S M L

मेघनाचे अरुणाचलचे किस्से

न्यूज पेपर रोज वाचला पाहिजे. कारण कधी कधी आपल्या नजरेतून एखादी पारितोषिक प्राप्त लेखमाला सुटूही शकते. मध्यंतरी लोकमतमधून मेघना ढोके या तरुण पत्रकार मुलीची अरुणाचलवरची लेखमला प्रसिद्ध होत होती. त्या लेखमालेसाठी मेघनाला डेव्हलपमेंट जर्नलिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. ज्यांनी ज्यांनी मेघनाचे अरुणाचलवरचे लेख मिस केले होते... त्यांच्यासाठी तिनं युथ ट्युबमध्ये अरुणाचलमधले तिचे निरनिराळे किस्से सांगितलेत. मेघना सांगते, " नॉर्थ इस्ट म्हणजे काय इथूनच मी माझ्या लिखाणाला मी सुरुवात केली. माझ्या त्या लेखमालांना जगभरातल्या तरुणांचा चांगलाच प्रतिसाद मिळला. नॉर्थ इस्ट म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर इशान्य भारत, इशान्य भारतातली सात राज्य जी सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखली जातात, उल्फा दहशतवादी संघटना, इशान्य भारतातलं आसाम राज्य, चीननं आसामवर स्वत:चा हक्क सांगणं असं सगळं डोळ्यांसमोर उभं राहतं. पण तिथले लोक जगतात कसे, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांच्या आयुष्यात काय घडतं... तर माहीत नाही... तर अरुणाचल प्रदेश - गोवाहटी आणि मििथून इटानगर असा प्रवास प्लॅन केला. त्या निमित्तानं मला तिथली लोकं कळली. "अरुणाचलमधल्या तरुणाईला भारताविषयी राग असल्याचं मेघना सांगते. " कारण आपण जी शायनिंग इंडिया म्हणत आहोत...त्या निमित्तानं आपण जी विकासाची फळ उपभोगत आहोत... तो फायदा कधीच या मुलांपर्यंत पोहाचलेला नाहीये. पण तरुण मुलांची स्वप्नं पक्की आहेत. अगदी गॅरेज उघडण्यापासून ते शाळा सुरू करण्यापर्यंतचं काम इथली मुलं मोठ्या अभिमानानं करताहेत. आपल्या माणसांना उभं करणं, त्यांना तयार करणं हा त्यांचा हेतू आहे. " मेघनानं तिथल्या कल्चरबद्दलही सांगितलं. ती सांगते, " तिथे स्त्रीला खूप मान आहे. कारण स्त्रिला कणखर समजलं जातं. अनोळख्या मुलीलाही तिथे आदरानं वागवतात. मग ती कोणत्याही देशातली असो. राज्यातली असो." इशान्य बाघातले तरुण आणि स्त्रिया पुढारलेल्या आहेत. घराघरांत इंटरनेट , कम्प्युटर, लॅपटॉप जाऊन पोहोचला आहे., अशीही माहिती मेघनानं दिली. मेघनाला आता बांगला देशातल्या बचत गटांचा अभ्यास करायला जायचं आहे. मेघनाचे अरुणाचलचे किस्से ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2009 03:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2009 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close