S M L

करिअर पर्यावरणातलं... (भाग : 2)

' करिअर पर्यावरणात ' लं चा दुसरा भाग. लोकांमध्ये कच-याचं व्यवस्थापन करण्याबद्दल म्हणावी तेवढी जागृती दिसत नाहीये. त्याबद्दल काय सांगाल ? प्रा. संजय जोशी : कच-याच्या व्यवस्थापनाची समस्या ही फक्त काही एका ठराविक भागापुरती मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ती जाणवते. कारण लोकांमध्ये तेवढी जागृतीच नाहीये. ठाण्यामध्ये 10 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही पर्यावरण दक्षता मंचाची स्थापना केली तेव्हा सुरुवातीला आम्ही घन कचरा व्यवस्थापन हाच प्रकल्प हाती घेतला होता. कारण कच-यामुळे होणा-या प्रदुषणाची व्याप्ती मोठी आहे, हे आमच्या तेव्हाच लक्षात आलं होतं. आणि अजूनही सर्वसामान्य लोकांना त्या समस्येचं त्या प्रमाणात भान आलेलं नाहीये. पार्थ तुम्ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेन्टचं काम मल्टीनॅशनल कंपनी आणि महानगरपालिकेबरोबरही केलेलं आहे. तुम्हाला या कामचा चांगला अनुभव आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेन्टची कामं कशा प्रकारची असतात ? आमच्या विद्यार्थ्यांना त्या आणि तुमच्या संस्थेच्या कामाविषयी काही सांगाल का ?पार्थ बापट : आमची संस्था पर्यावरण जागृतीचं काम शाळा, कॉलेज, कंपन्या अशा निरनिराळ्या ठिकाणी करते. काही मल्टी नॅशनल कंपन्यांना त्यांच्या प्रोसेसिंगमुळे पर्यावरणाची जी काही हानी होतेय याची कल्पना असते. पण याची कुठेतरी त्यांना नीट जाणीव करून देणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्याकरता तशाप्रकारचे प्रशिक्षण वर्ग आखतो. त्या व्यतिरिक्त आम्ही छोटी रिसर्च विंगही चालवतो. काही कंपन्यांना ठराविक ठिकाणी काही महत्त्वाचे प्रोजेक्ट सुरू करायचे असतात. अशावेळी त्यांना पर्यावरणाचं मार्गदर्शन आवश्यक असतं. तर आम्ही तेही काम थोड्याप्रमाणावर करतो. काही प्रमाणात आम्ही इको टुरिझमही करतो. सर काही लोकांना गिफ्ट आर्टिकल बनवण्याची आवड असते. तर त्यांना अशा पर्यावरणीय अभ्यासक्रमांचा उपयोग होईल का? प्रा. संजय जोशी : अशा लोकांनी टाकवूपासून टिकावू गोष्टींची निर्मिती करावी. रद्दीच्या पेपरांपासूनही उत्तमोत्तम गोष्टींची निर्मिती करता येईल. म्हणजे त्यांना बिझनेस म्हणूनही अशा गोष्टींचा उपयोग होईल. शिवाय पर्यावरणाविषयीची जागृतीही निर्माण होईल ती गोष्ट वेगळी. बाम्बू बेस इंडस्ट्री ही पर्यावरणीय उद्योगाच्या आंतर्गत येते का ? त्या संदर्भातली माहिती कुठे मिळेल ?प्रा. संजय जोशी : बाम्बूवर निरनिराळ्या प्रकारचं संशोधन चालू आहे. कारण बाम्बूबेस्ड इंडस्ट्री ही आपल्याकडे नव्यानं विकसित होत आहे. बाम्बूचे निरनिराळ्या प्रकारचे उपयोग आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीनं बाम्बू अतिशय चांगला आहे. बाम्बूपासून चांगल्या पद्धतीची गिफ्ट आर्टीकल बनवली जातात. या बाम्बूचा उपयोग घरबांधणीसाठी विशेषत: नॉर्थ - इस्ट भागात अरुणाचल प्रदेशसारख्या भागात जास्त होतो. भारतामध्ये 3 संस्थांमधून बाम्बू उत्पादनावचं प्रशिक्षण दिलं जातं. पार्थ तुम्ही पर्यावरण शास्त्रामधल्या फॉर्मल ट्रेनिंगबद्दल तुम्ही काय सांगाल ?पार्थ बापट : आपली जी शिक्षणपद्धती आहे ती बरीचशी जॉब ओरियेण्टेड अशीच आहे. म्हणजेच जॉबस्‌ना सुटेबल अशा शिक्षण पद्धतींचा ट्रेंड वाढत आहे. पर्यावरण शास्त्रामधल्या जी एम्.एस्.सीचा अभ्यासक्रम हा पोल्युशन कंट्रोलकडे झुकणारा आहे. म्हणजे प्रदूषणाल अध्यारुत धरून या कोर्सची आखणी करण्यात आली आहे. पर्यावरण शास्त्रात काम करणा-यांसाठी तसं काही नाहीये. कोणत्याही क्षेत्रात काम करणारा माणूस हा पर्यावरणामध्ये अगदी सहज काम करू शकतो. जर तुम्हाला पर्यावरण क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर कोणीही या क्षेत्रात येऊ शकतो. जर्नलिझममध्ये जर्नलिझमची डिग्री घेतलेली माणसं येत नाहीत... तर त्याविषयात आवड असणारी माणसं जर्नलिझममध्ये अगदी सहजच येतात. तसंच पर्यावरणाचं आहे. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचं फॉर्मल ट्रेनिंग घेत नाही तेव्हा आपण शिस्तीनं त्याविषयाचा अभ्यास करतो. उत्सुकतेपोटी आपल्या हातून तो केलाही जातो.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2009 05:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2009 05:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close