॉर्नची राजस्थान रॉयल टीम.'दादागिरी' संपलीगुडबाय दादा- क्रिकेटच्या या धमाक्यात काही गोष्टी क्रिकेटफॅन्सच्या मनाला चुटपूटही लावून गेल्या. भारतीय टीमला आक्रमकपणा शिकवणा-या सौरव गांगुलीची 'दादागिरी' संपली पण त्याच्या खास स्टाईलनं.वन डे आणि टेस्टमध्ये मिळून 19,000 रन्स आणि 38 सेंच्युरी गांगुलीनं ठोकल्या.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर टेस्टमध्ये गांगुलीनं क्रिकेटला अलविदा केलं.आणि त्याच्या सहका-यांनीही क्रिकेटच्या या महाराजाला शाही निरोप दिला.गुडबाय जम्बो अलविदा जम्बो- कुंबळेच्या टेस्ट टीमनं ऑस्ट्रेलियाच्या सलग 17 विजयांची मालिका खंडीत केली ती याच वर्षात.त्यानंतर मायदेशी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या याच सीरिजमध्ये आपल्या आवडत्या फिरोजशहा कोटलाच्या मैदानावर टीम इंडियाच्या जम्बोनंही रिटायर्डमेंट घेतली.फिरोजशहाच्या याच मैदानावर इनिंगमधले 10 विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड कुंबळेनं केला होता.आजही भारतातर्फे टेस्ट आणि वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 2008मध्येच भारतानं 1983 मध्ये जिंकलेल्या वर्ल्डकपची पंचवीशी कपिलच्या त्या वर्ल्डचॅम्प टीमसोबत अवघ्या भारतानं साजरी केली. याचवर्षात कॅप्टन कपिल खराखुरा कर्नल बनलाक्रिकेटम्हटलं की वाद हे आलेचं.पण 2008 चं वर्ष हे मैदानापेक्षा मैदानाबाहेरील वादांनी जास्त गाजलं.दहशतवाद आणि क्रिकेटमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावरही उमटले.इंग्लंडची टीम सुरक्षेचं कारण देत भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतली.तर दुसरीकडे भारताने पाकिस्तानसोबत खेळण्याचं साफ नाकारलं.भारत-पाकिस्तान क्रिकेट टीममधलं मैदानाबाहेरचं हे युद्ध क्षमण्याची चिन्ह नाहीत.पण मायदेशी गेलेली इंग्लंडची टीम टेस्ट सीरिज खेळायला मात्र परत भारतात आली. दहशतवादावर क्रिकेटनं मिळवलेला हा विजय होता...सायमंड्स-भज्जी वाद-2008ची सुरुवात गाजली ती 'मंकी गेट' मुळे. सायमंडला मंकी ही जातीवाचक शिवी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला.आणि मग या आरोपातून हरभजनला मुक्त करण्यासाठी टीम इंडियासह भारतानंही आपलं वजन वापरलं.अखेर हरभजनलाही क्लिनचीट मिळाली.हरभजनची थप्पड - एक थप्पड .त्यासाठी हरभजनला मोजावे लागलेत 3 कोटी रुपये. आणि भोगावी लागली आयपीएलमधल्या 11 सामन्यांची बंदी.श्रीसंतला आयपीएलच्या सामन्यात भर मैदानात श्रीसंतला थप्पड लगावण्यासाठी हरभजनला ही शिक्षा ठोठावण्यात आली. क्रिकेटच्या इतिहासातील ही आजवरची सगळ्यात किंमती थप्पड ठरली.वादग्रस्त गंभीर -हरभजनच्या थप्पडीइतकीच गंभीरची धडकही यावर्षी गाजली.ऑस्ट्रेलियाच्या वॉटसननं गंभीरला चिडवलं आणि गंभीरनंही हा प्रकार गंभीरपणे घेत त्याला असं प्रत्युत्तर दिलं.परिणामस्वरुप भंगीरवर टेस्ट मॅच बंदी लादण्यात आली.'पायचकर' कोण?- पीटरसन-युवराज नवा वाद इंग्लंडविरुध्दच्या सीरिजमध्ये युवराजनं 5 वेळा पीटरसनला बकरा बनवलं.युवराजचा बकरा झालेल्या पीटरसनने मग चिडून युवराजचं दुस-यांदा बारसं केलं. त्याचं नाव ठेवलं पायचकर. आणि खोडकर युवराजनंही पीटरसनला त्याच शैलीत उत्तर दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 08:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 08:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close